मराठी विनोद ...............२४
........NS    
आपल्या पुढारलेल्या देशाचा अभिमान सांगताना एक प्रवासी भारतीय नागरिकाला म्हणाला, ‘‘आमच्या देशात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात व पूर्ण पगार मिळवितात.’’ त्यावर भारतीय माणूस त्याला म्हणाला, ‘‘यात काय विशेष आमच्या देशातील बायका काम न करता नवरा पगार घेऊन घरी येताच त्याचा पगार घेतात तोही पूर्ण !’’‘‘रमाकाकूंना पाचवं

मूल झालं ? मग ते मिचमिच्या डोळ्याचं बसक्या नाकाचं असेल ना ?’’ ‘‘का असं का बरं ?’’ ‘‘परवाच मी वाचलं की जगाच्या जन्म दरात पाचवं मुल चीनी असतं म्हणून.’’रात्रीच्या वेळी तलावात उतरलेल्या माणसाला पाहून वॉचमनने त्याला दरडावून विचारले, ‘‘रात्रीच्या वेळी येथे पोहायला बंदी आहे. तुला माहीत नाही का ?’’ तेव्हा घाबर्‍या आवाजात तो माणूस म्हणाला, ‘‘मी पोहत नाहीये, मी बुडतोय !’’ ‘‘मग हरकत नाही.’’ वॉचमन म्हणाला.‘‘ह्यांना झोपेचा त्रास आहे. काहीतरी औषध द्या.’’ रमाबाईंनी डॉक्टरांना सांगितले. ‘‘रोज झोपताना या दोन गोळ्या तुम्ही घ्या म्हणजे शांत झोप लागेल’’ ‘‘पण मला नाही ह्यांना त्रास आहे’’ रमाबाई म्हणाल्या. ‘‘तुम्ही झोपलात की तुमच्या ह्यांचा त्रास आपोआप बंद होईल’’ डॉक्टर म्हणाले.एक नवोदित डॉक्टर पेशंटला सांगतो, ‘‘हे औषध घेतल्यावर बरे वाटते की त्रास होतो हे मला आवर्जून सांग. म्हणजे मी ही हे औषध घ्यायचे की नाही ते ठरवीन. कारण मलाही नेमका हाच त्रास आहे !’’मिनल सातव्या मजल्यावरील फ्लॅट मधून नुकतीच तळमजल्यावरील फ्लॅट मध्ये शिफ्ट झाली. हे पाहून तिच्या मैत्रिणीने कारण विचारले. त्यावर मिनल म्हणाली, ‘‘काय करणार माझ्यापुढे पर्यायच नव्हता. पूर्वी ह्यांच्याशी भांडण झाल्यावर ‘‘मी सातव्या मजल्यावरून उडी मारून जीव देईन’’ असं म्हटल्यावर ते माझी समजूत काढत. पण आजकाल मी अशी

धमकी दिल्यावर ते माझ्याकडे लक्ष सुद्धा देत नाहीत.’’लग्न झाल्यावर पहिल्याच रात्री रवि पत्नीला म्हणाला, ‘‘हे बघ मी तुझ्या पासून काहीही लपवणार नाही. कॉलेजला असताना माझे एका मुलीवर प्रेम होते आणि मी खूप धमाल करायचो. तुझ्या बाबतीत काय ?’’ त्यावर पत्नी म्हणाली, ‘‘हे पहा आपली पत्रिका तंतोतंत जुळली तर गुण नाही का जमणार ?’’सर, ‘‘आय डोन्ट नो’ चा अर्थ काय ?’’ ‘मला माहित नाही’ ‘‘सर तुम्ही एम. ए. इंग्रजी सुवर्णपदक विजेते असून तुम्हाला माहित नाही ? मग आम्हाला काय शिकवणार ?’’बस मध्ये एक दारुड्या झोकांड्या खात बसला होता. त्याच्या बाजूला एक साधू बसला होता. तो साधू त्याला म्हणाला, ‘‘अरे तू जो रस्ता निवडलाय तो सरळ नरकात जातो. तो सोडून दे तू !’’ साधूचे वाक्य ऐकताच दारुड्या कंडक्टरला ओरडून म्हणाला, ‘‘बस थांबवा मला नरकात जायचे नाहीये !’’‘‘मी कधीही कोणत्याही दडपणाला भीत नाही. परिस्थितीलाही घाबरत नाही. प्रत्येक गोष्ट मी अंतःप्रेरणा कौल देईल तसेच करतो अन् तसाच वागतो. माधव ने आपल्या मित्राला अभिमानाने सांगितले.’’ ‘‘तुझ्या बायकोचे नाव अंतःप्रेरणा आहे का ?’’ मित्राने विचारले.‘‘श्री विसरभोळे परवा घाई घाईत शर्ट न घालता बुट घालून बाहेर पडले. अन् कधी नव्हे ती मी बरोबर होते.’’
‘‘मग तुम्हाला लाज वाटली असेल नं ?’’
‘‘हो नं, बुटाला कित्येक दिवसात पॉलीश केलेले नव्हते.’’हा लेख वेबसाईटवर ऑनलाईन वाचण्यासाठी पुढील लिंक वापरा : http://www.marathisrushti.com/?article=10060


महत्त्वाची सुचना: या वेबसाईटवरील लेख आणि सर्व साहित्य हे विविध लेखकांनी लिहिलेले आहे. या सर्व लेखकांना या वेबसाईटवर हिण्यासाठी परवानगी आणि लॉग-इन दिलेला आहे. या लेखनातील मजकूराबद्दल मराठीसृष्टी व्यवस्थापन कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. लेखकांनी वापरलेला मजकूर, छायाचित्रे, रेखाचित्रे किंवा इतर कोणत्याही सामुग्रीचा वापर त्या-त्या लेखकाने स्वत:च्या जबाबदारीवर केलेला आहे. एखाद्या लेखातील मजकूर किंवा इतर साहित्यामुळे कोणत्याही प्रकारच्या स्वामित्त्वहक्काला (copyright) बाधा पोहचत आहे असे कोणा वाचकाला वाटत असेल तर यासंबंधीचा पुरेसा पुरावा जोडून मराठीसृष्टी व्यवस्थापनाशी संपर्क साधणे. मराठीसृष्टी व्यवस्थापनाची जबाबदारी केवळ संबंधीत मजकूर वेबसाईटवरुन काढून टाकणे यापुरतीच मर्यादित असेल..