नवीन लेखन...

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायक मन्ना डे

प्रबोधचंद्र डे असे मूळ नाव असलेल्या मन्ना डे यांचे काका के.सी.डे हे संगीतातील तज्ञ. त्यांचा जन्म १ मे १९१९ रोजी झाला. त्यांनी एस.डी. बर्मन यांना संगीताचे धडे दिले होते व अनेक हिंदी व बंगाली चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले होते. मन्ना डे यांनी त्यांच्याकडून संगीताचे धडे ही त्यांना मिळाले.त्यामुळे लहानपणीही त्यांनी बालकलाकार म्हणून लौकीक प्राप्त केला होता. शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद अमान अली खान व उस्ताद अबदुल रहमान खान यांच्याकडून त्यांनी घेतले.

पार्श्वगायनाची सुरवात त्यानी १९४२ मधील ’तमन्ना’या चित्रपटापासून केला.’तमन्ना’चे संगीत दिग्दर्शक के.सी.डे हेच होते मन्ना डे यांनी सुरैय्याबरोबर “जागो आयी उषा “हे युगलगीत गायिले होते. मन्ना डे ची खरी ओळख त्यांच्या “बसंत बहार ” मधील “सुर ना सजे” मुळे तसेच “श्री चारसौबीस”मधील “प्यार हुआ “सीमा मधील”तू प्यारका सागर है””दो आंखे बारह हाथ”मधील “ऐ मालिक तेरे बंदे हम” किंवा “लागा चुनरीमे दाग” अश्या निवडक गीतातूनच झाली.राजकपूरसाठी त्यांचा आवाज काही चित्रपटातून वापरला गेला व तो योग्यही वाटला.

शास्त्रीय संगीतावर आधारित गीते म्हणण्याविषयी कुशल अशी प्रसिद्धी असूनही मन्ना डे यांची अवखळ गीतेही तितकीच प्रसिद्ध झाली.विशेषत: रफी यांच्याबरोबर गायलेले परवरिश चित्रपटातील “मामा ओ मामा”किंवा चलतीका नाम गाडी”मधील “बाबू समझो इशारे” किंवा “पडोसन” मधील किशोरकुमारबरोबर गायलेले “एक चतुर नार” ही गीते त्याची साक्ष देतात. मन्ना डे यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली भाषेत गाणी गायली आहेत.

मराठी भाषेत गायलेल्या त्यांच्य गीतांची संख्या इतर कोणाही मराठी गायकाच्या (एक बाबूजी सोडले तर) तोडीस तोड आहे. त्यांनी ५५ मराठी गाणी गायली आहेत ” अ आ आई म म मका, धुंद आज डोळे”. त्याचबरोबर “घन घन माला नभी ” ही त्यांची गाजलेली चित्रपटगीते.”घरकुल” चित्रपटातील “हाउस ऑफ बांबू”हे वेगळ्या शैलीचे गीतही लोकांनी खूपच डोक्यावर घेतले होते. सर्व संगीत दिग्दर्शकांबरोबर गीते गायलेल्या मन्ना डे यांनी नौशाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मात्र गायलेले दिसत नाही कदाचित मोहंमद रफी हे नौशाद यांचे आवडते गायक असण्याचा परिणाम असावा व त्यांच्यानंतर महेंद्र कपूर यांच्यावर नौशाद यांची भिस्त होती असे दिसते.

मन्ना डे यांच्या गायनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा शास्त्रीय पाया. शास्त्रीय ढंगाची गाणी ते अशी काही खुलवत की काही विचारू नका. याबाबतीत ते एकमेवाद्वितीयच म्हणावे लागतील. लोकसंगीताचा बाज असणारी गाणीही ते तितक्याेच सहजतेनं, लीलया गात असत. फुलवत असत. मन्ना डे यांच्या आपल्या “ट्रेडमार्क‘ टोपी बद्दल मन्ना डे नी लिहिले आहे. एकदा ऐन डिसेंबर महिन्यात गाण्यांच्या कार्यक्रमासाठी काश्मीहरला गेलो होते. त्या वेळी केवळ थंडीच नव्हती, तर बर्फ देखील पडत होता.

व्यासपीठावर आल्यानंतर कडाक्या च्या थंडीत गाणी म्हणायची कशी, असा प्रश्नल माझ्यापुढे उपस्थित राहिला. माझ्या चेहऱ्यावरची अस्वस्थता पाहून चाहत्याने तत्काळ व्यासपीठावर येत त्याने मला आपली टोपी भेट दिली. चाहत्याच्या प्रेमाने मी भारावून गेलो. थंडी पळून गेली आणि कार्यक्रम सुरळीत पार पडला. मा.मन्ना डे यांचे २४ ऑक्टोबर २०१३ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

मन्ना डे यांची गाजलेली काही गाणी
प्यार हुआ…, दिल का हाल सुने… (श्री ४२०)
तू प्यार का सागर है (सीमा)
ना तो कारवॉं की तलाश है (बरसात की रात)
लागा चुनरी में दाग (दिल ही तो है)
ऐ मेरे प्यारे वतन (काबुलीवाला)
जिंदगी कैसी है पहेली (आनंद)
घन घन माला नभी दाटल्या (वरदक्षिणा, मराठी)
अ आ आई (एक धागा सुखाचा, मराठी)
यारी है ईमान मेरा (जंजीर)
ए मेरी जोहराजबी (वक्त)
यशोमती मैया से (सत्यम शिवम्‌ सुंदरम्‌)
पुछो ना कैसे मैंने रैन बिताई (मेरी सूरत तेरी आँखे)
ए भाय जरा देख के चलो (मेरा नाम जोकर)
कसमे वादें प्यार वफा सब (उपकार)
ये दोस्ती (शोले)
चलत मुसाफिर मोह लियो रे (तिसरी कसम)
चुनरी संभाल गोरी (बहारों के सपने)

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..