नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

मनात रुतलेला एक काटा !

दुःखात क्षण थांबण्याचा भास होतो परंतु तसे नसून तो एक मनाचा खेळ असतो जो आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याला विरोध करतो. आनंदाचे क्षण चटकन निघून जातात हाही एक भ्रमच कारण माणसाच्या मनाला एक काटा नेहमीच रुतलेला असतो, तो म्हणजे “असमाधानाचा ” तो काटा निघताही नाही आणि नेहमी हळूहळू टोचत राहतो. […]

मन हृदय शरीर एक (सुमंत उवाच – ६०)

कोण कुणा पेक्षा श्रेष्ठ? कोण किती प्रमाणात श्रेष्ठ? कोण कमी पडतंय? कोण कमकुवत आहे? या प्रकारची तुलना जेव्हा आपण उघड्या डोळ्यांनी जग बघतो तेव्हा होऊ लागते. […]

कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – ६

घरच्यांना फसवून, क्लास बदलून राहणारे तरुणही कोटा फॅक्टरीत भेटतात. प्रत्येक ” ईशान अवस्थी “ला निकुंभ सर भेटत नाही इथे! दिवसरात्र क्लासमध्ये घालवल्यावरही इथे मुले एज्युकेशनल ऍप वरील लाईव्ह सेशन्स ऐकत असतात. प्रवेश घेतानाच क्लासने टाय-अप केलेल्या महाविद्यालयात अधून-मधून प्रयोग करायला जात असतात. पूर्ण दिवस क्लास केल्यावर महाविद्यालयात जायला वेळ/ऊर्जा कोठे? आणि तसही सगळं क्लासमध्ये कव्हर होतंच. […]

मिसिंग टाइल थेरपी

मनाचा आढावा घेणारे आपले मानसशास्त्रज्ञ नेहमीच आपल्याला स्वतः चा शोध घ्यायला शिकवतात. कदाचित आपण कधी तितके स्वतः चे परीक्षण आजवर केले ही नसू पण त्यांनी अनेक प्रयोगा द्वारे त्याची जाणीव करून दिली आहे. मानसशास्त्रामध्ये एक प्रसिद्ध सिद्धांत आहे, मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी! […]

सोहळे साजरे करुनि घ्यावे (सुमंत उवाच – ५९)

अमावस्या म्हणजे वाईट, या दिवशी काही चांगलं करू नये, बाहेर जाऊ नये या सगळ्या गोष्टी मोडून काढत गटारीला या उलट गोष्टी कश्या करता येतील याला महत्व दिलं जाऊ लागलं. श्रावण सुरू व्हायच्या आदल्या दिवशी यथेच्छ मांसाहार, मद्य प्राशन करावे आणि दुसऱ्या दिवशी पासून कडक उपास करण्यास तयार राहावे. […]

कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – ५

उत्खनन करताना काही नाजूक,हळवे आणि कोवळे क्षणही सापडतात “या” कोटा गांवात ! वयच असं असतं या शहरातल्या लोकसंख्येचं की आपोआप तलम नातेबंध तयार व्हायला सुरुवात होते. ती अलगद कलाकुसर बघण्याची चीज आहे. अभ्यास हा जोडणारा स्वाभाविक सेतू असला तरीही स्पर्शाधारित नसलेलं कोवळिकीचं प्रेम येथे भेटतं. मुलींचं हॉस्टेल /पीजी सोय अर्थातच स्वतंत्र असलं तरीही वयापुढे/सहवासापुढे काही चालत नाही. […]

ज्याच्या आत माझाच चा कहर (सुमंत उवाच – ५८)

हे जग माझ्यामुळेच आहे, माझ्यातूनच हे विश्व निर्माण झाले आहे असे जेव्हा एखाद्या मनुष्याला जाणवू लागते त्यांनी लगेच अहंकारावर औषध घ्यायला सुरुवात करायला हवी. […]

कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – ४

वैभव पांडे या प्रातिनिधिक तरुणाच्या प्रश्नांचा प्रवास ” कोटा फॅक्टरी ” मध्ये आढळतो. ” इनसाईड एज ” या मालिकेने जसे क्रिकेटविश्वाच्या पोलादी आणि श्रीमंत विश्वाचे विश्वरूप दर्शन घडविले,तसेच कोटा फॅक्टरी शिक्षण क्षेत्राच्या बाजारीकरणाचे चित्र रंगविते – ते भेदक आहे,त्रासदायक आहे पण आय आय टी च्या ५२६३ जागांसाठी दरवर्षी १० लाखांहून अधिक तरुण (आणि पडद्याआडून त्यांचे पालक) जेव्हा त्यांची स्वप्ने, ऊर्जा, पैसे, वेळ पणाला लावतात तेव्हा प्रश्नही त्याच तोडीचे पडतात. […]

चला, सागर सम बनू या

सागर किती ही विशाल असला तरी त्याची एक लाट ही सुखद अनुभव करून जाते तसेच आपल्या दिवसभराच्या कारोबारात ही एखादा सुखद क्षण ही पुरेसा असतो. विशाल हृदयाने, मुक्त मनाने विचारांना प्रकट करण्याची सवय लावावी कारण विचारांचे दमन हे अतिशय नुकसानकारक आहे. शुद्ध विचारांचा स्पर्श जीवनाला सुखद बनवण्यासाठी मदत करतो. […]

पर्जन्य काळी व्यवस्थापन (सुमंत उवाच – ५७)

पावसाळा सुरू झाला की निसर्गाला सौंदर्य प्राप्त होते. ठिकठिकाणी निसर्ग खुलून जातो, हिरवीगार वनराई फुलू लागते, फुलांच्या गालिच्यांनी धरती परत एकदा आपलं शरीर मुक्तपणाने सजवते पण त्यास माणूस एक संधी म्हणून त्याची ओढ आपल्या तुंबड्या भरण्यासाठी करून घेतो आणि पावसाळा मृत्यूचे द्वार उघडायला कारणीभूत ठरतो. […]

1 39 40 41 42 43 133
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..