नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

प्रत्येकाची आनंदाची व्याख्या निराळी

दैनंदिन जीवनांत आपण काहीतरी शोधत असतो. हा शोध नेमका कशाचा असतो ह्याचा अंदाज काहीवेळा येत नाही. खरं तर हा शोध आनंद प्राप्तीचा असतो. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या जशी निराळी असते, तशीच अनुभूती देखील वेगवेगळी असते. आपापल्या अनुभूती आणि प्रचीतीनुसार आपली आनंदाची व्याख्या तयार होत असते. आनंद आपल्या अंतरंगात निर्माण होत असतो. […]

सकारात्मक सहजीवन

सकारात्मक सहजीवन जगता येणं ही केवळ कला नसून ते एक शास्त्र आहे, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. ह्या शास्त्रात संवाद, सहवास, सहभाग, सहकार आणि सम-भोग या बाबींचा कृतीशील विचार करावा लागतो, त्यांचा अंगीकार करणं आवश्यक ठरतं. सहजीवन सकारात्मक आणि आनंदी करण्यासाठी साथ-सोबत करणाऱ्या प्रत्येकानं कर्तव्यापोटी स्वीकारलेली जबाबदारी समसमान घेतलेली असणं अभिप्रेत आणि अपेक्षित असतं. तशी जाणीव होणं महत्वाचं ठरतं. […]

सौंदर्याचा साक्षात्कार

आपल्या राहणीमानात एकप्रकारे आपलं व्यक्तिमत्व ऐट आणू शकतं. कल्पक आणि सौंदर्यपूर्ण सकारात्मक विचार, आचार आणि व्यवहार करणारं मन निश्चितच आपल्या जीवनात सौदर्याचा साक्षात्कार घडवून आणू शकतं. […]

अंतर्मन अधिक महत्वाचं

अंतर्मनावर प्रतिबिंबित झालेले प्रत्येक विचार आपल्या वर्तन आणि व्यवहारांमध्ये परिवर्तन करत राहतात. अनेकदा मनांत येणारे विचार आपल्या गत अनुभवांशी निगडीत असतात तर ते काहीवेळा नजीकच्या भविष्यात काय, कसं आणि कधी घडावं ? याबद्दलचे असतात […]

जीवनाची गुणवत्ता!

१९५० पासून जीवनाची गुणवत्ता आणि त्याची मोजदाद याबाबत मानसशास्त्रात विचारमंथन सुरु आहे. प्रत्यक्षात २००३ मध्ये जॉन फ्लॅनागन या अमेरिकन मानस शास्त्रज्ञाने एक प्रश्‍नावली सुचवली. समाधान, आयुष्यावरील नियंत्रणाची भावना, सहभाग, बांधिलकी (वचनबद्धता), दैनंदिन जीवनात कामाचा समतोल इत्यादी घटकांबाबत एखाद्याचे व्यक्तिगत आकलन काय आहे, मूल्यांकन काय आहे हे घटक जीवनाची गुणवत्ता मोजण्याच्या प्रक्रियेत महत्वाचे ठरतात. […]

व्यक्ती तितक्या प्रकृती

व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे एकाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी, सवयी, मानसिकता हे देखील सर्व भिन्न असतं. या भिन्न विभिन्न मानसिकतेचा विचार करून सकारात्मकता आणि एकता निर्माण करावी लागत असते. यामध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा कस लागत असतो. अंतर्मनाच्या आणि मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून रंग शास्त्राचा खूप मोलाचा वाटा असतो. रंगांचा संबंध थेट अंतर्मनाशी असतो. विविध रंग अंतर्मनाला जाऊन भिडणारे असतात. […]

सतत DOING व्हर्सेस काहीवेळ BEING !

सारखे DOING करत असू तर दिवसातील काहीवेळ तरी BEING साठी आपण राखून ठेवतो का? याचं कारण असं की आपणांस आसपास आवाजाची, गोंधळाची इतकी सवय झाली असते की थोडावेळ जरी शांतता असली तर आपण दचकतो/भांबावतो. आजूबाजूला काही नसेल तर आपल्याला कसंनुसं होतं. कामातून बाहेर पडून या शांततेला कवटाळलं तर आपल्याला चैन पडत नाही. […]

आरोग्य

शाळेत असताना आपण हा सुविचार एकदा का होईना फळ्यावर लिहिला असेल च कि “Health is Wealth” पण या धकाधकीच्या जीवनात खरंच आपण स्वतःची काळजी घेत आहोत का ??? […]

मनावर ताण नाही; ताबा असणं महत्वाचं…

कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी समजून घेऊन आपापसातील संवादात सकारात्मक शब्दप्रयोग केले पाहिजेत. मनाला मन:पूर्वक मानलं, समजून घेतलं, मोकळं केलं, आनंदी ठेवलं, तंदुरुस्त ठेवलं, सकारात्मक विचारांमध्ये गुंतवलं आणि नकारात्मक विचारांपारून दूर ठेवलं कि फक्त आणि फक्त भरघोस घवघवीत यश, आनंदच प्राप्त होत राहतो. अशा परीस्थित मनावर ताण नाही तर ताबा असणं महत्वाचं असतं, हे समजून घेतलं पाहिजे. […]

मनाचं घराशी नातं

आपल्या घराचं अंतरंग सजवण्यात आणि खुलवण्यात आपल्या मानसिकतेचा संबंध असल्यामुळे अंतर्मनाचा त्यांत मोठा वाटा असतो. आपल्या अंतर्मनाच्या सहभागाशिवाय केलेलं अंतर्गत सजावटीचं काम आपल्याच घरात आपल्याला परकेपणा निर्माण करायला कारणीभूत ठरू शकतं. अर्थात, अशी एखादीच सजावट अपवादात्मक असू शकते, की जी आपल्या अंतरंगात न डोकावता केली गेली आहे. […]

1 25 26 27 28 29 132
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..