नवीन लेखन...

राज कपूर नंतरचे एकमेव ‘शोमॅन’ निर्माता, दिग्दर्शक सुभाष घई

घई यांचा जन्म नागपूरचा, सुभाष घई यांनी हिरो’, ‘कर्ज’, ‘राम-लखन’, ‘खलनायक’ अशा चित्रपटांच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीवर दशकाभराहून जास्त काळ अधिराज्य गाजविले. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९४५ रोजी झाला.  हिंदी प्रेक्षकांची नाळ ओळखणारा निर्माता-दिग्दर्शक म्हणून सुभाष घईंची ओळख आहे. कालीचरण, कर्ज, मेरी जंग, हीरो, कर्मा, राम लखन, खलनायक, सौदागर, परदेस आणि ताल असे एकाहून एक मनोरंजक चित्रपट देणार्या घई यांचे चित्रपट म्हणजे मनोरंजनाची शंभर टक्के खात्री, असे प्रेक्षकांना वाटते.

राज कपूर यांच्या नंतर ‘शोमॅन’ या पदावर आरूढ झालेले एकमेव मा.सुभाष घई. आपल्या विशिष्ट शैलीमुळे राज कपूर नंतर दुसऱ्या शोमनचा किताब मिळवणारे मा.सुभाष घई यांना अभिनेता बनयाचे होते. ते या मतावर ठाम राहिले असते तर निराश होऊन कधीच दिल्लीला परतले असते. परंतु अभिनेता ऐवजी दिशा बदलताच हिंदी चित्रपट सृष्टितील दिग्गज दिग्दर्शकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान मिळाले. ऐंशीच्या दशकात दिलीपकुमारला विधाता, कर्मा आणि सौदागर या चित्रपटातून संधी देणारे ते पहिले दिग्दर्शक होते. आपल्याच चित्रपटातून चेहरा दाखवण्याची हौस देखील त्यांनी पुर्ण केली.

मुक्ता आर्ट्स या नावाने सुभाष घई यांची चित्रपट संस्था आहे. २००८ मध्ये मुक्ता आर्ट्स ही सुभाष घई यांची चित्रपट संस्था वळू या मराठी चित्रपटाद्वारे निर्मितीत उतरली व बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरली. उमेश विनायक कुलकर्णी दिग्दर्शित पहिला चित्रपट. वेगळा विषय, निराळ्या पद्धतीचे फिल्ममेकिंग, अतुल कुलकर्णी यांचा अभिनय, गिरीश कुलकर्णी यांचे संवाद यामुळे गाजलेला आणि अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट गाजला. चित्रपटाशी निगडित सगळी तंत्रे शिकवणारा अभ्यासक्रम आसलेली एक प्रशिक्षण संस्था आपण सुरू करावी, हे सुभाष घई यांचे स्वप्न होते. व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल या संस्थेच्या रूपाने प्रत्यक्षात आणली.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..