मराठी आणि महाराष्ट्राविषयक बातम्या आणि घडामोडी…

मनतरंग (भाग १) प्रकाशन सोहळा

येत्या शनिवारी म्हणजेच दिनांक ७ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता, नूतन बांदेकर लिखित मनतरंग (भाग १) या ललित लेखसंग्रहाचे व अॅडिओ सीडीचे प्रकाशन नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका मुख्यालय, पहिला मजला, ठाणे (प) येथे होणार असून माननीय महापौर संजयजी मोरे (ठाणे महानगरपालिका) यांच्या हस्ते प्रकाशन होईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संपदा जोगळेकर-कुलकर्णी (अभिनेत्री), मिलिंद […]

मन की बात – ‘राम मंदीर’ रेल्वे स्टेशन

२२ डिसेंबरला मुंबईत पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी आणि गोरेगांव या दोन स्टेशनमधील ‘राम मंदीर’ या नविन रेल्वे स्टेशनचे उद्घाटन झाले. ‘राम मंदीर’ हे नांव या नविन स्टेशनला दिलं हे चांगलच झालं यात दुमत नाही. पण सारा परिसर पूर्वीपासून ‘औशिवरा’ या नांवाने प्रख्यात आहे. मला वटातं ‘ओशिवरा’ हे नांव ‘ओम शिव हरा’ या भगवान शंकराच्या नांवाचा अपभ्रंश असावा. […]

देशभरात अत्यावश्यक सेवांसाठी ११२ हा एकमेव नंबर

देशभरात अत्यावश्यक सेवांसाठी असलेला ११२ हा एकमेव नंबर नव्या वर्षात कार्यान्वित झालाय. पोलीस, अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दल या सगळ्या सेवांसाठी ११२ हा एकमेव इमरजन्सी नंबर असेल. पोलिसांसाठी १००, अग्निशमन दलासाठी १००, ऍम्ब्युलन्ससाठी १०२ आणि आपत्कालीन संकटासाठी १०८ हे क्रमांक होते. मात्र आता एवढे नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही. केवळ ११२ हा नंबर डायल केल्यास या सगळ्या अत्यावश्यक सेवा उपलब्ध होणार आहेत. ट्रायने […]

चौथे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन २०१६

चारकोप, मुंबई येथे रविवार दि. १८ डिसेंबर २०१६ रोजी नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने चौथे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन २०१६ प्रचंड कवींच्या सहभागाने अत्यंत जल्लोषात पार पडले. सादर महाकाव्यसम्मेलनाचे महाकाव्यसंमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कवी व गीतकार प्रा.प्रविण दवणे होते. काळी 9.30 वा. नवनिर्माण मराठी ग्रंथालय ते महाकाव्यसंमेलन स्थळापर्यंत भव्य काव्यग्रंथ दिंडीचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्या दिंडीत अंदाजे […]

अरबी समुद्रातील शिवस्मारक

मुंबईच्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकारचे भुमीपुजन येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या भुमीपुजनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देशभरातल्या १९ ठिकाणांवरील माती आणि विविध नद्यांचे पाणी आणले जाणार आहे. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असलेले हे देखणे स्मारक साकारण्यासाठी तब्बल ३६०० कोटी खर्च केले जाणार असल्याची माहिती […]

सवाई “साईटस्-साऊंडस्”

सवाई हा फक्त एक उत्सवच नाही तर महोत्सव आहे .. गेली ६० वर्षे दर वर्षी नित्य नियमाने सवाई च्या सर्व मैफिली जागवणारे अस्सल रसिक हे ह्या उत्सवाचे वैशिष्ठ्य .. खाणे आणि गाणे ह्या दोन महत्वाच्या गरजा इथे उत्तम रीतीने पुरविल्या जातात … पुरण पुळ्या , उकडीचे मोदक , उपवासाचे पदार्थ , साबुदाणे वडे , बटाटे वडे […]

फिडेल कॅस्ट्रो

मुळचे स्पॅनिश असलेले परंतु क्युबातच कित्येक पिढ्या गेल्यामुळे वेगळी अस्मिता जोपासणार्या क्युबन जनतेने १८९८ मध्ये क्युबात क्रांति केलि. अमेरिकेने या क्रांतीत मदत करून आपले एक बाहुले सत्तेवर बसविले,या बाहुल्याचे नाव होते जनरल बातिस्टा . या बदल्यात अमेरिकेने क्युबातील टेलिफोन,वीज,साखर आदी महत्वाच्या व्यापारावर आपले नियंत्रण मिळविले. यात क्युबाची जनता भरडली जाऊ लागली. या असंतोषाला वाचा फोडली एका […]

टिप्पणी – इच्छामरण

बातमी  :  डच गव्हर्नमेंट पासेस् अ लॉ फॉर असिस्टेड डेथ् फॉर दि हेल्दी संदर्भ  –  हल्लीहल्लीची, पाश्चिमात्य देशातील एका टी.व्ही. चॅनलवरील बातमी.   आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतात आत्महत्या हा एक गुन्हा मानला जातो. कांहीं काळापूर्वी सरकारनें Euthanasia म्हणजेच दयामरण या विषयावर मतें मागवली होती. ( याविषयी मी सरकारला पाठवलेला माझा, ‘Dayamaran and Ichchhamaran’ हा […]

तुकाराम मुंढे – ९९ विरुद्ध सहा

भ्रष्टाचारयांचा कर्दनकाळ ठरलेल्या तुकाराम मुंढेंच्या विरोधात मतदान करून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने ९९ विरुद्ध सहा असा ठराव जिंकताना जी एकी दाखवली आहे त्याला तोड नाही …… छानच आहे, लोक सर्व बघत असतात आणि त्यानुसार आपले मत बनवत असतात … ‘तुकारामबाबा आणि ९९ चोर’ असा सिनेमा यावरून कोणी बनवला नाही म्हणजे मिळवलं … बाय द वे मुंबईत […]

मंगला बर्वे

अन्नपूर्णा या पाकशास्त्रावरील प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका मंगला बर्वे यांचे काल रात्री (२३ आक्टोबर) निधन झाले. अन्नपूर्णा, इच्छाभोजन, मांसाहारी, चायनीय पदार्थ तसेच खाद्य पदार्थांवरची विविध छोटी छोटी पुस्तके, डोहाळे बारसे, रुखवताचे पदार्थ, लोकरीने विणून केलेली खेळणी अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध होती. मागील पिढीतील नावाजलेले लेखक अच्युत बर्वे यांच्या त्या पत्नी होत.

1 2 3 8