नवीन लेखन...

फोटोच्या माध्यमातून केलेले लिखाण आणि काही खास फोटोसंग्रह

स्वागत नवनिर्माणाचे …..

तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.. सरत्या भाद्रपदाचा हात धरून आश्विन हळूच येतो ….या दिवसातलं मध्येच पडलेलं ठसठशीत पण सोनेरी मृदू ऊन … त्याच्या येण्याची ग्वाही आपल्याला देतं … सृष्टीचे हे दिवस फारच सुंदर असतात …. श्रावण भाद्रपदात पेरलेल्या बीजांनी सुंदर …. भरलेलं रूप घेतलेलं असतं … सृष्टीची ही आनंदात डोलणारी हिरवी समृद्धी नव्या नवरी सारखी सजलेली […]

एका भारलेल्या वास्तूत ….

फोटोत दिसणारी ही भव्य आणि अतिशय सुंदर वास्तू आहे, एक मकबरा. सुफी संत महंमद गौस यांचा. अत्यंत सुंदर आर्किटेक्चर असलेली ही भव्य वास्तू ग्वालियरमधली खास जागा आहे. महंमद गौस हे संगीत सम्राट पंडित मिंया तानसेन यांचे गुरु होते. किती मोठे लोक आणि आपली दिव्य परंपरा आहे बघा. खरं तर तानसेन हे भारतातले सगळ्यात महान संगीतकार पण […]

शिल्पांकित गणराय

हंपी आणि बदामी ही दोन वैभवशाली गावं आपल्या असामान्य वास्तुशास्त्र आणि शिल्पकलेसाठी गेली शेकडो वर्ष दिगंत कीर्ती बाळगून आहेत. तुंगभद्रा नदीकाठावर वसलेलं ‘हंपी’ त्यावेळच्या विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचं ठिकाण होतं. याच परिसरातला बदामीचा ‘वतापी’ गणरायही गेली शेकडो वर्ष भारतीय धार्मिक मनाला भावलेला आहे. ‘बदामी’ हे अगोदर ‘वतापी’ म्हणून ओळखली जायचं. परंपरेने वतापी गणेशाच्या ब-याच कथा सांगितल्या आहेत. […]

सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्या …. गूढरम्य डोंगररांगा …

Image © Prakash Pitkar…. सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्या …. गूढरम्य डोंगररांगा … हिरकणी बुरुजावरून दिसणारं … मराठी मुलुखाचं विहंगम दृष्य पावसाळा … सह्याद्रीच्या ऋतुचक्राचा राजा …. आणि दुर्गराज किल्ले रायगडाच्या हिरकणी बुरुजावरून दिसणारा हा सह्याद्रीच्या दुर्गम … जंगली मुलुखाचा नजारा … घनघोर कोसळणारा पाऊस खऱ्या अर्थाने बघायचा … अनुभवायचा असेल तर सह्याद्रीच्या गाभ्यात वसलेल्या किल्ले रायगडावर जायला हवं […]

वासंतिक झुळूक ….. फुलोरा

हैदराबादच्या आमच्या घराजवळच एक छोटीशी टेकडी आहे. त्यावर एक लहानसं गार्डन आहे. आम्ही रोज सकाळी इथे चालायला जातो. आज जरा अंमळ लवकरच गेलो. साडे सहाच्या थोडसं अगोदरच. वातावरण अति प्रसन्न होतेच पण आजचा सकाळचा वारा काही वेगळाच होता. त्यात असा एक सुखद गारवा होता की जो अंतर्मनाला फार सुंदर स्पर्श करत होता. एक तास झाला पण […]

हरकूळ बॅक वॉटर्स

हरकूळ बॅक वॉटर्स …. फोंडा … भिरवंडे …. सांगवे …. कनेडी परिसर … सह्याद्रीचा पायथा (राधानगरी घाट) …. तळकोकण आयुष्याच्या सायंकाळी सूर मनांतच सनईचे दूर दिगंती मृदू रंगांचे मनमोहन घन मलईचे कोण वागलें काय वाउगें त्याचा आतां विसर पडे भलें पुटा जें आलें त्याचे सडेच मागें आणि पुढें स्नेह पांगले त्या घाटांतिल उंबरठयावर गोड उषा पाणवठयावर […]

राधानगरी घाट.. सह्याद्रीचा महासमर्थ मुलुख !

दास डोंगरी राहातो …..! राधानगरी घाट.. सह्याद्रीचा महासमर्थ मुलुख ! दाजीपूर….राधानगरीचा …. फोंडा …. भिरवंडे … हरकूळ … नरडवे … सांगवे … कनेडी …… हा सहयाद्रीच्या घाटमाथ्याचा … पायथ्याचा महा मातब्बर मुलुख …घनदाट अरण्याचा… आकाशाला स्पर्श करणाऱ्या सहयकडयांचा…कल्पनेपलिकड़े कोसळणाऱ्या पावसाचा… कडेकपाऱ्यांतून …. दऱ्याखोऱ्यातून अहोरात्र थैमान घालणाऱ्या वाऱ्याचा …फुसांडत कोसळणाऱ्या प्रपातांचा … निसर्गाच्या या सगळ्या सामर्थ्यचं प्रतीक […]

राधानगरी धरण परिसर …. डोंगरमाथा … 

राधानगरी धरण परिसर …. डोंगरमाथा … गूढरम्य …. बेलाग सह्याद्री …. ! माझ्या व्याकुळल्या मना …. नको साकळून राहू सख्या आपुल्या गतीने तू मी निरंतर वाहू …. नित्य चांगले स्मरावे .. ओखटे ते विसरावे अहंतेचे द्वाडपण नीट ओळखून घ्यावे ….. आपुली ही पायपीट येथे थोडया दिवसांची वाट पहाते पहाट सोसलेल्या अवसांची …. साकळलेपणामुळे विष प्रसवते जिणे […]

मॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका

या सूर्यास्ताला ‘मॅनहॅटनहेंज’ म्हटलं जातं. याला मॅनहॅटन सोल्स्टाईस असंही म्हटलं जातं. असा हा सूर्यास्त वर्षातून दोन वेळा होतो … मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात आणि जुलैच्या दुसऱ्या आठवडयात. अगदी असाच… वर्षातून दोन वेळा त्याच पॉईंटला सूर्योदय देखील होतो. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..