नवीन लेखन...

कठोर शिक्षा – भाग १

“अरे…..! तू नानू नां रे ?”

कोणीतरी पाठीमागून हांक मारली आणि नानूच्या  पाठीवर थाप मारली.

सुविख्यात वकील श्री. नारायण – (ऊर्फ नानू)  प्रभु याला अशी सलगी मुळीच आवडली नाहीं. तो कामात गर्क होता. इतर वकीलांबरोबर कोर्टाच्या प्रतीक्षालयात  (Common Room मध्ये) बसून आजच्या कामाचा आढावा घेत होता.  त्याची पाठ दाराकडे होती म्हणून कोण हांक मारत होतं ते आधी समजलं नाहीं. त्याने पाठ वळवली आणि त्याला ओळख पटली. इतर वकीलही माना वळवून पाहूं लागले.   ।।

“ओ हो !,  राऊत सर?”  नानू म्हणाला.

राऊत सरांना आपली चूक समजली. “माफ करा वकील साहेब, मी तुम्हांला घरगुती नांवाने हांक मारली.” त्यांनी हात जोडून आपली दिलगिरी व्यक्त केली.

“हरकत नाहीं, राऊत सर, तुम्ही मला नानू म्हणूं शकतां. पण आत्ता मी खूप कामांत आहे. आपण दुपारी  एक वाजतां इथेच भेटूं “ असं म्हणत नानू वकील कोर्टाकडे धावला.

ठरल्या प्रमाणे नानू वकील एक वाजतां आला. राऊत सर वाट पहात होते.

“ सौरी सर, तुम्हाला वाट पहावी लागली, पण आत्ता मला भूक लागली आहे. आपण काहींतरी खाऊ. आणि सविस्तर बोलूं”

असं म्हणत नानूने सरांना कॅन्टीनकडे नेलं.

“ अरे, आज संकष्टी.  माझा उपास आहे.“ राऊत सर म्हणाले.

“हो, पण उपासाला साबुदाण्याची खिचडी चालते. इथे छान बनवतात. मला आवडते”

असं म्हणत नानूने दोघांकरता साबुदाण्याची खिचडी आणि कौफी मागवली.

राऊत सरांनी एका झटक्यांत खिचडी संपवली. ते कित्येक दिवसाचे उपाशी असावेत असं नानूला वाटलं.

अजून एक बशी खिचडी मागवावी असं नानूला वाटलं. पण त्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावेल असं वाटलं.

“हं . आत्ता बोला. इकडे कोर्टात काय काम काढलंत?   कोणाला भेटायचंय? मी मदत करूं?”

राऊत सरांनी मुकाट्याने आपल्या  कापडी पिशवीत हात घातला आणि एक कागद नानूला दिला.

नानूने त्या कागदातला मजकूर वाचला आणि त्याच्या कपाळावर आंठ्या पसरल्या.

“ ही सीरीयस केस आहे. तुम्ही वकील नेमला आहे कां,? “ नानूने विचारलं.

:” मी इथे कोणा वकीलाला ओळखत नाही आणि वकिलाची फी मला परवडणार नाही. माझ्या नशीबाने तूच मला भेटलास, तूच मला यातून सोडव “ असं म्हणतांना सरांच्या आवाजातला कंप जाणवला.

इतक्यात समोरून चंद्रकांत जोशी नांवाचा नानूचा ज्यूनियर वकील येतांना दिसला.

“ ए चंदू, इकडे ये”  नानूने हांक मारली, चंदू आला. नानूने त्याला सूचना दिल्या. नोटांचं पुडकं दिलं.

“तुम्ही निर्धास्त रहा, सर “  नानूने आश्वासन दिलं.

 

दुपारच्या सत्रांत केस सुनावणीला  “श्री. माधव देशमुख” जज साहेबांपुढे आली.

“रघुनंदन राजाराम राऊत “  पुकारा झाला.

राऊत सर साक्षीदाराच्या कठड्यात उभे राहिले.

