नवीन लेखन...

सोशल मिडीयावरुन आयएसआयएसचा प्रसार

आधुनिक तंत्रज्ञान, धार्मिक कट्टरता यांचे घातक मिश्रण

जगभरात सर्व स्तरांमध्ये ट्विटर हे लोकप्रिय माध्यम बनले आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी, हॉलीवुड-बॉलीवुड कलावंत किंवा नरेंद्र मोदींपासून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांपर्यंत अनेक नेते ट्विटरची मदत घेतात.

दिवसा नोकरी रात्री आयएसआयएस’साठी काम
इस्लामिक स्टेट इन इराक ऍण्ड सीरिया (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेचे ट्विटर अकाऊंट बंगळुरू येथून चालविणार्‍या मेहदी मसरूर बिस्वास या तरुणाच्या मुसक्या कर्नाटक पोलिसांनी आवळल्या. आपण दिवसा नोकरी करून रात्री ‘आयएसआयएस’साठी काम करायचो, अशी कबुली त्याने चौकशीत दिली.

मेहदी मसरूर (२४) हा ‘आयएसआयएस’च्या इंग्रजी बोलणार्‍या दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. त्यांना तो जगभरातील वेगवेगळी माहिती पुरवायचा. रात्रभर सगळ्या न्यूज साइट पिंजून काढून तो ‘आयएसआयएस’बद्दलची आणि त्यांना आवश्यक ती सारी माहिती गोळा करायचा.‘आयएसआयएस’चे ट्विटर अकाऊंट बंगळुरूमधून चालवले जाते, असा दावा ब्रिटनमधील ‘चॅनेल-४’ या वृत्तवाहिनीने केला होता. त्यानंतर शमी विटनेस हे ट्विटर अकाऊंट चालवणार्‍या मेहदी मसरूर बिस्वास याला बंगळुरूमधील एका अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात आयपीसीच्या कलम १२५ अन्वये देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, अवैध कारवाया प्रतिबंधक कायदा, आयटी ऍक्टमधील कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मेहदी हा पश्‍चिम बंगालचा आहे. त्याचे वडील मेकेल बिस्वास दहा वर्षांपूर्वी निवृत्त झालेले सरकारी कर्मचारी आहेत.

मेहदी मसरूर बिस्वास हा दहशतवादी कारवायांसाठी २००३ सालापासून सक्रिय आहे. आयटी-इंजिनीयरिंग शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१२ सालात तो एका बहुराष्ट्रीय मार्केटिंग कंपनीत एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीस लागला. त्याला ५ लाख ३८ हजार रुपयांचे पगाराचे वार्षिक पॅकेज देण्यात आले होते, पण दिवसा नोकरी करून रात्री तो ‘आयएसआयएस’साठी काम करत होता.त्याचे ट्विटर अकाऊंट दर महिन्याला २० लाख लोक पाहायचे व त्याचे १७ हजार फॉलोअर्स होते.

दोन तृतियांश दहशतवादी मेहदीच्या अकाऊंटचे सदस्य?
मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला मेहदीचा अकाऊंट जगभरातील जिहादींमध्ये प्रिय होता. चॅनेल फोरनुसार आयएसआयएससाठी इराक व सिरियात जाऊन युद्ध करणारे दोन तृतियांश दहशतवादी शामी विटनेस या अकाऊंटचे सदस्य आहेत. या अकाऊंटवरून आयएसआयएसच्या दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्यापासून ते त्यांच्या विचारधारेचे विविध प्रकारे समर्थन करण्यापर्यंत अनेक गोष्टी अनेक महिने सुरू होत्या. जे ब्रिटीश आयएसआयएस साठी लढण्यासाठी इराक व सिरायाला गेले, त्यांच्यामध्ये हे ट्वीटर अकाऊंट प्रिय असल्याने चॅनेल फोर याच्या मुळापर्यंत पोहोचले.

आयएसआयएस मध्ये सर्वाधिक लोकप्रिय ट्विटर खाते भारतीयाचे
अयमान अल् जवाहिरी याने आपले पुढचे लक्ष्य भारत असेल, असे गेल्या सप्टेंबरमध्ये जाहीर केले. त्याच अल्-काईदापासून फुटून निघालेल्या आयएसआयएसलाही आता भारतातही अनुयायी मिळू लागले आहेत. कल्याणसारख्या शहरांतून तरुण मुले आयएसआयएस मध्ये सामील होण्यासाठी गेली होती. इंटरनेटच्या माध्यमातून ही भरती मोहीम राबविण्यात आली होती. त्यावर कडी म्हणजे इसीस समर्थकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले ट्विटर खाते चालविणारा तरुण हा भारतीयच आहे. समाजाला सरळ अंधारयुगाकडे नेऊ इच्छिणारी अशी ही संघटना. क्रूर, हिंसक, अत्याचारी, अन्य धर्मीयांना गुलाम करणारी, हाती सापडलेल्या महिला-मुलांना लैंगिक भोगाचे साधन मानणारी आणि वर पुन्हा ते किती धार्मिक परंपरांना धरूनच आहे याची पत्रके वाटणारी ही संघटना आहे.

आयएसआयएसचा क्रूर चेहरा
सुन्नी पंथीयांची दहशतवादी संघटना आयएसआयएसचा आणखी एक क्रूर चेहरा जगासमोर आला. संघटनेने गैरमुस्लिम महिलांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासह बालकांना गुलाम म्हणून ठेवण्यासही योग्य ठरविले आहे.

पत्रकानुसार, आयएसआयएसच्या दहशवाद्यांनी अल्पवयीन मुलींवर दया दाखविण्याची मुळीच गरज नसल्याचे म्हटले आहे. गैरमुस्लिम महिला आणि बालकांची खरेदीविक्री करणे आणि त्यांना भेटीदाखल दुसर्‍यांना देण्यात काहीच गैर नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, आयएसआयएसचे दहशतवादी गैरमुस्लिम महिलांचे अपहरण करतात, मग बलात्कार करून त्यांना विकतात. केवळ महिलाच नव्हे तर निष्पाप बालकांवरही त्यांनी क्रूरता चालविली आहे. ‘शरिया’ कायदा न मानणार्‍या लोकांचे शिर धडा वेगळे करण्याचे आदेशही या पत्रकातून देण्यात आले आहेत. हे सर्व कृत्य पवित्र कुराणाचा कथित संदर्भ देत ‘अल्लाह’ ला मान्य असल्याचे दहशतवाद्यांनी म्हटले आहे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..