१७ – दीनदयाळू अतिव कृपाळू

दिनदयाळू अतिव कृपाळू हे श्रीगणराया होउन कनवाळू, बालावर ठेव छत्रछाया ।।   आत्मतुष्ट मी, नीतिभ्रष्ट मी, अति मी गर्विष्ठ स्वार्थपूर्ति मोहिनी चेटकिण, करते आकृष्ट यत्न न केले परमार्थाच्या मर्मा जाणाया ।।   कळत-नकळतां पळत राहिलो मृगजळ पाहुन मी हात रिक्त, विषयासक्ती झाली ना परी कमी उशीर झाल्यावर उमगे –  जीवन गेले वाया ।।   पश्चात्तापीं दग्ध […]

१६ – जीवनपथ सुकर करा

जीवनपथ सुकर करा गणदेवा हो सूखशिखरीं दु:खदरीपासुन न्या हो ।।   गडबडतो धडपडतो मी, पडतो मी बडबडतो कुढतो चिडतो रडतो मी अजुन घडा कच्चा, परिपक्व हवा हो ।।   अंध तरी, वा लोचन बंद करी मी मंदबुद्धि आहे, मदमत्त परी मी अक्षय प्रज्वलित करा ज्ञानदिवा हो ।।   नि:पाता माझ्या मनिंची चंचलता निश्चल मन होइ, नाम […]

१४ – मुखीं शुभनाम गणेशाचें

करते वाणी गुणवर्णन शिवगौरीतनयाचें सुखात वा दु:खात मुखीं शुभनाम गणेशाचें ।।   चाचपडत ठेचाळत हें जीवन गेलें वाया आतुर झालो व्याकुळलो मी तुजला भेटाया काया-वाचा-मनें सुरूं आवर्तन नामांचें ।।   सिद्धी-प्रसिद्धीआस नको, कटिबद्ध तुला ध्याया सिद्धीविनायका ये मज अध्यात्मबुद्धि द्याया वृद्धिंगत होतील जीवनीं क्षण आनंदाचे  ।।   शोध संपु दे, गणपतिराया, मजपुढती येई अंत:चक्षू उघडुन आत्मज्ञानबोध […]

१२ – गणराया, आनंदाचें धाम

हे गणराया, गौरीतनया, आनंदाचें धाम हे लंबोदर, करुणाकर, माझा स्वीकरी प्रणाम  ।।   संपते न वाट, होई न पहाट ; मज जाणें पैलथडी आलोक तूंच, तम रोख तूंच, मम ज्ञानचक्षु उघडी मिळतात सुखें, मिटती दु:खें, घेतांच तुझें शुभनाम ।।   आदि ना अंत तुज, एकदंत, तूं विश्वाची शक्ती नाशतोस खल, तूं सुजनां देतोस सकल,  मुक्ती स्वानंऽद […]

११ – तूं नियतीचा अधिपती

तूं सुखकारी, तूं विघ्नारी,  तूं नियतीचा अधिपती हे गुणदाता, पार्वतीसुता, आधार तूंच जगतीं  ।।   जे खलबुद्धी, सरळ ना कधी, तूं ताडसि त्यां दुष्टां पिडतात जनां अन् संतमनां, तूं गाडसि त्या कष्टां तूं प्रेमरूप, करुनास्वरूप, तुजमुळेच सुखदीप्ती  ।।   जोडुन हातां, टेकुन माथा, जनगण तुजला नमती फुंकून शंख, गर्जून मंत्र, जग करी तुझी आरती वाजे डंका, […]

१३ – गजाननाचे मोदक (मुक्तक)

गजाननाचे मोदक (मुक्तक)   गंधार करी अंधार गहन जगिं दूर तव अकार, अद्वैताचा साक्षात्कार सांगतो चंद्र हें, तूं अवकाशाधार तव अनुस्वार, ब्रह्मास देइ आकार । ‘गँ’ मंत्र तुझा, तेजसी-शक्ति-भांडार हें ओंकारा, प्राणांत तुझा हुंकार  ।। – ब)       ‘गंधारा’पुढती तुझ्या, ठेंगणें गगन तव ‘निषादा’पुढे नतमस्तक रवि-उडुगण तव ‘षड्ज’ हाच एकमात्र मेरू अविचल हे ‘गणेश’, देसी तूंच सप्तलोकां […]

१० – वरद गणपती गुणद गणपती

वरद गणपती, गुणद गणपती, सुखद गणपती रे तव शुभ नामें बिकट पथा निष्कंटक करती रे   ।।   चिवट दाट भवतापकर्दमीं जीवनशकट रुते कुटिल भयप्रद संकट भेसुर विकटकास्य करते नतद्रष्ट विघ्नांचें सावट, विकटा, हटव पुरें   ।।   दुष्ट-कष्ट करतोस नष्ट तूं, हे मंगलमूर्ती दासांच्या आशांची अविरत तूं करसी पूर्ती क्लेशमुक्त होतात भक्तगण तव-गुण गाणारे   ।।   पापाचरणीं […]

९ – वर्धिष्णु कर अमुच्या सुखा

 ॐ गणपते, ब्रह्मणस्पते, हे गजमुखा विघ्नेश्वरा, वर्धिष्णु कर अमुच्या सुखा  ।। जेव्हांकधी शुभकार्य कुणि आरंभतो सर्वांआधी, मोरेश्वरा, तुज वंदतो पहिलें तुझें अर्चन सदा गणनायका  ।।   राहत उभी  अरिसंकटें भक्तांपुढे तीं नाशण्यां, हे मोरया, तुज साकडे अनवत धरा पायावरी, सुखदायका  ।।   हेरंब हे , सारे अम्ही पापी ज़री अविलंब परि वर्षव कृपा अमुच्यावरी लंबोदरा, पोटात […]

८ – प्रिय हा अती श्रीगणपती

प्रिय हा अती श्रीगणपती देव लाडका नाहीं जगीं कोणी गणेशासारखा   ।।   तुंदिलतनू,  सोंडेमधें मोदक धरी तोलीतसे भरलें तबक हातावरी एकवीस हा नैवेद्य प्रिय या गजमुखा   ।।   मांडीवरी पद ठेवुनी ऐटित बसे तोंडावरी स्मित नेहमी विलसत असे हातीं धरी निज-दंत मोहक मोडका   ।।   बांधीयलें अपुल्या कटीवर फणिधरा त्या बंधनें सांभाळिलें पीतांबरा जागा दिली पायींच […]

७ – हे गुणपते श्रीगणपते

हे प्रथमपते, शारदापते, हे शिवगिरिजापुत्रा हे गुणपते, श्रीगणपते, वंदना प्रभो स्वीकरा  ।।   वक्रतुंड, गजवक्र, मोरया, गणेश, सुखकर्ता, मंगलमूर्ती, हेरंबा, हे लंबोदर, पर्वतीसुता विघ्नविनायक, गणदेवा, प्रथमेशा ओंकार  ।। हे गुणपते, श्रीगणपते, वंदना प्रभो स्वीकरा  ।।   गणाधीश हे, महेश्वराचे तुम्ही गणाधिपती ऋध्दि-सिद्धि कर जोडुन ठाकत लवुन तुम्हांपुढती शक्ति-युक्तिचा संगम तुम्ही हे गौरीकुमरा  ।। हे गुणपते, श्रीगणपते, […]

1 2