“ Your Honor !, श्री रघुनंदन ऱाऊत यांच्या वतीने मी वकील आहे.

सर्वप्रथम विलंब झाल्याबद्दल माझे अशील कोर्टाची माफी मागत आहेत. या केसमधली संपूर्ण रक्कम कोर्टात जमा झाली आहे, त्याती पावती दर्ज करीत आहे “  असं म्हणून नानूने पावती सुपूर्द केली.

“केस रद्द झाली आहे. श्री रघुनंदन यांच्याविरुद्ध खटला खालीज करण्यात आला आहे.”  कोर्टाने मिर्णय दिला.

“मी अत्यंत आभारी आहे “

असं म्हणत ऱाऊत सर साक्षीदाराच्या कठड्यातून बाहेर आले.

त्यांना गहींवर आवरला नाही. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी कोर्टीत जमलेल्या लोकांची पर्वा न करतां नानूला मिठी घातली. अश्रूंना वाट

करून दिली.

“हे काय नाटक आहे?  प्रभू वकील,  हा माणूस तुमचा नातेवाईक आहे काय?”

“नातेवाईकापेक्षा श्रेष्ठ ! ते माझे गुरू आहेत. ते माझे राऊत सर आहेत” नानू म्हणाला.

“वा: छान !” जज साहेबांनी दाद दिली आणि टाळी वाजवली. कोर्टात जमा असलेल्या स्रर्वांनी टाळ्या वाजवल्या.

केस संपली. कोर्टाची वेळ संपली, पण गोष्ट संपली नाहीं……!

राऊत सरांवर अशी पाळी कां यावी, असा विचार करत नानू घरी उशीरा आला.

कांहीतरी बिघडलं असावं असं रजनीला – नानूच्या बायकोला वाटलं. नेहेमी संध्याकाळी कोर्टातून आल्यावर “काय करत्येस गं रजू?” असं लाडीकपणे विचारणारा नानू आज गप कां, असा तिला प्रश्न पडला.

दोघे रात्री जेवायला बसले तेंव्हा रजनीने विचारलं. “ आज तुला काय झालंय?”

त्यांचा प्रेमविवाह झाला होता म्हणून रजनी त्याला एकेरी नांवाने ‘अरे तुरे’ म्हणत असे.

“ए, तुला आपले पी.टी. टीचर राऊत सर आठवतात कां गं? ते आपल्याला पी.टी, आणि व्यायाम शिकवायचे ?” नानूने विचारलं.

“हो, तर, ते आमच्या वर्गालाही शिकवत होते. तूं माझ्यापेक्षा दोन ईयत्ता पुढे होतास.” रजनी म्हणाली.

“आज ते मला कोर्टात भेटले. त्यांची केस मी सोडवली आणि त्यांना दिवाणी तुरूंगात जाण्यापासून सोडवलं” चपातीचा एक तुकडा डाळीत बुडवून खात नानूने उत्तर दिलं.

“अशी केस तुला नवी नाही, ह्यापूर्वीही तूं अशा केसेस हाताळलेल्या आहेस. पण राऊत सर ह्यात कसे अडकले?  ते कसे आहेत? पूर्वीसारखे बळकट आणि देखणे?” तिने विचारलं.

“नाहीं गं, अगदी उलट. ते मला खूप अशक्त, गरीब आणि कष्टात असल्याप्रमाणे वाटले.” त्याने उत्तर दिलं.

“म्हणून तू त्यांची केस नादारीत घेतलीस-पदरमोड करून, होय नां? हेच तुला सांगायचं होतं नां?”तिने विचारलं. “तुझं अंत:करण थोर आहे हे मला माहित आहे, पण ते जास्तच थोर आहे असं मी म्हणेन” ती म्हणाली, यानर नानू कांहीं बोलला नाहीं.

“थोडं पाणी दे गं, प्यायला”  तो म्हणाला.

रजनीने एका ग्लासांत पाणी भरून दिलं.

