लेखसंग्रह व्यक्तीसंदर्भ

ध्वनि प्रदुषण.... एक अद्रुश्य भस्मासुर....
........डॉ मयुरेश जोशी   

Print This Article
 


 

ध्वनि
प्रदुषण हि एक खुप मोठी समस्या आज आपल्याला भेडसावत आहे. बदलत्या कळानुसार आपणही
बदलत आसतो व प्रगतीची विवीध शिखरे पार करीत असतो परन्तु हे करत असताना निसर्गाची व
स्वत:ची जी हानी होत असते त्याकडे आपण कळत नकळत कानाडोळा करत असतो.

ध्वनि
प्रदुषण म्हणजे काय ते आपण प्रथम समजुन घेऊ...माणसाच्या
कानांची
, ऎकण्याची एक विषिष्ठ मर्यादा असते, जेव्हा त्या मर्यादेपेक्षा जास्त आवाजात ध्वनी येतो तेव्हा तो आपल्या
अरोग्यास हानीकारक असतो व त्या परीस्थीतीला ’ध्वनि प्रदुषण’ असे म्हणतात.ध्वनी
मोजण्याच्या मापाला "डेसिबल" असे म्हणतात. साधारणपणे १० - ५० डेसिबल्स
चा ध्वनि आपणास व्यवस्थित त्रास न होता ऎकु येतो. या मर्यादेवरील आवाज आपणास नकोसा
वाटतो. ऊदाहरणादाखल....जोरात
बोलणे - ६० डेसिबल्स.टि.व्ही, रेडीयोचा मोठा आवाज - ७०-७५ डेसिबल्स.प्रेशर कुकरची शिट्टी - ७५ डेसिबल्स.वाहनांचे ब्लो होर्न - ७५ - ८० डेसिबल्स.विमान उडताना - ११० - १२० डेसिबल्स.ढोबळ मनाने ध्वनी प्रदुषणाचे स्त्रोत हे ३ प्रकारात विभागले
आहेत ते म्हणजे १.घरातील आवाज. २.औद्योगीक क्षेत्रातील आवज. ३.दळणवळण साधनांचे
(वहनांचे) आवाज.औद्योगीक क्षेत्रातील आवाजांबद्द्ल आता बरीच काळजी घेतली
जाते परंतू घरातील ध्वनी प्रदूषण व वाहनांच्या ध्वनी प्रदूषणाबाबत आपण फारच उदासिन
दिसतो.आता आपण ध्वनी प्रदूषणामुळे होणार्या दुष्परीणामांची महीती
करून घेवूया...१. मानवी आरोग्यावर होणारे दुष्परीणाम२. निसर्गावर होणारे

