मराठीतली विलोमपदे

Marathi Palindrome

Palindrome म्हणजे असा शब्द, वाक्प्रचार , वाक्य किंवा कोणतीही अर्थपूर्ण अक्षररचना जी शेवटाकडून सुरूवातीकडे वाचत गेलं तरी बदलत नाही.

इंग्रजीत Palindrome ची रेलचेल आहे. पण मराठीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. लहानपणी तर दोन तीनच माहित होते.

१) चिमा काय कामाची
२) ती होडी जाडी होती.
३) रामाला भाला मारा.

पण अलिकडे कळलं की मराठीत Palindrome ला ‘विलोमपद’ असा शब्द आहे, आणि मराठीतली विलोमपदे देणारं चक्कं एक Android app (Marathi Palindromes नावाचं) सुद्धा आहे. ही म्हणजे हाईट झाली, मराठीची इंग्रजीशी लय भारी फाईट झाली.

मराठी धावत नसली तरी एक एक ‘पाऊल पडते पुढे’ हे, तुम्ही काही म्हणा, पण अगदी Like करण्यासारखं आहेच.

आता ही मराठी विलोमपदे बघा (नया है यह हं !)

१) टेप आणा आपटे.
२) तो कवी ईशाला शाई विकतो.
३) भाऊ तळ्यात ऊभा.
४) शिवाजी लढेल जीवाशी.
५) सर जाताना प्या ना ताजा रस.
६) हाच तो चहा

आणखी काही विलोमपदे, आय मीन, पॅलिनड्रोम्स माहित आहेत का कोणाला?

उलट-सुलट दोन्ही कडून वाचा

१. चिमा काय कामाची
२. भाऊ तळ्यात ऊभा
३. रामाला भाला मारा
४. काका, वाचवा, काका
५. काका, वाहवा ! काका
६. ती होडी जाडी होती
७. तो कवी डालडा विकतो
८. तो कवी मोमो विकतो
९. तो कवी सामोसा विकतो
१०. तो कवी कोको विकतो
११. तो कवी ईशाला शाई विकतो
१२. तो कवी रीमाला मारी विकतो
१३. तो कवी वामाला मावा विकतो
१४. तो कवी व्हिटी ला टिव्ही विकतो
१५. तो कवी विकीला किवी विकतो
१६. तो कवी चहाच विकतो
१७. तो कवी का विकतो?
१८. तो कवी लिली विकतो
१९. तो कवी ऊमाला माऊ विकतो
२०. तो कवी ठमाला माठ विकतो
२१. तो कवी कणिक विकतो
२२. तो कवी बेड व डबे विकतो
२३. तो कवी ठमीला मीठ विकतो
२४. मराठी राम
२५. तो कवी चक्काच विकतो
२६. तो कवी हाच चहा विकतो
२७. तो कवी राशीला शिरा विकतो
२८. तो कवी टोमॅटो विकतो
29. या सुतार दादा दार तासुयामराठीतली विलोमपदे वर १ अभिप्राय

 1. नमस्कार.
  # तुमचा विलोमपदांवरील लेख वाचला, आवडला. त्याने मला माझ्या लहानपणची आठवण आणून दिली. त्या काळी, आमचे फेव्हरिट होते : रामाला भाला मारा, चिमा काय कामाची, तो कवी डालडा विकतो.
  कवीने डालडा विकण्याबद्दल सर्वांनाच मौज वाटत असे.
  # तुमच्या यादीतील काही काही मला नवीन आहेत.
  # त्यावेळचे आणखी एक वाक्य आठवले. ते विलोमपद (उलट-सुलट एकच) नाही; मात्र मजेदार आहे. तुम्हाला व इतरांना ते माहीतही असेल.
  ते आहे : ‘ नकादुचेण्यापकासकेचेयांसणीपटिकयनाविरकधुम ’.
  हे उलट करून वाचले तर असे होते : ‘ मधुकर विनायक टिपणीस यांचे केस कापण्याचे दुकान ’.
  स्नेहादरपूर्वक
  सुभाष स. नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…