नवीन लेखन...

दादा कोंडके

नायगाव चाळीतच दादा कोंडके यांचे बालपण गेले. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी झाला. तरुणपणी पैशांची गरज भागवण्यासाठी अपना बाजार मध्ये त्यांना नोकरी करावी लागली. त्या काळात काही कारणांमुळे त्याचे स्वकीय व कुटूबीय त्यांच्या पासून दूर झाले, व दादा एकटे पडले. तेव्हा समाजात दु:खी असलेल्या लोकांना हसवण्याचा पण दादांनी केला. आणि हाच उद्देश धरून त्यांनी त्यांच्या भागतील बँड पथकात सहभाग घेतला. कोतुकाने त्यांना बडवाले दादा पुकारले जायचे.

बँड मध्ये कार्यरत असताना , सेवा दलाच्या कार्यातून दादा सांस्कृतीक कार्यात सहभागी व्हायचे. त्यातून त्यांनी छोट्या – मोठ्या नाटकांत भाग घेण्यास सुरुवात केली. तेथे कलेचा नाद शांत बसू देईना, म्हणून प्रसिद्ध गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले. सेवादलात असतानाच त्यांची गाठ निळू फुले, राम नगरकर यांच्याशी पडली. आणि सेवादलाच्या नाटकांत दादा छोटी-मोठी कामे करू लागले.

पथ-नाट्यात आपल्या विनोदाच्या टाईमिंगवर हशा उसळवणा-या दादांचे प्रसिद्ध होणे त्यांच्या सेवादलातील साथीदारांना पाहवले नाही. ‘खणखणपुरचा राजा’ मधील गाजणारी भूमिका सोडून, सेवा दलातून फारकत घेत दादांनी स्वतःचा फड उभारला. आता दादा कोंडके वसंत सबनिसांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटकातून पुन्हा रंगभूमीवर उतरले. दादांच्या आयुष्यातील हे वळण दादांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यावर फार मोठे उपकार करून गेले. दादांनी परत मागे वळून कधी पाहिलेच नाही. ‘विच्छा’चे १५०० हून अधिक प्रयोग झाले. आणि दादांसारखे रत्न भालजी पेंढारकरांसारख्या पारख्याच्या नजरेत पडले.

विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. मा.दादा कोंडके यांनी ‘भामाक्षी पीचर्स संस्थेची निर्मिती’ केली. प्रमुख नायिका – उषा चव्हाण , संगीतकार – राम लक्ष्मण, गायक – जयवंत कुलकर्णी आणि महेंद्र कपूर, सहायक दिग्दर्शक – बाळ मोहिते यांनी या रुपात संस्थेचे काम पहिले होते. त्यांना चित्रपटासाठी सेन्सॉर मान्यता मिळण्यापासून ते राजकीय नेत्यांच्या संबंधीत अनेक अडचणी येत होत्या. दादा कोंडके यांची वादग्रस्त विषयात चर्चा असायची.

प्रत्यक्ष आयुष्यात ते विवाहबद्ध होते, पण सिनेसृष्टीत एकटा जीव सदाशिव पणे वावरत असायचे. सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत. दादांचे पितासमान गुरु बाबा उर्फ भालजी पेंढारकर यांचा तांबडी माती हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सोंगाड्या’ ही दादांची पहिली निर्मिती. हा चित्रपट खुप गाजला. दादांनी मराठीत एकुण १६ चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्यमोहोत्सवी ठरले. या विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले.

अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. अनेक रजत्/सुवर्णमहोत्सवी चित्रपट या गुणी कलवंताने दिले. खरे तर दादा कोंडके यांच्यासारखा सारखा कलाकार पुन्हा झाला नाहीच मराठी सिनेसृष्टीतील ऐतिहासिक आणि सुवर्णकाळ म्हणजे दादा कोंडके यांची कारकीर्द, दादांनी प्रेक्षकांना हसवले आणि प्रसंगी अगदी अलगद टचकन रडवले देखील … त्यांच्या काळातील सिनेसृष्टी आणि सध्याच्या काळातील सृष्टी यात प्रचंड तफावत आहे खूप अत्याधुनिक तंत्र आता उपलब्ध आहे.

दादा कोंडके यांचे एकटा जीव सदाशिव, सोंगाड्या, रामराम गंगाराम , पांडू हवालदार असे गाजलेले चित्रपट कुठे टी व्ही वर दिसत नाहीत ,जुन्या तंत्रात असलेल्या या चित्रपटांचे कोणी पुनरुज्जीवन केले नाही अनेक जुने चित्रपट, गाणी वारंवार टी व्ही वर दिसतात पण जणू दादा कोंडके यांचे चित्रपट रसिकांना बघायला मिळत नाहीत. मा. दादा कोंडके यांचे १४ मार्च १९९८ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..