नवीन लेखन...

प्रदूषण १८: यक्ष – युधिष्ठिर संवाद

बर्‍याच वेळ वाट पाहून अखेर युधिष्ठिर आपल्या भावंडांना शोधायला निघाला. दूर-दूर पसरलेल्या वाळवंटात एक हि वृक्ष दिसत नव्हता. सूर्य आग ओकीत होता. तहानेने त्याचा गळा कासावीस झाला.  अखेर  युधिष्ठिरला वाळवंटात दूर एका ठिकाणी, सरोवर   दिसले. आता पाणी मिळेल, तहान भागेल या आशेने तो त्वरित सरोवर जवळ पोहचला.  पाहतो काय, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव सरोवराच्या काठावर निष्प्राण पडलेले होते. हे बघून युधिष्ठिर दुखी झाला. त्रिलोक विजयी भीम आणि अर्जुनाची हि दशा कुणी केली असावी. बहुतेक सरोवराच्या रक्षक  यक्षाचे काम असावे. त्याची आज्ञा घेता बिना तहानलेल्या भावंडानी पाणी पिऊन तहान भागवली असेल, म्हणून यक्षाने त्यांना दंडित केले असेल. युधिष्ठिराने यक्षाचा पुकारा केला, हे यक्ष, तुम्ही दयाळू आहात, या वाळवंटात पाण्याचे संरक्षण करून, प्रवास करणाऱ्या लोकांची तहान भागविण्याचे पुण्य कार्य करीत  आहात.  माझ्या भावंडांच्या हातून  चूक झाली त्यांना क्षमा कर.
युधिष्ठिरचा पुकारा ऐकून यक्ष प्रगट झाला. युधिष्ठिराने  यक्षास प्रणाम केला आणि आपल्या भावंडांच्या प्राणाची भीक मागितली.  यक्ष म्हणाला, युधिष्ठिर मी कोण क्षमा करणारा? तुझी तहानेने व्याकूळ भावंडे या सरोवरावर आली. त्यांनी पाणी पिण्यासाठी माझी आज्ञा हि मागितली. पण या सरोवराचे पाणी अत्यंत दूषित आणि विषाक्त असल्यामुळे, मी नकार दिला.   पण त्यांनी माझे ऐकले नाही. पाणी प्राशन केले व मृत्यूमुखी पडले. युधिष्ठिराने पुन्हा हात जोडून विनंती केली, यक्षदेव आपलं सर्वज्ञ आहात, यावर काही उपाय असेल. हो पूर्वी हिमालयात संजीवनी बुटी मिळायची. तीच आणून हनुमानाने लक्ष्मणाचे प्राण वाचविले होते. पण आज  हिमालयावर एक वृक्ष हि नाही,  संजीवनी बुटी मिळण्याचा प्रश्नच येत नाही.  क्षणभर थांबून त्याने युधिष्ठिराला विचारले, जीवनाचे अखेरचे सत्य काय आहे. युधिष्ठिर म्हणाला, मृत्यू हेच जीवनाचे शेवटचे सत्य आहे. यक्ष जोरात अट्टहास करत म्हणाला, युधिष्ठिर तुला जीवनाचे सत्य माहित आहे, हे चांगलेच. तुझे बंधू काही जिवंत होऊ शकत नाही. इथे दूर-दूर पिण्यालायक पाणी हि नाही.  तुझ्या समोर दोनच मार्ग आहेत. एक  या सरोवराचे विषाक्त पाणी पिऊन तुला काही क्षणातच  मृत्यू मिळेल किंवा दुसरा तहानेने तडफडत तुला मृत्यू भेटेल. यक्ष अदृश्य झाला. युधिष्ठिराने काही वेळ विचार केला, मरण निश्चित आहे तर भावंडासोबत मेलेले बरे. युधिष्ठिराने विषाक्त पाण्याचे प्राशन केले, त्याची तहान शांत झाली. काही क्षणात  तो हि निष्प्राण झाला.
पाच हि पांडव सरोवराच्या काठावर निष्प्राण पडले होते. महाभारताचा अवेळीच अंत झाला. सत्याची असत्या वर नव्हे तर प्रदूषणाची मानवावर विजय झाली.

टीप: हे भविष्याचे सत्य आहे, दहा-वीस वर्षानंतर विषाक्त पाणी पिऊन सर्वात जास्त लोक मारतील. पाण्यासाठी होणारे  गृहयुद्ध/युद्ध  आपल्या डोळ्यांसमोर पाहू.

— विवेक पटाईत 

(श्री सुभाष स. नाईक यांच्या यक्ष या हिंदी कवितेची  प्रेरणा घेऊन लिहिलेली गोष्ट – त्यांनी मोठ्या मनाने त्यांच्या कवितेंच्या आधारावर क्षणिका,लेख इत्यादी लिहायला अनुमती दिली आहे).

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..