पश्चिमी तत्त्वज्ञानाचे व्यासंगी मे पुं रेगे

मे.पुं रेगे हे व्यवसायाने ‘तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. त्यांची महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त होते. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्टय़े होती. महाराष्ट्राच्या तत्त्वज्ञानिक आणि वैचारिक क्षेत्रात आपला निर्वविाद ठसा उमटवलेल्या मोजक्या अभ्यासकांमध्ये रेगे यांचा समावेश होतो. भारतीय आणि पाश्चात्त्य या दोन्ही तत्त्वज्ञानांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. या दोन्ही विचारपरंपरांची अतिशय साधार, स्पष्ट आणि विश्लेषणात्मक मांडणी करण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत होते. रेगे यांच्याविषयी महाराष्ट्रातील लेखन-वाचन व्यवसायाशी निगडित असलेल्या अनेकांना नितांत आदर आणि कुतूहल असते. त्यांनी महाराष्ट्राला कुठलाही नवीन विचार दिला नाही, विचार कसा करावा याविषयीही त्यांनी काही सांगितले नाही; पण त्यांनी गंभीर लेखनासोबत ‘विश्वकोश’, ‘नवभारत’ यांचे प्रत्यक्ष काम करून आपल्या चिंतनशील प्रकृतीला क्रियाशीलतेचीही जोड द्यायची असते, या विसाव्या शतकातील ज्ञानपरंपरेचा वारसा सक्षमपणे चालवला.

मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी भाषकांना पश्चिमी तत्त्वज्ञान परंपरेचा मुक्तपणे परिचय करून दिला. पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास हा त्यांचा पश्चिमी तत्त्वज्ञानाचा ग्रंथ ज्यांनी वाचला असेल त्यांना याची खात्री पटेल. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ट्ये होती. त्यांनी काही काळ ‘नवभारत’ आणि ‘क्वेस्ट’ या मासिकांचेही संपादन केले. ‘नवभारत’मध्ये त्यांनी संपादकीय, लेख, पुस्तक परीक्षणे अशा विविध स्वरूपांचे लेखन केले. त्याचबरोबर तत्त्वज्ञानावरील पाठय़पुस्तकांचेही लेखन केले.

‘इहवाद आणि सर्वधर्मसमभाव’, ‘विवेक आणि न्याय : आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधनपर्व’, ‘विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा’, ‘स्वातंत्र्य आणि न्याय’, ‘िहदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन’ ही त्यांची स्वतंत्र पुस्तके आहेत, तर ‘पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास’ या पुस्तकात नावानुसार पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास आहे. रेगे यांचे ‘मर्मभेद’ हे संपादित पुस्तक त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाले. मे.पुं. रेगे हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष होते. मे.पुं रेगे यांचे २८ डिसेंबर २००० रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेटमहासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

50-chandrabhaga

पंढरपूरची चंद्रभागा नदी

भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ...
p-2281-kadav-ganpati-temple

दिगंबर सिद्धीविनायक, कडाव

कर्जत तालुक्यातील कडाव गावामधील हे बाल दिगंबर गणेशाचे अतिप्राचीन मंदिर ...
p-2062-Ralegan-Siddhi-04

पर्यावरण संवर्धक राळेगणसिध्दी

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिध्दी हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर ...
marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...

Loading…

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 1712 लेख
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*