नवीन लेखन...

व्यवस्थापन

सकारात्मक दृष्टीकोन

जेव्हा आपला दृष्टिकोन सकारात्मक असतो तेव्हा आपण तक्रारी न करता, आहे त्या परिस्थितीचा आपल्या ध्येयाप्रती सदुपयोग करून घेऊ शकतो. कितीही कठीण काळ असला तरी त्यावर मात करून आपण आपलं भविष्य घडवू शकतो. जेव्हा आपण सकारात्मक लहरी आपल्या जीवनात निर्माण करतो तेव्हा आपण सकारात्मक घटना आपल्या आयुष्यात आकर्षित करतो आणि त्याचा आपल्या ध्येयाप्रती उपयोग होतो. […]

आयुष्याचा निर्णय कुणाचा ?

आपलं आयुष्य कसं असावं हा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. जे विद्यार्थी आई वडिलांनी पसंतीचं करीयर करू दिलं नाही म्हणून आपल्या अपयशाचे खापर त्यांच्यावर फोडतात. तसंच घरच्यांचा विरोध असतांनाही व्यसनं करतात, आपल्याच पसंतीचा जोडीदार आणतात. ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की आपल्याला जेथे सोईस्कर असते तिथे आपण आपले निर्णय घेतो आणि इतर ठिकाणी आपल्या त्रासाचा किंवा अपयशाचा दोष दुसऱ्यांना देतो. […]

अशी जपा आपल्या प्रेमाची नाती

सध्या मोबाईलच्या युगात बरेच जण प्रत्यक्ष भेटणं कमी आणि सोशिअल मीडियावर चॅटिंग करण्यात  जास्त वेळ घालवतात तसेच सध्याच्या जगात बरेच जण स्वतःचा खूप विचार करतात पण आपल्या नात्यांना फारस महत्व देत नाही. सध्या सोशिअल मीडियाच्या जमान्यात आणि धावत्या आयुष्यात महत्वाची असणारी नाती हरवत चालली आहेत.त्याच नात्यांना जपण्यासाठी काही खास टिप्स येथे देत आहे… […]

इंजिन ड्रायव्हर आणि गाडीचा प्रवास

विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळी अमृतसर येथे झालेल्या मोठ्या रेल्वेअपघातांमध्ये रेल्वेचे जबाबदारी होती का?   इंजिन ड्रायव्हरचा दोष होता का?  रेल्वेने आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला का?  असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले.  याच संदर्भात रेल्वेचे इंजिन ड्रायव्हर कसा परिस्थितीत काम करतात,  त्यांच्या कामाचे स्वरुप काय असतं,  याचं फार सुंदर विवेचन या लेखात केलेलं आहे. दोन ते तीन हजार प्रवाशांच्या सुखकर प्रवासाच्या नाड्या इंजिनातील दोन कर्तबगार माणसांच्या हातात असतात याची जाणीव प्रवासात एकदा जरी आली तर तो त्यांच्या सचोटीच्या कामाला मानाचा मुजरा ठरेल. […]

सामाजिक शिष्टाचार – लक्षपूर्वक ऐकणे

एकमेकांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय एकत्रपणे काम करताच येत नाही. ऐकण्याचे महत्व कशासाठी ? दुसर्‍याचे ऐकून घेणे व कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे आजूबाजूच्या निरनिराळ्या आवाजातील हवा तो नेमका आवाज निवडून त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे. कोणत्या आवाजाकडे लक्ष देणे हे त्या त्या वेळच्या गरजेवर अवलंबून आहे. […]

सामाजिक शिष्टाचार – वक्त्याचे सादरीकरण

श्रोत्याने वक्त्याचे बोलणे ऐकणे जसे महत्वाचे तसेच वक्त्यानेही श्रोत्याचे लक्षवेधक बोलणे महत्वाचे. अगदी हजारोंच्या सभा गाजवणारे वक्तृत्व प्रयत्नपूर्वक कमवावे लागते. पण मिटींगमध्ये आपले म्हणणे मांडण्यासाठी लागणारी वक्तृत्वकला थोड्या प्रयत्नाने सहज साध्य होऊ शकते. […]

सामाजिक शिष्टाचार- वेळेचे नियोजन व व्यवस्थापन

प्रत्येकाने आपले काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. ठरलेल्या वेळेत गुणवत्तापूर्ण काम होणे हे तर उत्पादकतेचं प्रमुख परिमाण आहे. आपापले काम वेळेवर पूर्ण करणे हे केवळ संस्थेच्या हिताचेच नव्हे तर आपले जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी, वेळेचा सदुपयोग करून अनेक व्याप सांभाळण्यासाठी उपयुक्त आहे. गेलेला क्षण परत येत नाही म्हणून प्रत्येक क्षण सत्कारणी लावावा लागतो. त्यासाठी आवश्यक आहे ती कामांची क्रमवारी ठरवणे. […]

सामाजिक शिष्टाचार – संस्थेची माहिती करून घेणे

संस्थेची परिपूर्ण माहिती असल्याशिवाय कर्मचारी संस्थेतील अंतर्गत दळणवळण नीट हाताळू शकणार नाहीत. शिवाय कुरियर असो वा पोस्टमन,ग्राहक असो वा मालपुरवठादार, सर्वांना योग्य ठिकाणी जाण्याचे मार्गदर्शन करू शकतील. […]

सामाजिक शिष्टाचार – सौजन्याचे दुसरे नाव लुफतान्सा

सकारात्मक दृष्टीकोन आणि सहवेदना असेल तर कोणत्याही ठिकाणचे कर्मचारी ग्राहकांचे हित बघतील, त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतील. लुफतान्सा या जर्मन हवाई प्रवास कंपनीचे कर्मचारी प्रवाशांना सर्वतोपरी मदत करण्यास सगळे कर्मचारी उत्साहाने झटत असतात. […]

सामाजिक शिष्टाचार – संघभावना

कोणत्याही सांघिक खेळातच काय पण रोजचे काम योग्य रीतीने पार पाडण्यासाठी व ते करताना येणार्‍या सर्व प्रकारच्या अडीअडचणींना तोंड देण्यासाठी संघ भावना अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडे सर्व प्रकारच्या संस्थांमधे संघभावना अभावानेच आढळते. संघ भावना निर्माण न होण्यात कोणत्या गोष्टी अडसर ठरतात हे जाणून घेतले पाहिजे. […]

1 4 5 6 7 8 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..