“आत्ता मला सांग, नानू, राऊत सरांबद्दल तुला एव्हढा पुळका कां? असं काय खास आहे त्यांच्यात?” तिने विचारलं.

नानूने जेवण झाल्यावर या विषयावर बोलायचं ठरवलं.

“ तू इकडे बैस. मी तुला सर्व सांगतो“ रजनी सोफ्यावर बसली. तिने टी व्ही बंद केला. “हं आत्ता बोल”. ती म्हणाली.

“मी फक्त चवदा वर्षांचा होतो तेंव्हा मी राऊत सरांना प्रथम पाहिलं त्या वर्षी पी टी टीचर म्हणून त्यांची नव्याने आपल्या शाळेत नेमणूक झाली होती. निमकर सर मुख्य पी, टी. टीचर त्याना मदतमीस म्हणून राऊत सर नेमले गेले होते.  राऊत सर सर्व खेळांत तरबेज होते, त्यातल्या त्यात देशी खेळ- हुतुतु, लंगडी, खोखो, विटी-दांडू वगैरे – हे तुला माहित असेल नां?”  नानूने आरंभ केला.

“हो, हे तर सर्वाना माहित होतं “ रजनी म्हणाली.

“पण तुला माहित नसलेली एक गोष्ट मी सांगतो. त्याकाळी मी एक शांत, बुजरा, लाजाळू मुलगा होतो. राऊत सर शिकवत असलेल्या 300 मुलां-मुलींत मी अगदी नगण्य. त्यांच्या लक्षातसुद्धा आलो नसतो. वर्गात ‘ढ आणि खेळांत शून्य.”  नानू म्हणाला.

“ मला थोडं ऎकून माहीत होतं. पुढे बोल “  ती म्हणाली.

“ आपल्या शाळेत त्या वर्षी नव्याने ब्रास बँडचा क्लास चालू  केला होता. काटदरे नांवाचे सर बँड शिकवायला येत असत. मला त्या क्लास मध्ये प्रवेश मिळाला. हा बँड शाळेच्या मास ड्रिल आणि परेडमध्ये वाजवला जात असे. मला बँड लीडर म्हणून निवडलं गेलं म्हणून मला शाळेच्या फी मध्ये नादारी मिळाली.” नानू म्हणाला.

“मूळ मुद्द्यावर ये नां, मला कंटाळा आलाय” रजनी काहीशा त्रासिकपणे म्हणाली. “ मी बँड लीडर   झालो म्हणून मला हवं ते वाद्य फावल्या वेळात वाजवायची परवानगी मला निमकर सरांनी दिली होती. मी शाळा सुटल्यावर बँडचा क्लास सुरू होण्यापूर्वी माझ्या आवडीचं वाद्य क्लैरिनेट घेऊन वाजवत बसत असे. एकदा एका  संध्याकाळी मी माझ्याच नादात क्लैरिनेट वाजवत बसलो होतो.

“ तूं छान वाजवतोस. मला शिकवशील?:

मी मान वळवून पाहिलं,राऊत सर मलाच विचारत होते. ते माझी थट्टा करत आहेत हे तिथे जमलेल्या घोळक्याला समजलं असावं. आधी गालातल्या गालात हंसू ऐकायला आलं. मी भोळसटपणे क्लैरिनेट सरांना दिलं. हंशा पिकला. ते कां हे मला राऊत सर ते वाद्य शिताफीने वाजवतात ते पाहून समजलं.” नानूने खुलासा केला.

“ तुला हंसणार्यामध्ये मीही होते, तूं विसरलास”  रजनीने आठवण करून दिली.

“”मला इतकंच आठवतं. त्यांच्या क्लॅरोनेट वादनाने मी भारावून गेलो होतो.” नानूने कबूल केलं.” खरोखर उत्तम कलाकार” त्याने वाक्य पूर्ण केलं.

“म्हणून काय झालं?” रजनीने विचारलं.

