नवीन लेखन...

तुमची वेबसाईट गुगलमध्ये येतेय?

तुमची वेबसाईट गुगल किंवा इतर सर्च इंजिनमधून व्यवस्थितपणे शोधली जाते का? तुम्ही तुमच्या साईटचे SEO केलेले आहे का?

तुमच्यापैकी बरेचजण “मराठीसृष्टी”वर लिहिताच. तुम्ही लिहिलेल्या लेखांचे गुगल रॅंकिंग चांगले आहे का? तुम्हाला तुमच्या लेखाबद्दल मित्रांना कळवायचं असेल तर ते सोपं आहे का? तुमच्या लेखाची URL वाचायला किंवा फोनवरुन सांगायला सोपी आहे का?

आता तुम्ही कदाचित विचाराल की हे SEO किंवा URL म्हणजे काय? तर SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन….. आणि URL म्हणजे तुमचया पानाचा वेबसाईटवरचा बरोब्बर पत्ता.

या लेखाचंच उदाहरण घेउ. त्याची URL बघा.

तुमची वेबसाईट गुगलमध्ये येतेय?

आहे ना सोप्प वाचायला आाणि दुसर्‍यांना कळवायला?

आजकाल वेबसाईट असणे हे आवश्यकच झाले आहे. आपण मोठे श्रम घेउन वेबसाईटसाठी डाटा तयार करतो, भरपुर पैसे खर्च करुन वेबसाईट बनवूनही घेतो. मात्र बर्‍याचदा या वेबसाईटला गुगलमध्ये हवे तसे रॅंकिंग मिळत नाही. सर्च रिझल्टमध्ये साईट पहिल्या दोन तीन पानात येत नाही. त्यामुळे वेबसाईटवर व्हिजिटरपण येत नाहित.

गुगल किंवा इतर सर्च इंजिनमध्ये आपल्या वेबसाईटला वरचे रॅंकिंग मिळविण्यासाठी जे तंत्र वापरले जाते ते म्हणजे SEO. याला मराठीत लिहिण्यावाचण्याऐवजी सरळसोट SEO असंच म्हणणं उत्तम.

प्रत्येक सर्च इंजिनची काही विशिष्ट लॉजिक असतात. वेबसाईटला रॅंकिंग देताना ही लॉजिक वापरली जातात. कालानुरुप या लॉजिक्समध्ये बदलही होत असतात. त्यामुळे दोन वर्षापुर्वी ज्या लॉजिकने आपलि वेबसाईट चांगल्य रॅंकिंगमध्ये आली तीच लॉजिक आज प्रचलित असतील असे नाही. त्याचप्रमाणे आज जी लॉजिक वापरली जातील ती आणखी सहा महिन्यांनी तशीच वापरली जातील असेही नाही.

SEO हा खरंतर एक फार मोठा विषय आहे. त्यावर लिहायचं तर अनेक पानं लिहावी लागतील. मात्र गेल्या काही दिवसांत अनेकजणांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देण्याच्या निमित्ताने येथे एक साधी-सोपी टिप देतोय. आपल्या वेबसाईटवरच्या पानांची नावं कशी असावीत त्याबाबत.

आपल्या वेबसाईटवरच्या प्रत्येक पानाची URL ही वाचण्यासाठी किंवा टाईप करण्यासाठी सोपी तर असावीच पण ती सर्च इंजिनसाठीही सोपी असावी. त्यामुले आपलं सर्च रॅंकिंग वाढण्यास मदतच होईल. या URL मध्ये साधारणपणे आपल्या वेबपेजमध्ये काय लिहिलंय ते ताबडतोब समजावं. बर्‍यांचदा आपली URL वाचूनच येणारा वाचक त्या पानावरील मजकूर त्याच्या उपयोगाचा आहे किंवा नाही ते ठरवतो आणि सहाजिकच त्या पानावरील मजकूर वाचावा किंवा नाही ते ठरवतो.

तेव्हा आपल्या पुढच्या लेकाची URL अशीच सोप्पी असेल याची काळजी घ्या आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचा !!!

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 96 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..