या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

हिंदी पार्श्वगायिका शमशाद बेगम

शमशाद बेगम यांनी १६ डिसेंबर १९४७ रोजी लाहोर येथे पेशावर रेडिओवरुन गायनाची सुरुवात केली. आपल्या गोड गळ्याने त्यांनी रसिकांच्या मनांचा ठाव घेतला. त्यानंतर पेशावर, लाहोर व दिल्ली रेडिओ स्टेशनवर त्यांनी गाणी गायली. १९४४ मध्ये त्या मुंबईत आल्या. बेगम यांनी नौशाद, एस. डी. बर्मन, सी. रामचंद्रन, ओ.पी. नय्यर या संगीतकारांसाठी पार्श्वगायन केले. लाहोरमध्ये खजांची आणि खानदान या […]

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे 

सत्यजित रे यांना प्रेमाने “माणिकदा‘ असे म्हटले जाई. नावाप्रमाणे ते भारतीय सिनेमातील एक “माणिक‘ होते. अमूल्य रत्न होते. […]

दक्षिण भारतातील सुप्रसिध्द गायिका एस. जानकी

गुंटूरमध्ये २३ एप्रिल १९३८ रोजी जन्माला आलेल्या एस.जानकी यांनी वयाच्या १९ वर्षांपासून गाण्यातील कारकीर्दीला सुरुवात केली. एस. जानकी या गेल्या साठ वर्षापासून गात आहे. जानकी यांना दक्षिण भारताची ‘सुर कोकिळा म्हणतात. जानकी यांना दक्षिण भारतातील गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. आंध्र प्रदेशच्या त्यांनी आजवर तामीळ, कन्नड, तेलगु मल्याळी या भाषांमध्ये वीस हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. जानकी यांना […]

भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक व्यक्तीमत्व अन्नपूर्णा देवी 

भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक व्यक्तीमत्व म्हणून अन्नपूर्णा देवी देशाला परिचित आहेत. मात्र त्यांचे स्वर्गीय सितार वादन ऐकण्याचे भाग्य अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोकांना लाभलं आहे. जवळपास गेली साठ वर्षे त्या एकांतवासात होत्या. त्यांनी अनेक वर्षापासून संगीत वादन सोडलं आणि एकांतवास स्वीकारला. अन्नपूर्णा देवी यांचा जन्म २३ एप्रिल १९२६ रोजी झाला. त्या सरोद वादनातील अध्वर्यू अल्लाउद्दीन यांच्या कन्या. उस्ताद अल्लाउद्दीन […]

ज्येष्ठ दिग्‍दर्शक आणि निर्माते बी.आर.चोपडा

धूल का फुल (१९५९), वक्त (१९६५), नया दौर (१९५७), कानून (१९५८), हमराज (१९६७), इन्साफ का तराजू (१९८०) आणि निकाह (१९८२) असे एकापेक्षा एक सरस चित्रपट मा.बी. आर.चोपडा यांनी दिले आहेत. बी. आर. चोपडा यांचा जन्म २२ एप्रिल १९१४ रोजी झाला. भारतीय चित्रपटातील भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने १९९८ साली बी. आर. चोपडा यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान केला होता. त्याआधी त्यांना १९६० […]

जेष्ठ व्हायोलिन वादक मा. लालगुडी जयरामन

व्हायोलिन हे मूळचे भारतीय वाद्य नसले, तरी आज ते देशातील मैफलींच्या मध्यभागी विराजमान झाले आहे. त्याला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या कलावंतांमध्ये प्रामुख्याने लालगुडी जयरामन यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १९३० रोजी झाला. दाक्षिणात्य संत परंपरेतील महान संगीतकार त्यागराज यांच्या वंशात जन्मलेल्या लालगुडी जयरामन यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने घराण्याची परंपरा वेगळ्या उंचीवर नेली, त्याचबरोबर जगभरातील संगीत क्षेत्रात भारताचाही […]

मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम करणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री उषाकिरण

उषाकिरण यांचे खरे नाव उषा मराठे. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या उषाकिरण यांची घरची आर्थिक स्थिती बेताची होती. त्यांचा जन्म २२ एप्रिल १९२९ रोजी झाला.  वयाच्या बाराव्या वर्षी उषाकिरण यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. लवकरच त्यांना कुबेर या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली. नंतर उषा किरण यांना ’सीता स्वयंवर’ हा सिनेमा मिळाला. त्यातही त्यांची छोटी भूमिका होती. पण ’मायाबाजार’ […]

गायिका और फ़िल्म निर्माता अभिनेत्री कानन देवी

कानन देवी यांचे नाव ‘कानन बाला’ होते. कानन देवी यांचा जन्म बंगाली परिवारात झाला. त्यांचा जन्म २२ एप्रिल १९१६ रोजी झाला. आपल्या वडिलाच्या निधनामुळे लहानपणीच आईला मदत करू लागल्या होत्या. वयाच्या १० व्या वर्षी त्यांनी ‘ज्योति स्टूडियो’ निर्मित ‘जयदेव’ या बंगाली चित्रपटात काम केले. १९३४ साली आलेल्या मा या चित्रपटापासून नाव झाले. नंतर कानन देवी मुंबईला आल्या व न्यू […]

हिंदुस्थानी संगीतातील ‘किराणा’ घराण्याचे गायक माधव गुडी

हिंदुस्थानी संगीतातील ‘किराणा’ घराण्याचे गायक आणि पंडित भीमसेन जोशी यांचे पहिले शिष्य म्हणून माधव गुडी यांची ओळख होती. त्यांनी अनेक वर्षे हिंदुस्थानी संगीताची सेवा केली. त्यांना संगीत नृत्य अॅकॅडमीच्या पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. ते ख्यातनाम संगीतकार म्हणूनही ते ओळखले जात. भारतात व परदेशातही त्यांचे अनेक कार्यक्रम झाले होते. विविध आंतरराष्ट्रीय […]

1 2 3 72