“ म्हणून मीच राऊत सरांना  विचारलं, ‘ मला तुम्ही शिकवाल? सर, मला तुमचा शिष्य म्हणून घ्याल?, माझे क्लैरिनेट गुरु व्हाल?;

“ त्यांनी मनावर घेतलं. मला सरांर्नी त्या वाद्यातल्या नव्या लकबी शिकवल्या. प्रसिद्ध क्लैरिनेट वादक  बेन्नी गुडमन. सैक्साफोन वादक केन्नी जी,  ट्रंपेट वादक रेड निकोल्स आणि आपल्या भरतातले प्रसिद्ध क्लैरिनेट वादक मास्टर इब्राहिम हे त्यांचे आदर्श होते.” नानू  म्हणाला,

रजनीने एक जांभई दिली. “  मला खूप कंटाळा आला आहे रे. आपण ही कंटाळवाणी गोष्ट उद्यावर ठेवूयां कां?  कां अजून एकादी नाट्यमय घटना सांगायची आहे?”  तिने जांभई देत विचारलं.

“ फक्त एकच आणि शेवटची नाट्यमय घटना”  तो म्हणाला.

“ बंर, चालू दे तुझं.  मी ऐकतेंय  “ ती डोळे मिटत म्हणाली.

“तुला आठवतं?  शालांत (SSC) परीक्षेचं माझं शेवटचं वर्ष होतं, माझे वडील – आप्पा – त्याच वर्षी अचानक वारते. एस एस सी परीक्षेची एकशे पन्नास रुपचे फी भराचला पैसे नव्हते. मी उदास मनाने शाळेला गेलो. मला माझा वर्गमित्र अरविंद साने भेटला. ‘तुझी फी भरली आहे रे, हे तुझं हौल तिकिट’  असं म्हणत त्याने मला माझं हौल तिकिट दिलं.” ऩानू म्हणाला.

 

“अरविंदने तुझी फी भरली?” तिने विचरलं.

“नाहीं गं, राऊत सरांनी भरली होती.” तो महणाला.

“फार उदार, कीं नाहीं?” पुन्हा जांभई देत ती म्हणाली.

“देवदयेने मी त्यावर्षी शालांत परीक्षा पास झालो. निमकर सरांनी मला बँडमास्तरची नोकरी देववली,

“राऊत सरांऐवजी माझी निवड कशी? राऊत सरांपुढे मी काहींच नाही?”मी निमकर सरांना विचारलं  “ हो आधी रघूलाच विचारलं होतं. तेंव्हा रघू म्हणावा ‘प्रभूला या नोकरी ची जास्त गरज आहे’”

नानूचे डोळे पाणावले.

“पंचवीस वर्षे झाली असतील. राऊत सरांनी केलेले उपकार मी कघीच विसरूं शकणार नाही. आणि आज अचानक ते मला कोर्टात भेटले, ते सुद्धा अशा अवघड अवस्थेत ! पूर्वींचा त्यांचा मोहक चेहेरा मलूल झालेला, त्यांचा मूळचा निमगोरा रंग काळसर झाला आहे, त्यांचे कुरळे झुबकेदार केंस लुप्त झालेले. त्यांचे ते धारगार  प्रभावी डोळे निस्तेज झालेले. एकच लक्षण बदलेलं नाहीं ते म्हणजे त्यांच्या कपाळावर उजव्या भुंवई वर असलेलं टेंगूळ . त्यावरूनच मी त्याना इतक्या वर्षानंतर ओळखलं. आत्ता तुला कळलं?”  नानू म्हणाला.

त्याने रजनीकडे वळून पाहिलं, ती गाढ झोपली होती,

Avatar
About अनिल शर्मा 15 Articles
वास्तव्य – बेंगलूरू-कर्नाटक, वय एक्क्यांशी, शिक्षण मराठी भाषेतून झाले. सध्या वृद्धाश्रमात रहातो. एके काळी वकीलीचा व्यनसाय केला. आता स्वस्थ बसून संगणकावर काहीेतरी लिहीत आसतो.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..