नवीन लेखन...

सैनिकांना विसरू नका…

Don't forget our Armed Forces

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लष्कर-ए-तोयबा या पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या सुमारे सात ते आठ दहशतवाद्यांचा मार्ग रोखून लष्करी जवानांनी त्यांना शरण येण्याचे आदेश दिल्यानंतर झडलेल्या भीषण चकमकीत, कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले. अन्य चार जवान जखमी झाले आहेत. ते मूळचे साताऱ्याचे होते. जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात १७/११/२०१५ला दहशतवाद्यांसोबत त्यांची चकमक झाली.

दहशतवाद्यांची एक तुकडी घनदाट रात्री कुपवाडा जिल्ह्यात हैहामा येथे सीमा ओलांडून भारतात घुसली.९५ % दहशतवाद्यांना सिमेवर मारण्यात यश मिळते. मात्र ५% आत घुसण्यात यश मिळते.परंतु पाऊस व बर्फवृष्टीमुळे ती जंगलातच अडकून पडली होती. या दहशतवाद्यांना हुसकावून लावण्याची मोहीम लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सची तुकडीने १३ नोव्हेंबरपासून हाती घेतली होती. या तुकडीचे नेतृत्व कर्नल महाडिक यांच्याकडे होते. दहशतवाद्यांचा पाठलाग करत लष्कर मंगळवारी सीमेलगतच्या हाजी नाका येथील दाट जंगलात शिरली तेव्हा दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात कर्नल महाडिक जखमी झाले. कर्नल महाडिक व इतर जखमींना हेलिकॉप्टरने श्रीनगर येथे १५ कॉर्पस्च्या लष्करी कमांड इस्पितळात आणण्यात आले. परंतु कर्नल महाडिकांचे प्राण वाचू शकले नाहीत.

कर्नल संतोष महाडिक 41 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर होते. ही मराठा रेजिमेंटची बटालियन आहे.मराठा रेजिमेंटचे जवान महाराष्टाचे आहेत. महाडिक हे 21 पॅरा स्पेशल फोर्सेसमधून 41 राष्ट्रीय रायफल्समध्ये दाखल झाले होते. म्यानमारमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध गोपनीयपणे राबवण्यात आलेल्या मोहिमेत याच 21 पॅरा स्पेशल फोर्सेसचा सहभाग होता.सध्याचे दहशतवादी विरोधी अभियान अनेक दिवसापासुन सुरु आहे.कर्नल संतोष महाडिक यांना काही वर्षापुर्वी गाजवलेल्या शौर्याबद्द्ल या आधी पण शुरता पुरस्कार सेना मेड्ल देण्यात आले होते.

मी श्रीनगरहून किशनगंगेची सीमा आणि हाजीपीरच्या समोरची गस्ती चौकी तसेच लडाखच्या देमछोकपर्यंत लष्करी जवानांचे दैनंदिन जीवन जवळून अनुभवले आहे, त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंग पाहिले आहेत. खबर मिळताच ते दहशतवाद्यांच्या तळावर कसे छापे मारतात, हे बघितले आहे. कधीकधी आपसातील वैमनस्यापायी किंवा कुणाचा हिशेब चुकता करण्यासाठी जाणुनबुजूनच सैनिकांना चुकीची माहिती देण्यात येते. कुठल्याही निर्दोष, निष्पाप व्यक्तीवर गोळीबार होऊ नये यासाठी सैनिक जिवापाड प्रयत्न करतात. पहाटे ५ वा. उठून ६ वा. पुरी-भाजीचा नाश्ता आणि पहाटे अडीच वाजल्यापासून सैनिक स्वयंपाकघरात बनलेले जेवण पॅक करून व मागे बांधून ते ‘रोड क्लीयरन्स’च्या कामावर निघून जातात, जेणेकरून रस्त्यावर किंवा कुणा दहशतवाद्यांनी खड्ड्यात आयईडी किंवा भूसुरुंग पेरले असतील, तर आपल्याजवळील यंत्रांनी त्याचा माग काढून ते निष्प्रभ करून सर्वसामान्य काश्मिरी नागरिकांसाठी असलेला मार्ग निर्धोक व सुरक्षित व्हावा. दिवसभराच्या ड्युटीत ते केवळ आपल्याजवळ असलेल्या बाटलीतील पाणीच पितात. कोण कसे पाणी देईल, याचा काहीही भरवसा नाही. तीस किलोंचे शस्त्र आणि बुलेटप्रूफ जॅकेट, वजनदार बूट, वजनदार गणवेश आणि सतत १२ तास अतिशय सावधपणे उभे राहून कर्तव्य बजावणे. त्याच्या ‘वन रँक वन पेन्शन’ प्रकरणाचा भलेही त्याच्या बाजूने निर्णय लागलाही नसेल, पण तरीही त्याला आपले कर्तव्य कुठलीही चूक होऊ न देता निभवायचेच आहे. त्याला पक्के माहीत आहे की, या (काश्मीरच्या) भूमीत जर त्याचा मृत्यू झाला, तरीही त्याच्या कुटुंबीयांना एक इंच जमीनही खरेदी करण्याची परवानगी मिळणार नाही. कर्नल एम. एन. राय यांना जानेवारी २०१५ मध्ये काश्मिरात हौतात्म्य आले. ते गाजीपूरचे होते.

