विविध विषयांवरील वैचारिक लेखन

जाहीरात

बंगलोरच्या ज्या जर्मन मल्टिनॅशनल कंपनीत मी काम करत होतो त्या कंपनीला कधी वर्तमानपत्रांत जाहीराती देण्याची पाळी आली नव्हती. त्याला कारणही तसेच होते. भारतातील ‘ऍटो ऍन्सिलरी सेक्टर’ मधील ही सर्वात मोठी आणि दिग्गज कंपनी होती. डीझेल आणि पेट्रोल इंजीनसाठी लागणारे महत्वाचे भाग बनवणारी ही कंपनी होती. या कंपनीची उत्पादने वापरल्याशिवाय डिझेल आणि पेट्रोल इंजिनांचे प्रॉडक्शन करणे शक्यच […]

पटसंख्येवरील मुले शाळेत कधी दिसणार ?

आयएसओ , प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, शाळा सिध्दी, उपक्रमशील शाळा असे नविनच उच्चारण हल्लीच्या शिक्षण प्रक्रियेत ऐकायला मिळत आहेत. तसेच शाळा एक मंदीर आहे. शिक्षक हे पुजारी आहेत . विद्यार्थी हे दैवत आहे . असे काही सुविचार ऐकायला , पहायला मिळतात. एकंदरीत  आजच्या शिक्षणप्रणालीचा विचार केल्यास ती विद्यार्थीकेंद्रित आणि कृतीयुक्त बनलेली आहे. तुला मोठा झाल्यावर काय व्हायचे […]

वाया जाणारे अन्न वाचवता येईल

लग्नसराई सुरू असते. प्रत्येक जण लग्नाच्या गरबडीत असतो.घरामध्ये उत्साह असतो.याच उत्साही वातावरणात आपण काय करतो.याचे भान नसते. लग्नकार्यात अनेक बाबी हितकारक घडतातच असे नाही. काही परंपरा जपल्या जातात. वधुवरांची मिरवणूक असते. वर्‍हाडींचा थाटमाट असतो. पै पाहुण्यांचे आदरातिथ्य असते. भोजनावळी उठतात.हे प्रत्येक धर्मामध्ये कमीअधिक प्रमाणात घडत असते. त्यामुळे मानवी जीवनात आनंद घेणो हा एक हेतू यामागे असतो. […]

नग्नतेच्या दृष्टी

ऑनलाईन असताना कितीही बिनचूक सेटींग केलेलं असलं तरी एखादं ‘तसलं’ छायाचित्र वा व्हिडीओ हळूच आपल्या स्क्रीनवर झळकून डोळे मिचकावून निघून जातो, आपल्या स्क्रीनवर ‘हे’ आलंय वा येऊन गेलंय हे कुणी पाहिलं नाही याची खातरजमा होताच आपण सुस्कारा टाकतो…पण वस्तुस्थिती काय असते ? एखादं नग्नचित्र दिसणं म्हणजे काय किंवा त्याकडे पाहणे म्हणजे काय याचे उत्तर एका पुस्तकातून […]

बॉलीवूडचे मरणोपरांत भोग

विनोदखन्नाच्या मृत्यूनंतर ऋषीकपूरने बॉलीवूडवर त्रागा व्यक्त केलाय. त्याने असे का केले याच्या उत्तरासाठी थोडं मागे जावे लागेल. […]

एक रात्र ‘नाईट शो’ची ……

आपल्या चौकटीबाहेर एक जग असेही आहे की जिथे कधी काय घडेल याचा नेम नाही… साठ सत्तर एकर शेताच्या मधोमध असणारे ते पाच एकराचे माळरान असावे. बहुधा असे कार्यक्रम तिथे नित्याचे असावेत. त्या पाच एकराच्या तुकड्याला चारी बाजूनी पलानी होत्या. पलानीच्या कडेने निलगिरीची उंच गेलेली दाट झाडी आणि खाली जमीनीलगत चौहूबाजूनी दाट बदामाची झाडं. या ठिय्यापर्यंत पोहोचायला […]

राज्य हवं असेल तर स्वत:वर डाव घ्यायची तयारी ठेवा

आपल्यातील प्रत्येकाला आयुष्यात राज्य हवं असतं पण त्यासाठी स्वत:वर डाव घ्यायला आवडत नाही..नेहमीच आपला डाव कुणीतरी घ्यावा म्हणून यासाठी प्रत्येकजण कुणाचीतरी वाट पाहत असतो.सभोवतली इकडून तिकडून फिरणार्या सोयऱ्यातून कुणीतरी पुढे येईल ही आपली इच्छा काही केल्या फलद्रूप होत नाही.मग आपण इथल्या माणसांच्यामध्ये माणुसकी उरली नाही म्हणून खेद व्यक्त करतो. कधी भावना उरात मावेनाशा झाल्या की त्यातून […]

हाॅटेलिंग आणि मला न प(च)टलेल्या खाण्याच्या माॅडर्न पद्धती

ग्लोबलायझेशनमुळे मध्यमवर्गाच्या हातात बऱ्यापैकी पैसा खुळखुळू लागला व सहाजिकच त्या पैशाला खर्च करण्याचेही मार्गही निघू लागले. माझ्या पिढीचा बचतीकडे असणारा कल, नविन पिढीत खर्च करून उपभोग घेण्याकडे वळू लागला. पैसे साठवण्यासाठी नसून खर्च करणासाठी असतात ह्या विचाराने आता चांगलंच मुळ धरलंय. पैसे खर्च करायच्या नविन मार्गात हाॅटेलिंग हा चवदार प्रकार हल्ली भलताच लोकप्रिय आहे. हल्ली नवरा […]

सरकारनं लाल दिवा काढला, आता हे ही करावं

केंद्र सरकारने काही ठराविक सेवा वगळल्यास सर्वच मंत्री-अधिकाऱ्यांच्या गाडीवरचा लाल दिवा काढून टाकण्याचा निर्णय घेतला हे अतिशय उत्तम काम केलं. सामान्य जनतेच्या भावना सरकार ओळखू शकलं याचा अर्थ सरकारची जनतेशी नाळ जुळली आहे असा होतो. आता सरकारने आणखी एक काम करावं. ‘भारत सरकार’ किंवा ‘मबाराष्ट्र शासन’ असं मराठी-इंग्रजीत मागे-पुढे लिहिलेल्या अनेक सरकारी व खाजगी गाड्या दिसतात. […]

1 2 3 32