नवीन लेखन...

पद्मीनी कोल्हापुरे

अभिनयाबरोबच गाणं गाण्याची आवड असणारी अभिनेत्री म्हणजेच पद्मिनी कोल्हापुरे, असं म्हणता येईल. त्यांचा जन्म १ नोव्हेबर १९६५ रोजी झाला. गायनाची आवड असणा-या पद्मिनीने लहानपणापासून अनेक सिनेमांमध्ये गाणी गायली आहेत. लहान असतानाच आपल्या बहिणीबरोबर त्यांनी ‘यादोंकी बारात’,‘दुष्मन दोस्त’ या चित्रपटांसाठी गाणी गायली. राज कपूर यांच्या १९७७ साली आलेल्या ‘सत्यम, शिवम, सुंदरम’ या सिनेमामध्ये त्यांनी केलेली भूमिका खूप गाजली. लहानपणी ‘साजन बिना सुहागन’, ‘जिंदगी’ आणि ‘गेहराई’ या सिनेमामध्ये त्यांनी अभिनय केला असून मोठेपणी ‘दो दिलो की दास्तान’, ‘विधाता’, ‘सौतन’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘इन्साफ का तराजू’ या सिनेमांमधून भूमिका साकारल्या. २००४ साली ‘चिमणी पाखरं’ आणि ‘मंथन’ या दोन सिनेमांमधून त्यांनी रूपेरी पडद्यावर पुनरागमन केलं होतं. मराठी, हिंदी भाषेतील सिनेमांबरोबरच त्यांनी काही मल्याळम चित्रपटांतसुद्धा अभिनय केला आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..