आर.डी. बर्मन यांचे रिदम ऍरेंजर मारुतीराव कीर

मारुतीराव कीर यांनी आपले करियर तबला वादक म्हणून सुरू केले. त्यांचे गुरु होते भानुदास मानकामे, भैरव प्रसाद, सुंदर प्रसाद आणि उस्ताद गेमखान साहब होते. मारुती राव कीर यांनी शंकर जयकिशन यांच्या व्यतिरिक्त जवळजवळ सर्व संगीत दिग्दर्शकांच्या बरोबर काम केले. जवळजवळ सर्व जुन्या मराठी चित्रपटांमधून आणि नॉन-फिल्मच्या गाण्यांमध्ये मारुती राव कीर यांनी तबला वाजवला आहे. मारुती राव कीर यांनी आधी एस.डी बर्मन यांच्या साठी आणि नंतर आर.डी बर्मन यांच्या साठी शेवटपर्यत रिदम असिस्टट म्हणून काम केले.

तबलावरील त्यांची निपुणता “पिया तोसे नैना लेगे रे” या गाण्यात दिसते. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या काळात मारुतीराव आणि पंचम यांची मैत्री झाली व ती शेवट पर्यत टिकली. पंचमच्या यांच्या पहिल्या चित्रपट “छोटे नवाब” पासून मारुतीराव कीर रिदम ऍरेंजर व जवळचा मित्र म्हणूनच राहिले. पंचम यांचे इतर सर्व संगीत दिग्दर्शकांमध्ये सर्वात जास्त फॅन आहेत. यासाठी मारुतीराव कीर यांना हे क्रेडीट द्यावे लागेल. पंचम आणि मारुतीराव कीर हे नेहमी रीद्मच्या काहीतरी नवीन शोधात असत, नवीन इन्स्ट्रुमेंटची ओळख करून घेत असत, मारुतीराव कीर यांनी पंचम यांना एकदा टुम्बा या वादयाची कथा सांगितली, जेव्हा पंचम आणि मारुतीराव कीर त्यांच्या ग्रुपसह आफ्रिकेत शो साठी गेले होते. तेथे त्यांनी टुम्बा नावाचे हे आफ्रिकन वाद्य पाहिले.

पंचम यांनी मारुतीराव कीर यांना ते वाद्य कसे वाजते हे दाखवण्यास सांगितले मारुतीराव कीर उभे राहिले व सराईत वादकासारखे टुम्बा वाजवून दाखविले, ही खरोखरीच कमाल होती. पंचम यांनीच टुम्बा याला भारतात आणले, व भारतात वाजवण्याचा पहिला मान मारुतीराव कीर यांना जातो. मारुतीराव कीर यांनी टुम्बाचा पहिल्यादा मनोरंजन चित्रपटात “आया हु मै तुझे ले जानुगा” या गाण्याच्या साठी वापर केला. या चित्रपटाचे दिग्दर्शक शम्मी कपूर होते. अनेक दशके त्यांनी रिदम ऍरेंजर म्हणून हिंदी चित्रपटसृष्टी गाजविली. लतादिदी, आशा भोसले यांच्या अनेक गीतांचा रिदम मारूती कीरांनी ऍरेंज केला.
मारुतीराव कीर हे एवढे मोठी व्यक्ती असून शेवट पर्यत साधे राहिले. दादरमधील आपल्या १० × १२ च्या रूम मध्ये ते राहत. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. त्यांचा पहिला विद्यार्थी अमृतराव काटकर होते. मारुतीराव कीर यांच्या मुळे पंचम यांचे बहुसंख्य तालवादक अण्णा जोशी, अमृतराव, मान्या बर्वे, नाईक,असे मराठी माणसेच होती.

मारुतीराव कीर व पंचम यांची एवढी मैत्री होती की पंचम यांच्या निधना नंतर त्यांनी रेकॉर्डिंग बंद केले होते. मारुतीराव कीर यांचे निधन ११ जानेवारी २०५५ रोजी झाले.

मारुतीराव कीर यांच्या स्मरणार्थ दर वर्षी हिंदी गीते, ढोलकी जुगलबंदी, सोलो वादनाची संगीत मैफील ‘स्मृतिगंध’ म्हणून रत्नागिरीत आयोजित केली जाते.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेटमहासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

50-chandrabhaga

पंढरपूरची चंद्रभागा नदी

भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ...
p-2281-kadav-ganpati-temple

दिगंबर सिद्धीविनायक, कडाव

कर्जत तालुक्यातील कडाव गावामधील हे बाल दिगंबर गणेशाचे अतिप्राचीन मंदिर ...
p-2062-Ralegan-Siddhi-04

पर्यावरण संवर्धक राळेगणसिध्दी

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिध्दी हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर ...
marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...

Loading…

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 1690 लेख
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*