कासीमच्या अंत्यसंस्काराला जमलेल्या गर्दीच्या निमित्ताने

बीएसएफच्या दोन जवानांचा बळी घेणार्‍या उधमपुरातील एका योजनेला आकार देणारा आणि त्यापूर्वीही अनेक दहशतवाद्यांच्या काळ्या कटात, प्रत्यक्ष कृत्यात सहभागी असलेला लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबु कासीम भारतीय जवानांच्या एका कारवाईत मारला गेला. कासीमच्या अंत्यसंस्काराला जमलेल्या गर्दीच्या निमित्ताने कुणाच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचे अन् कुणाच्या पाठीशी ताकद उभी करायची, हे जर समाजातल्या सज्जनशक्तीला कळत नसेल, तर त्या समाजाचे भले होणार कसे? एक कुख्यात अतिरेकी सैनिकांच्या गोळीबारात मारला जातो त्या पाकिस्तानी माणसाच्या अंत्ययात्रेला, पाय ठेवता येणार नाही इतकी गर्दी भारतातल्या काश्मिर खोर्यात जमते, याचा अर्थ काय काढायचा? बरं, हा मारला गेलेला माणूस काही साधू-संत, प्रेषित नव्हता, की भरघोस सामाजिक कार्यासाठी त्याची ख्याती नव्हती. तसल्या कार्यासाठी त्याने स्वत:ला वाहून घेतल्याचीही वार्ता ऐकिवात नाही. मग त्याच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीमागील रहस्य आणि कारण काय असावे? मृत्यूनंतर त्याचा अंत्यसंस्कार करायला गेलेल्या प्रशासनाला काश्मिरातील कुलगाम येथे जमलेले लोक, त्यांची संख्या बघून आश्चलर्याचा अक्षरश: धक्का बसावा, एवढी अलोट गर्दी या गावात झाली होती. ज्याने सैनिकांवर गोळ्या झाडल्या, जेव्हा त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली, त्या वेळी हजारो नागरिक त्यात सहभागी झाले होते. सैनिकाला हे सर्व पाहावे आणि सहनही करावे लागते. आमच्या येथे सैनिकांची उपेक्षा आणि तिरस्काराने भरलेले मानवाधिकारवाद्यांचे भाषण दैनंदिन जीवनाचा भाग आहे. शाळा, महाविद्यालयात सैनिकांविषयी, त्यांना आदर देण्याविषयी फ़ारच कमी चर्चा होते. मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी बलिदान देणार्‍यांची कीर्तीच केवळ चिरंतन राहते. आम्ही हे जर विसरणार नसू, तर आमचे उर्वरित कामकाजही योग्य दिशेने सुरू राहील .

मणिशंकर अय्यर ,सलमान खुर्शिद आणी आमनकी आशा ब्रिगेड

२०१५ मधे आतापर्यंत ९५ दहशतवादी, १९ सामान्य नागरिक,३८ अधिकारी व जवान आता पर्यंत देशाचे रक्षण करतांना शहिद झाले आहेत.१९८८ ते २०१५ या काळात ४७२३४ गोळीबारांचा घट्नात १४७२३ सामान्य नागरिक,६१८३ सैनिक आणी अधिकारी,२२९५० दहशतवादी ठार झाले आहेत.तरी पण “अनेक आमनकी आशा ब्रिगेड सभासदांना” भारत-पाकिस्तान संबंध्द सुधारु शकतात असे वाटते. केंद्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हटविल्यानंतरच भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्री होऊ शकते, असे मत काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदींबद्दल हे वक्तव्य केले. भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यात मोदीच मोठी अडचण असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. यापूर्वी काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन असेच वतव्य केले होते.भाजपचे माजी नेते सुधींद्र कुलकर्णी यांनी देखील भारताच्या पाकिस्तानबरोबरच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘मोदींना पाकसोबत चांगले संबंध हवेत, पण ते काही अटीशर्ती टाकत आहेत. यामुळे चर्चाच सुरु नाही झाली व हे चुकीचे आहे‘ असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. पुढच्या इलेक्शनला काही पक्षांनी मुशर्फ आणि नवाझ शरीफला प्रचाराला आणले तरी आश्चर्य वाटून घेऊ नका.

कर्नल संतोष महाडिक ह्यांना मानाचा मुजरा

आपण आतापर्यंत या सुपर हिरोजन ओळखू शकलो आहोत का? पण आपल्या देशाच्या जनतेला आपल्या सैनिकांचे बलिदान, साहस हिम्मत यांची किंमत कितपत आहे? आपण लढणाऱ्या सैनिकांचे कौतुक जरूर करतो, पण ते तेवढ्या पुरतेच. कारण तितक्याच तत्परतेने आपण त्यांचे बलिदान विसरून देखील जातो. स्वत:च्या सैन्यदलांची काळजी न घेणारे राष्ट्र अत्यंत धोकादायक परिस्थितीत नकळत जात असते.
लढवय्या मराठ्यांच्या वर्षांची दैदिप्यवान सैनिकी परंपरा आपल्या सारख्या झुंजार ‘मराठा रेजिमेंट’ च्या योध्यांनी अजून जपून ठेवली आहे. ह्याचा प्रत्येकाला प्रचंड अभिमान आहे.संतोष महाडिक , तुमची धडाडी , तुमचे नेतृत्व , तुमचा प्रेरणादायी सहवास आम्हास सातारा सैनिक शाळेपासुन अनुभवता आला . तुम्ही देशासाठी प्राणार्पण केले , आपल्या तुकडीचे नेतृत्व करीत छातीवर गोळ्या झेलल्या ,एका सच्च्या देश भक्तासारखे हसत हसत कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करले . तुमचे हे आकस्मात जाणे आम्हाला कायमचे चटका लाऊन जाते आहे.मराठा रेजिमेंटच्या कर्नल संतोष महाडिक ह्यांना मनाचा मुजरा

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..