नवीन लेखन...

तृप्त मन

एक भिकारी लीन-दीन तो,  भीक मागतो रस्त्यावरी फिरत राही एकसारखा,  या टोकाहून त्या टोकावरी, ।।१ दिवस भराचे श्रम करूनी,  चारच पैसे मिळती त्याला पोटाची खळगी भरण्या,  पुरून जाती दोन वेळेला ।।२ मिठाई भांडारा पुढती,  उभा ठाकूनी खाई भाकरी केवळ मिठाईचा आस्वाद,  त्याच्या मनास तृप्त करी  ।।३ देहाखेरीज कांहीं नव्हते,  त्याचे ‘आपले’ म्हणण्यासाठी परि समाधानी वृत्ती असूनी, […]

शब्द जखम

लाखोल्या अन् शिव्या शाप ते,  देत सूटतो कुणी रागाने शब्दांचा भडीमार करूनी,  तिर मारीतो अती वेगाने बोथट बनूनी विरून जाती,  निकामी होई शब्द बिचारे स्थितप्रज्ञाचे बाह्य कवच ते, परतूनी लावी त्यांना सारे स्थितप्रज्ञाचे कवच तूटते,  अहंकार तो जागृत होता शब्दाने परि शब्द वाढते,  वादविवाद हा होऊन जाता शब्द करिती अघाद मनी,  होवून जाते जखम तयांची काल […]

जशा संध्याछाया येती

जशा संध्याछाया येती, नयन माझे भिजतात , आठवणींचे माणिक-मोती, सर सर खाली ओघळतात,–!!! हात तुझा धरुनी हाती, प्रेमाची केली वाटचाल, नियतीने पण चाल खेळली, प्रितीची दुधारी वाट,–!!! निळ्याशार गहिऱ्या लोचनी, वाचली प्रीतीचीच *आंण,– तनामनात सामावून गेली, तव ओढीला नच वाण,–!!! आज कितीदा स्मरली, प्रीत फुले ती सुगंधी, परस्परांवर सारी उधळत, करायचो रे नजरबंदी,–!!! वाद अबोल्यांच्या त्या […]

ऋणानुबंधन

ठाऊक नव्हते कालपावतो नांव तुझे आणि गांवही क्षणांत जुळले अचानक परि नाते आपुले जीवनप्रवाही   उकल करितो जेंव्हां ह्याची ओळख पटते माझ्या मनां तेच रुप अन तीच मूर्ती पूर्व जन्मीच्या खाणाखुणा   असेल हे जर ऋणानुबंद आणेल एका छायेखालीं साथ देऊन अनुभऊ सुख दुःखे ही जीवनातली   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

शिळा झालोल्या अहिल्या

आजही बऱ्याच अहिल्या     पडल्या शिळा होऊनी कांहीं पडल्या वाटेवरी         कांही गेल्या उद्धरुनी ।।१   कित्येक होती अत्याचार     अबला स्त्रीयांवरी उध्वस्त करुनी जीवन        शिळा त्यांची करी ।।२   काय करील ती अबला    डाग पडता शिलावरी दगड होऊनी भावनेचा   फेकला जातो रस्त्यावरी ।।३   भेट होता तिची अवचित्    कुण्या एखाद्या रामाची शब्द मिळता सहाऱ्याचे      अंकुरे फुटती आशांची ।।४ […]

वेगळ्या दृष्टीने

पाठ राख घन:शामा,मी तर तुझी प्रियतमा,–||१|| साथीने तुझ्या गोकुळ सोडले, अनया सोडून तुज वरले, संसार सारा मोडून आले, पोहोचले आता निजधामां,||२|| प्रीती भक्तीने झपाटले, माझ्यात मी नच राहिले, कृष्णा तुज सर्वस्व वाहिले, लौकिकाची केली न तमा,-||३|| अलौकिक नाते आपले, एकरूप दोन जीव जाहले, तनामनांचे धागे जुळले, कृतार्थ होताना अशा संगमा,-||४|| ढगही सारे भोवती जमले, आजूबाजूस फुलली […]

आत्म्याची हाक

उचंबळूनी येतील शब्द,  हृदयामध्ये दडले जे  । संदेश असता सर्वांसाठी,  कुणी न म्हणतील ते माझे  ।।१ जे जे काही स्फूरूनी येते,  जेव्हा अवचित समयी  । हृदयामधली हाक असे,  ठरते आनंद दायी  ।।२ ‘आनंद’ आहे कोणता हा,  अन् येई कोठूनी  । अंतर्यामी सर्वांच्या ,  सदैव राही  बैसूनी  ।।३ बाहेर पडूनी झेप घेई   दूजा हृदयावरी  । तेथेही जो […]

या भवंसागरातुनी

या भवंसागरातुनी,तारीशी ना रे कान्हा, भोवती निळ्या आभाळी, तूच भासशी राणा,–!!! संसारसागरात भटकती, अनेक हतबल जीव ना,–? हात त्यांना नकळत देशी, करत आपला जादूटोणा,–!!! सागरी या सुखकमळे फुलली, मोहक वाटती, गुलाबी रंगा, दर्शन त्यांचे अधुनी -मधुनी, फक्त पाठ राख श्रीरंगा,–!!! भासतसे सुख फुले उमलली, क्षणभंगुर या जीवना, उमलून फुलती ,कोमेजती, शेवट ठेवती मात्र तरंगा,–!!! अदृश्य ही […]

आई

कशासवे तुलना करुं गे आई, तव प्रेमाची कां शब्द न सुचतां म्हणू तुजला,    ‘ प्रेमची ‘  ।।१ वात्सल्याची देवता, करुणा दिसे नसानसातूनी हात फिरवीता ज्याचे वरती, ह्रदय येते उचंबळूनी ।।२ जेव्हां पडते संकट, आठवण करितो आपली आई विश्वासाचे दोन शब्द,  उभारी त्यासी देई  ।।३ नऊ मास असता उदरीं, शक्ति तेज आणि सत्व देई ते ह्याच ईश्वरी […]

सावल्यांचा खेळ चाले

सावल्यांचा खेळ चाले, दिवस आणि रातीला, माणसाला संगत मिळे, त्यांचीच हो घडीघडीला,–!!! पहाटेच्या प्रहरी उगवे, आवरण सारे धुक्याचे, सोबत देत माणसा, भोवती सारखे नाचे,–!!! सूर्यराज उगवते, खेळ चालू उन्हाचा, पायात सारखे येऊ पाहे, दूर कसा करशी मनुजा,–!!! समय मध्यान्ह ये , सावली जडते पायाला, जिथे जाई माणूस तिथे, कवटाळी ज्याला-त्याला,–!!! संध्याकाळ हळूच येते, घेऊन संधिकालाला, सावली […]

1 147 148 149 150 151 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..