राजकारण, राजकीय व्यक्ती, राजकीय पक्ष यासारख्या विषयांवरील लेखन

निवडणुकीतील ए, बी फॉर्म म्हणजे काय?

ए,बी फॉर्म हा शब्द प्रसारमाध्यमातून गेले दोन दिवस सारखा ऐकायला मिळतोय.हा ए-बी फॉर्म म्हणजे काय ? निवडणुकीत त्याचं महत्त्व काय हे प्रश्न तुम्हाला पडले असतीलच. आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष आहेत. निवडणुकांमध्ये हे पक्ष त्यांचे अधिकृत म्हणून काही उमेदवार रिंगणात उतरवितात. त्यांना संबंधित राजकीय पक्षाकडून ‘ए’ फॉर्म दिला जातो. त्यात उमेदवाराचं नाव, पक्षातील पद आणि कोणत्या […]

वेश्या व राजकारणी

दिवसेंदिवस घसरत चाललेली राजकारणाची पातळी मला मुंबईच्या कामाठीपूरा, फोरास रोड, पिला हाऊस या परिसरातील ‘वेश्या’ बाजाराची याद दिलवते..फरक एकच, या परिसरात बसलेल्या वेश्या बऱ्याचश्या बळजबरीने व काही पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाजाने या व्यवसासात आलेल्या असतात. खरं तर वेश्या आणि राजकारणी यांची तुलना करून मी वेश्यांचा अपमान करतोय याची मला जाणीव आहे. वेश्या -बळजबरीने वा नाईलाजाने- एकदा […]

आपल्या मापाचे कपडे कोण शिवणार ?

निवडणूकीचा मोसम सुरू झाला आहे. सर्वच पक्ष आपापले जाहीरनामे, वचननामे नागरीकांसाठी जाहीर करत आहेत. या सर्व ‘नाम्यां’त पक्ष काय करू इच्छितो हेच जाहीर केलेलं असतं. परंतू नागरीकांना काय हवंय याचा विचार कुणीच केलेला दिसत नाही, करतानाही दिसत नाही..! प्रत्येक वाॅर्ड मुंबईचाच हिस्सा असला तरी प्रत्येक वाॅर्डाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत, असतात. एखाद्या वाॅर्डच्या गरजा काय आहेत हे […]

धोक्याचा नवा सायरन – तमिळनाडू !

टोकाचा भाषिक, प्रांतीय अस्मितावाद आणि भीषण परंपरावाद एकत्र आल्यावर त्यातून विघटनवाद जन्माला येतो, जो तमिळनाडूमध्ये आला आहे. […]

किळस आलीय आम्हाला तुमची..

भाजपा-सेना यांच्यातली ‘लोकसेवे’साठी चालणारी झोंबाझोबी पाहून मन कसं भरून यायला हवं, काळीज दाटून यायला हवं आपलं.. पण तसं काहीच न होता चीड, संताप, तिरस्कार, किळसं वाटू लागलीय.. असं होतंय याचं कारण यांना ‘लोकसेवा’ करायची नसून काहीही करून सत्ता व त्या सत्तेतून आपल्या पुढल्या कितीतरी पिढ्यांसाठी प्रचंड माया जमवायचीय हे सर्वांनाच कळून चुकलंय आता (तुमच्या पुढच्या पिढ्या […]

जेंव्हा चार आठ आणे बंद झाले तेव्हा

परवा अचानक मा पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत मौन सोडले तेव्हा गांधारीने आपल्या डोळ्यावरची पट्टी काढून आपल्या डोळ्यातील तेजशक्ती आपल्या लाडक्या पुत्राला देण्याच्या प्रसंगाची आठवण झाल्या शिवाय राहत नाही. डॉ मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या नोटा बंदीच्या निर्णयाचा समाचार घेताना अदमासे दहा वर्षे आपल्या मुखात साठवून ठेवलेल्या ज्ञानमयी वक्तृत्वाने काँग्रेसची लाज सावरण्याचा प्रयत्न केला पण […]

बीसीसीआय आणि सर्वोच्च न्यायालय

भाजपाचे खासदार असणारे बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्या बुडाखालची अध्यक्षपदाची खुर्ची आज सर्वोच्च न्यायालयाने काढून घेतली आहे. तर एनसीपीच्या शरद पवार यांचे प्यादे असणारया अजय शिर्केंची देखील हकालपट्टी न्यायालयाने केली आहे…. गमतीची बाब अशी की कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते, माजी खासदार कपिल सिब्बल हे अनुराग ठाकूर यांचा प्रामाणिकपणा अन निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात केविलवाणी धडपड करत […]

मूर्तीभंजकांची परंपरा…

मंगळवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवला आणि मुठा नदीत तो फेकून दिल्याचं म्हटलं जात आहे. राजसंन्यास’ या नाटकातून राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. संभाजी ब्रिगेडने याआधी दादाजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला होता. […]

‘नोटा – बदली’ नंतरचे ‘राज’ बदल ?

८ नोव्हेंबर २०१६ च्या नोटा – बदलिच्या निर्णयाने मोदी सरकार ने धमाका उडवून दिला.  कोणी त्याचे समर्थन करो , कोणी विरोध करो ; पण कोणीही दुर्लक्ष करूच शकणार नाही . ” अशाच स्वरूपाचा तो निर्णय आहे .  या निर्णयांच्या अंमलबजावणीमुळे अक्षरशः सर्वांनाच या ना त्या प्रकारे स्वतःच्या आर्थिक व्यवहारांचा पुनर्विचार करावा लागत आहे . एक प्रकारे […]

1 2 3 22