नवीन लेखन...

महाराष्ट्रातील दूसरे शक्तीपीठ – श्री महालक्ष्मी कोल्हापूर

महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी दुसरे व पूर्ण शक्तीपीठ आहे. श्रीमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर या जिल्ह्याचे ठिकाणी आहे .कोल्हापूरला प्राचीनकाळी गौरवाने दक्षिणकाशी म्हटले जाते असे. महालक्ष्मीचे मंदिर कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती परीसरात पश्चिमाभिमुख आहे या मंदिराचे उल्लेख ईस च्या सुरवाती पासून मिळतात. या मंदिराच्या चारी दिशांना प्रवेश दरवाजे आहेत ईस ११७८ ते १२०९ या काळात शिलाहार राजा जयसिंग व राजा सिंघल यांच्या कारकीर्दीत दक्षिण दरवाजा व येथील अतिबलेश्‍वर मंदिर यांचे काम झाले.

पश्चिमेकडील प्रवेशद्वाराला ’महाद्वार’ असे म्हणतात ईस 1218 मध्ये यादव तौलम याने हे महाद्वार बांधले. मंदिराबाहेरील खांबांवर केलेलं कोरीव काम अत्यंत रेखीव आहे . मुख्य मंदिरचे काम दगडी असून मंदिर बाहेरुन तारांकित आकाराचे आहे. सध्याच्या मंदिराचा मुख्य भाग इ. स. ६०० ते ७०० या शतका मधील असुन. नवव्या शतकाच्या कालावधीत राजा गंडवादिक्ष याने मंदिराचा जीर्नोधार केला. व येथील महाकालीचे मंदिर बांधले. मुख्य महालक्ष्मी मंदिरास एकूण पाच शिखरे आहेत. मंदिराचे मंडपास अनेक खांब आहेत. मुख्य मंदिराला जोडून गरूड मंडप आहे. मंदिराच्या गर्भगृहात दगडी चबूतऱ्यावर श्रीमहालक्ष्मीची मूर्ती उभी आहे. मूर्ती पश्चिमाभिमुख असून ती चक्रावर उभी आहे, मूर्ती काळ्या रंगाच्या शिलेपासून बनविलेली आहे. मूर्तीची उंची २ फूट ९ इंच असुन मूर्ती चतुर्भुज आहे तिचे वरच्या उजव्या हातात गदा तर डाव्या हातात ढाल आहे. खालच्या उजव्या हातात मातुलिंग व डाव्या हातात पानपात्र आहेत. मस्तकावर मुकुट असून त्यावर शेष नागाने छाया धरली आहे. उत्तराभिमुख योनी व लिंग आहे मागील बाजूस सिंह आहे. मागील बाजूचे चांदीची प्रभावळी वर चंद्रसूर्याच्या दोन आकृत्या आहेत.

महालक्ष्मी विषयी काही कथा प्रचलित आहेंत

गरुडाचल नावाचे एक मुनी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णू चे भेटीस आले, विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला, बालवयातील माधवी अजाणतेपणे विष्णू जवळ जावून बसली हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याचे तोंडाची होशील असा शाप दिला.हर ऐकून क्रोधीत झालेल्या गरुडाचलाने लक्ष्मीला तू हत्तीण होशील असा शाप दिला. हत्तीण रूपातील लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्ती साठी तपचर्या सुरु केली. ब्रह्मदेवानी तिला पापमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले. या स्थाना विषयी कोल्हासूर वधाची कथा प्रचलित आहे.

पुरातनकाळी राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवले होते. देवही त्याचे पुढे हतबल झाले होते देवांनी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्याच्या युद्धाची तयारी केली. दोघांचं घनघोर युद्ध झालं. शेवटी महालक्ष्मीने बह्मास्त्राने त्याचं मस्तक उडवलं. अश्विन पंचमीस त्याचा वध झाला. मृत्यू समयी त्याने या क्षेत्रास आपले नाव मिळावे असा वर मागितला देवीने वर देताच त्याच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरलं. त्याचे नावा वरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळाले.कोल्हासूराच्या वधानंतर आनंदोत्सवात देवदेवता,ऋषीमुनी सर्वजण आले पण त्र्यंबुली देवीला आमंत्रण देण्याचे राहून गेले. हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी इतर देवतांसह त्र्यंबुलीस पूवेर्कडच्या टेकडीवर भेटायला गेली. त्र्यंबुली रुसली होती. तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली. तेव्हा तू करवीरक्षेत्री जा. माझा राग गेला, पण मी येणार नाही. असं तिने सांगितलं. व तिने तेथेच वास केला
तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथा ही सांगितली जाते.

मंदिराचा प्रदक्षिणेचा मार्ग जवळपास स्वस्तिकाच्या आकाराचा असून सोळा काटकोनातून प्रदक्षिणा घालावी लागते. मुख्य मंदिराच्या दोन्ही
बाजूला श्रीमहाकाली व श्रीमहासरस्वती या देवींची मंदिरे आहेत.

या परिसरात सूमारे २५० देवी-देवतांची मंदिरे आहेत.

अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेपासूनचा नवरात्र उत्सव मोठा असतो. प्रतिपदेला बैठीपूजा, द्वितीयेला खडीपूजा, त्र्यंबोलीपंचमी दिवशी हत्तीच्या अंबारीतील, रथारूढ पूजा, मयुरारूढ पूजा, अष्टमीला महिषासूरमदिर्नी, सिंहवासिनी अशा रूपातील देवीच्या पूजा साकार होतात.
अष्टमीला घागरी फुंकण्या पद्धत आहे मध्यरात्रीपर्यंत धामिर्क सोहळे होतत. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशीही होमहवन, शस्त्रपूजा होते. तिरुपती मंदिराकडून आलेला शालू त्या दिवशी नेसवला जातो. दसऱ्याच्या दिवशी देवी हत्तीच्या अंबारीत बसते. संध्याकाळी तोफेची सलामी मिळाल्यावर देवीची पालखी निघते. दसरा चौकात शिलंगणाचा होणारा हा सोहळा संपन्न होतो. तिथे सोनं लुटण्याचा कार्यक्रम झाल्यावर देवीची पालखी परत मंदिराकडे निघते. व नवरात्र सोहळा संपन्न होतो.

— निखिल आघाडे

1 Comment on महाराष्ट्रातील दूसरे शक्तीपीठ – श्री महालक्ष्मी कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..