नवीन लेखन...

‘इंडियन’ राष्ट्रीयत्वाचे कारस्थान…

माझा एक चांगला मित्र आहे, जो मूळचा कर्नाटकचा असून सध्या मुंबईचा रहिवासी आहे, भारतीय जनता पक्षाचा कट्टर समर्थक आहे, आणि त्याचा भारत महासत्ता होणार असा प्रगाढ विश्वास आहे. असा हा मित्र एक दिवस भारताच्या परिस्थितीवर बोलतांना मला म्हणाला ….

If India survives for another forty years we will never have to bother about unity of India !!!

मला त्याचा अर्थ नीट कळला नाही म्हणून मी त्याच्या कडे प्रश्नार्थक नजरने पाहिले… तेंव्हा तो मला समजावून सांगता झाला …

See …
today all important matters in India are handled through English … all good schools and colleges are English medium …

Governments, Judiciary works in English, Even Bollywood works in English, Indians have started writing and thinking in English, there are thousands of schools and institutes all over India teaching English to those who can not talk English … Everyone wants to learn and talk In English

Just wait for few decades … English is going to unite us…
India is going to be English speaking Country…!!!

माझ्या तोंडावरचे भाव त्याने वाचले … मला बसलेला धक्का त्याच्या लक्षात आला… तो बोलू लागला ..

Come on … Don’t say that you are another Language chauvinist… not ready to accept reality

त्यांनी मला एक मोठ्ठे लेक्चर ऐकवले… की जगात किती भाषा आज नामशेष झालेल्या आहेत आणि पुढे किती भाषा नामशेष होणार आहेत …

भारतात जे आज महाराष्ट्रात राहत आहेत त्यापैकी किती उत्तर भारतातून आलेले आहेत आणि ते जेंव्हा उत्तर भारतात रहात होते तेंव्हा त्यांची भाषा वेगळी होती
आणि भारतीय एकता कशी महत्वाची आहे … … वगैरे वगैरे ….

पण मी कितीही बुद्धिवादी असलो तरी मी मराठी भाषा, मराठी संस्कृती, आणि मराठी समाज यांच्या ऱ्हासाचा विचार सुद्धा करू शकत नाही… तो भाग माझ्या भावनेचा आहे आणि तिथे माझा बुद्धिवाद तोकडा पडतो हे मला मान्य आहे

नंतरच्या काळात माझ्या मित्राच्या बोलण्यातील वस्तुस्थिती जाणवायला लागली खरेच आपल्या सर्व भारतीय भाषा नामशेष व्हायला लागल्या आहेत ..

आज नवीन पिढी मराठी वापर कमी करीत आहे, त्यांचा मराठी शब्दसंग्रह कमी होत आहे…मराठी भाषेत चांगले साहित्य फार कमी प्रमाणात निर्माण होत आहे..

आणि मला हा सर्व एखादया कारस्थानाचा भाग वाटतो आहे..

अखिल भारतीय सेवा, अखिल भारतीय प्रवेश परीक्षा, अखिल भारतीय शिक्षण संस्था, अखिल भारतीय स्पर्धा परीक्षा ह्या सर्व गोष्टी भारतात सर्वात शक्तिशाली आहेत आणि त्या अखिल भारतीय असल्यामुळे त्या हिंदी अथवा इंग्रजी मध्ये आहेत. आणि सर्व अ-हिंदी भाषिकांसाठी इंग्रजी जास्त सोयीची असल्यामुळे इंग्रजीचा वापर वाढता आहे…

आज ज्या तऱ्हेने inDIA पुढे जात आहे ते पहाता महाराष्ट्र इंग्रजी भाषिक झाला तर आश्चर्य वाटायला नको ..

देवा ….. परत सर्वसाधारण लोक आणि शासन यातील दरी तीच रहाणार आहे शासन इंग्रजी भाषिक आणि सर्वसाधारण जनता मराठी भाषिक… गुलाम मराठी…

प्रश्न इतकाच आहे की आपण हे सर्व चालवून घेणार आहोत का ??? की याविरुद्ध बंड करणार आहोत ????

— मिलिंद कोतवाल
Milind Kotwal 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..