नवीन लेखन...

लोकमान्य टिळक, भाऊ रंगारी आणि गणेशोत्सव

हल्ली बराच चर्चेत असणारा विषय त्यामुळे आपणही या विषयावर काहीबाही खरडावे असे वाटल्यामुळे हा छोटेखानी लेख…!!

या लेखाचे दोन भाग आहेत एक म्हणजे उत्सव म्हणजे काय आणि दुसरे म्हणजे एखादा उत्सव हा कोणत्या कारणासाठी सुरु केला गेला. सर्वप्रथम ‘उत्सव’ या शब्दाची अशी ढोबळ व्याख्या करता येईल की ‘उत्सव म्हणजे एखाद्या धार्मिक कार्यात जेव्हा संपूर्ण समाजाला सामायिक केले जाते, आणि जो साजरा केल्याने मनाला समाधान मिळते असा दिवस किंव क्षण.’ एखादी गोष्ट मी स्वतापुर्ती मर्यादित ठेवली आणि ४ लोकांना एकत्र करून जर तो साजरा केला तर तो उत्सव होईल का यात थोडे मतभेद होऊ शकतात.

हल्लीचा जो hot topic आहे तो म्हणजे गणेशोत्सव कुणी साजरा करायला सुरुवात केली…?? एक- दोन पुस्तकात श्री. भाऊ रंगारी यांचा उल्लेख मिळतो की श्री. भाऊ रंगारी यांनी सुरुवात केली तर काही इंग्रजी लेखकांच्या पुस्तकात श्री. लोकमान्य टिळक यांनी या उत्सवाची सुरुवात केली असे लिहिलेले आढळून येते. इथे जर पाहायला गेलो तर श्री. भाऊ रंगारी यांचा असा उद्देश कुठेही दिसत नाही की या उत्सवाला लोकचळवळीचे स्वरूप द्यायचे म्हणून त्यामुळे फार फार तर घरातल्या गणपतीला दारात आणून बसवला असे या कृतीचे वर्णन करता येईल.

लोकमान्य टिळकांनी हेच याला लोकचळवळीचे रूप दिले आणि त्यासाठी कोणतेही पुरावे द्यायची गरज मला तरी वाटत नाही…! काही जण यासाठी केसरीच्या एका लेखाचा पुरावा देतात, माझ्याकडे तो लेख नाही त्यामुळे त्यावर काही बोलणार नाही..

The Myth of the Lokamanya: Tilak and Mass Politics in Maharashtra- By Richard I. Cashman या पुस्तकात गणेशोत्सवाबद्दल बऱ्यापैकी लिहिलेले आढळून येते. या पुस्तकात “The Political Recruitment of God Ganpati’ या नावाने चक्क काही पानेच खर्ची घातली आहेत. (पृष्ठ क्रमांक. ७५) या लेखाची सुरुवात करतानाच हा इंग्रजी लेखक केसरीच्या ८ सप्टेंबर १८८६ च्या पत्राचा दाखला देतो.

“Why Shouldn’t we convert large religious festivals into mass political rallies?” या प्रश्नातून टिळकांचे विचार लगेचच कळून येतात. या पुस्तकात अजून एक महत्वाचा उल्लेख दिसून येतो.

लेखक म्हणतो की, “With the accession of Peshwa, Ganesha Enjoyed official Patronage, and in the reign of of Madhavrao (1761-72) the celebration became a lavish PUBLIC AFFAIR which lasted six days”

पेशवे यांच्या संदर्भाचा आपल्या मराठा कागदपत्रात कुठे उल्लेख येतो का हे पाहण्यासाठी सरदेसाई यांनी छापलेले पेशवे दफ्तर चाळून काढले तर त्यात एखा खंडात स्पष्ट उल्लेख मिळाला..!

पेशवे दफ्तर खंड १८ मध्ये हे पत्र छापले आहे. यात स्पष्ट उल्लेख आहे की “श्रीगणपती उछाहाची बिदाई लोकांस..” यापुढे कोणत्या माणसांस किती बिदागी दिली याची यादी आहे.

संदर्भ-
१. पेशवे दफ्तर
२. The Myth of the Lokamanya: Tilak and Mass Politics in Maharashtra- By Richard I. Cashman

साभार- इतिहासाच्या पाउलखुणा

— गणेश कदम 

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..