नवीन लेखन...

दु:खांचे हे ऊन्ह रणरणत आहे

गझल
जाती: समजाती-पद्मावर्तनी-वंशमणि
मात्रा: ८+८+४=२०मात्रा
******************************************
दु:खांचे हे ऊन्ह रणरणत आहे
अनवाणी मन सुखास शोधत आहे

मृगजळ पिउनी तृप्त कुणी का झाले
पळत्या पाठी तहान धावत आहे

अस्तित्वातच मुळामधे जे नाही
त्याची छाया मनास भुलवत आहे

गन्तव्यावर मन इतके जडले की,
समजत नाही, रस्ता झुलवत आहे

जरी झाकला मुखडा, अन् कायाही
उभार बांधा नजरा खिळवत आहे

जगणे झाले असे सुरीले माझे
जो तो मजला जणू गुणगुणत आहे

मला पाहणा-याला कळते, हृदयी
प्रसन्नतेचा झरा झुळझुळत आहे

चालायाची धुंद अशी चढली की,
मी आता लीलया वणवणत आहे

चित्ताची शांतता कशाने मिळते
पुढ्यात येते, ते स्वीकारत आहे

उभा जन्म भळभळत राहिलो होतो
तुझ्या कृपेने अता साखळत आहे

प्रा.सतीश देवपूरकर

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..