नवीन लेखन...

गझलसम्राट मेहंदी हसन

अविट गोडीच्या गझलानी संगीतरसिकांवर पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजविणारे गझलसम्राट मेहंदी हसन यांचा जन्म १८ जुलै १९२७ रोजी झाला.

मेहंदी हसन यांनी गायनाचे धडे वडील उस्ताद अझीम खॉं आणि काका उस्ताद इस्माईल खॉं यांच्याकडून गिरविले. ते दोघेही पारंपरिक धृपद गायक होते. त्यांचे कुटुंब वाद्यनिर्मिती उद्योगातही होते. फाळणीनंतर त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानात स्थलांतर केले. पंजाब प्रांतातील चिचवटनी गावात ते स्थायिक झाले. पाकिस्तानात ते एका सायकलीच्या दुकानात काम करीत होते. नंतर त्यांनी मोटार आणि ट्रॅक्टर मेकॅनिकचेही काम केले. काम करीत असतानाही त्यांनी गायनाचे धडे गिरविणे सुरू ठेवले होते. पुढील काळात ते ठुमरी गायनाकडून गझल गायनाकडे वळले. कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी, या हेतूने ते गझल गायनाचे कार्यक्रम करीत असत. गझलगायन सुरू केल्यानंतरही त्यांनी शास्त्रीय गायनाचा रियाझ कायम ठेवला होता. पाकिस्तान रेडिओवर पहिल्यांदा १९५७ मध्ये त्यांना ठुमरी गायनाची संधी मिळाली. नंतर त्यांनी पाकिस्तानी चित्रपटांसाठी गीतगायन सुरू केले. “गुलो में रंग भरीये‘ हे त्यांचे “फरंगी‘ या १९६४ च्या चित्रपटातील गीत त्यांचे पहिले चित्रपटगीत होते.

“पत्ता, पत्ता, बूटा, बूटा‘, “अब के हम बिछडे‘, “रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ‘, “तडप ना मेरे दिल, किसी की आस में, हजार तिल्खियॉं, तेरी प्यास में..‘ अशा एकापेक्षा एक सरस आणि अविट गोडीच्या गझल मेहंदी हसन यांनी रसिकांना दिल्या.

मेहंदी हसन यांनी गझलेला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. मेहंदी हसन यांच्या गझलेतून प्रत्यक्ष परमेश्वरच बोलतो, हे लता मंगेशकर यांचे म्हणणे खरेच आहे,‘‘ अशा शब्दात प्रसिद्ध गायिका अबिदा परवीन यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

मेहंदी हसन यांचे १३ जून २०१२ रोजी निधन झाले

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट

मेहंदी हसन यांच्या गाजलेल्या काही गझला


https://www.youtube.com/watch?v=K-92Z3OXWZQ&t=17s

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..