दुष्परीणाम.मानवी आरोग्यावर होणारे दुष्परीणाम हे तात्पूरत्या स्वरूपचे
नसुन प्रदीर्घ स्वरूपाचे असतात.सदर दुष्परीणामात मुख्यत्वे, बहिरेपणा, निद्रानाश, चिड्चिड, मानसिक
असंतुलन
, वढता रक्तदाब, अर्धशिशि, ई.
त्रास सुरु होतात. या त्रासांमुळे पुढे जाऊन मधुमेह
, ह्रुदयरोग
यांसारखे गंभिर आजार होऊ शकतात.ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्या साठी करावयाच्या ऊपाय
योजना....आपण जर स्वत:वर काही बंधने घतली तर ही समस्या पटकन आटोक्यात
येईल.घरामधे टि.व्ही, रेडियो लहान आवाजात ठेवा. स्वयंपाक
घरातील मिक्सर
, कुकर सारख्या उपकरणांचा वापर मर्यादित ठेवा. घराच्या
खिडक्या - दारे व्यवस्थित घट्ट बंद होतील याकडे विषेश लक्ष द्या जेणेकरून बाहेरील
आवाजावर प्रतिबंध होईल
, वाहन चालवताना कमीत कमी हॊर्न वाजवा. वाहनाची योग्य
निगा राखून इंजीनचा कमीत कमी आवाज होईल याची दक्षता बाळगा. हल्ली बहुतेक वाहने
, रिव्हर्स
गियर टाकल्यावर मोठा मोठा आवाज करतात
, हा आवाज बहुतेक वेळा अनावश्यक असतो
विशेषत: रात्री अपरात्री सोसायट्यांच्या आवारात जेव्हा वाहन रिव्हर्स घेतात तेव्हा
तर हा आवाज फारच क्लेशकारक वाटतो (गाडी मालकाला सोडुन) त्यामुळे अशावेळेस असे आवाज
बंद करून मग वाहन रिव्हर्स मधे घ्यावे.अतीरीक्त आवाजा पासून बचाव करण्यासाठी ईअर प्लग (मऊ स्पंजचे
लांबूडक्या आकाराचे बोळे)
, ईअर मफ्स (गोलाकार आकाराचे प्लॆस्टिक-स्पंज चे कान
झाकण्याचे उपकरण) ई. साधनांचा प्रभावीपणे उपयोग करावा.निसर्गावर होणारे दुष्परीणामतर फारच गंभिर स्वरूपाचे आहेत. बहूतेक प्राणी -
पक्षी हे आपले भक्ष मिळवण्यासाठी तसेच समागमाचे संदेश देण्यासाठी आवाजाची मदत
घेतात. परंतू ह्या वढत्या
ध्वनी प्रदूषणामुळे
निसर्गामधील समतोल ढासळू लागल्याने कितीतरी प्राणी पक्षी नामशेश होण्याचि वेळ आली आहे.थोडक्यात
सारांश असा की ध्वनी हा आपल्या जीवनातील एक सुंदर घटक आहे पण मानवच्या बेदरकार
स्वभावामुळे हाच घटक ध्वनी प्रदूषणाच्या रुपाने एक अद्रुश्य भस्मासुर बनून आपल्या
दिशेने येत आहे. त्याला वेळीच प्रतीबंध करून आपले जीवन व निसर्गातील अन्य जीव
यांचे रक्षण करूया नहीतर हा भस्मासूर आपल्याला गिळंक्रुत केल्याशिवाय रहणार नाही.
या लेखाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://www.marathisrushti.com/?article=11510  Print This Article

Not Rated stars Ave. rating: Not Rated from 0 votes.

नविन प्रतिक्रिया

 manoj kandekar  यांनी 05-01-2014 रोजी लिहिले....   या प्रतिक्रियेवर आपली प्रतिक्रिया
I AGGRY WHITH YOUR COMMENT!

 mansi  यांनी 22-08-2013 रोजी लिहिले....   या प्रतिक्रियेवर आपली प्रतिक्रिया
good

 Priyanka  यांनी 11-12-2012 रोजी लिहिले....   या प्रतिक्रियेवर आपली प्रतिक्रिया
very good
आपल्याला हा लेख कसा वाटला?,या लेखाबद्दलचा आपला अभिप्राय लिहा.
आपली प्रतिक्रिया
आपले नाव:- इ-मेल:-
प्रतिक्रिया:-
Write the following word:

Not readable? Change text.
 

लेखक परिचय
मराठी व्यक्ती संदर्भकोश....
  • मराठी सिनेसृष्टीतले गेल्या शंभर वर्षांतील १०० सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट.
    आणि हे चित्रपटही ऑनलाईन पहाणार आहोत फक्त मराठीसृष्टी.कॉम वर
  • धार्मिक स्थळांवर देव आणि धार्माच्या नावावर होणार्‍या बाजारी करणाचा वेध या चित्रपटातनं विनोदी अंगानं मांडल्यामुळे आशय विषय मनाला भिडतो. या चित्रपटाला ५९ .....
  • Box-Articles-4
  • मराठी सिनेसृष्टीतली गेल्या शंभर वर्षांतील सर्वोत्कृष्ट मराठी गाणी.
    आणि ही गाणी ऑनलाईन पहाणार आहोत फक्त मराठीसृष्टी.कॉम वर
  • १९८० साली प्रदर्शित झालेल्या सिंहासन या गाजलेल्या चित्रपटातील हे गाणे. या गीताचे गीतकार होते सुरेश भट. पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी या गाण्याला .....
  • Box-Articles-5

Loading Content.Please Wait...
Write on MS - 1