कवी शांताराम नांदगावकर

“हृदयी वसंत फुलताना’ यांसारखी सतत ओठावर खिळणारी गाणी देऊन रसिकांना उत्साहात ठेवणारे गीतकार म्हणून कवी मा.शांताराम नांदगावकर यांची ओळख होती.

सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणाऱ्या आणि मनाचा ठाव घेणारी गीते देणारे ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर हे मूळचे कोकणातील नांदगावचे.   त्यांचा जन्म १९ आक्टोबर १९३६ रोजी झाला. शांताराम नांदगावकर यांचे शालेय शिक्षण दादरच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले.

‘पाहिले न मी तुला’, ‘प्रथम तुला वंदितो’, ‘ही नव्हे चांदणी’, ‘दाटून कंठ येतो’, आदी त्यांची गीते विशेष गाजली. अष्टविनायक,’नवरी मिळे नवर्याीला’, ‘बनवा बनवी’, पैजेचा विडा आदी मराठी तसेच हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले होते. श्रोत्यांच्या ओठावर खेळतील अशा सहजसुंदर काव्यरचना हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

चित्रपटगीतांबरोबरच बालगीते, भावगीते व लोकगीतेही आणि भक्तीगीतेही लिहिली. ‘ससा तो ससा’ हे बालगीत आजही मुलांना वेड लावते.

क्रिकेटपटू मा.सुनील गावसकर यांनी म्हटलेले, ‘या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला…?’ हे गीतही त्यांचेच. चित्रपटसृष्टीत ‘डॅडी’ या नावाने परिचित असलेले शांताराम नांदगावकर १९८५ मध्ये शिवसेनेतर्फे विधान परिषदेवर निवडून गेले होते.

शांताराम नांदगावकर यांचे ११ जुलै, २००९ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेटमहासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...
p-539-harihareshwar-kalbhairav-temple-shiva-temple

श्री श्रीहरिहरेश्वर

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील श्रीहरिहरेश्वर हे पुरातन धार्मिक स्थळ ...
bhau-daji-lad-sangrahalay

भाऊ दाजी लाड संग्रहालय

मुंबई शहरात इ.स १८५८ साली व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाप्रीत्यर्थ हे संग्रहालय ...
p-495-shirishkumar-smarak

शहीद शिरीषकुमारांचे नंदुरबार

महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमेजवळ वसलेले  नंदुरबार हे खानदेशातील एक ...

Loading…

संजीव वेलणकर
संजीव वेलणकर यांच्याविषयी... 1131 लेख
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
संपर्कः फेसबुक

पहिला अभिप्राय नोंदवा

अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.


*