नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

आद्य मराठी भाषाप्रभू संत ज्ञानेश्वर

ज्ञानेश्वरीतील पहिल्या काही ओव्या वाचल्या कि माऊलींच्या प्रतिभेची ताकत लक्षात येते. आणि आपण किती नकळतपणे आपला देव अक्षर रुपात पाहू लागतो, याची आपल्याला कल्पनाही येत नाही. […]

वाटा तुमच्या हिताच्या

आता तुझ्या वर आईचे संस्कार झालेले आहेत म्हणून त्याबद्दल जास्त सांगत नाही. फार तंग कपडे. हवामानाचा विचार करून. आवश्यक तेवढेच. वारेमाप खर्च करून आवडते म्हणून आणणे बरोबर नाही. हौस मौज करावी नक्कीच पण मर्यादित. सांगायला बरेच काही आहे म्हणून तुला जास्त सांगणार नाही. पैसा वाचवणे म्हणजे मिळवणे होय. खर तर मला हे सांगायला नको वाटते तरीही सांगावेसे वाटते की आयुष्यात तुमच्या भाषेत सांगायचं तर एन्जॉय म्हणून मूल उशिरा होऊ देणे हे अजिबात चुकीचे आहे. आधीच वय शिक्षण नोकरी लग्न हे सगळे वेळीच होत नाही त्यात हा विचार याचा काय परिणाम होतो याचा विचार करून निर्णय घ्यावा. […]

तुका आकाशाएवढा

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी लिहिलेला हा लेख महाराष्ट्राच्या संत परंपरेचे रहस्य आपल्या अभंगातून मांडताना बहिणाबाईंनी सार्थपणे असे म्हटले आहे की ज्या वारकरी धर्माचा पाया ज्ञानोबांनी घातला त्याच्या कलश स्थानी तुकोबा आहेत. तुकोबांचा अभ्यास म्हणजे एका महायात्रेच्या प्रस्थानासाठी सिद्ध होणे आहे. ही आंतरिक अशी यात्रा आहे. ही धरणीवरल्या माणसाला आकाशाची […]

भारतामध्ये राजकारणी आणि प्रशासनाला का जबाबदार धरले जाते?

हुकूमशाहीला किंवा एकाधिकारशाहीला समाजवाद समजलं गेल्यामुळे भारतात लोकशाही हा मोठ्ठा विनोद झाला.
माणसाच्या डे टु डे गोष्टींमध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप होऊ लागल्यामुळे, राजकारणी आणि प्रशासन हा लोकांच्या टीकेचा विषय झाला. निवडून येणे हा सर्वोच्च असण्याचा निकष झाला, शिक्षण अनुभव ज्ञान हे दुय्यम झाले. सत्ता एकवटली गेली, अभिव्यक्ती हरवली गेली. […]

दळिता कांडिता

संसारात पण घरच्या कर्त्या माणसाने अगदी घट्टपणा म्हणजेच खबींर मजबूत मनाचा असेल तरच वरच्या पाळी प्रमाणे आपल्या सर्वांच्या सुखासाठी. समाधानासाठी राबणारी मरमर करणारी उसंत न घेता न दमता भिंगरी प्रमाणे फिरणारी तिला साथ दिली तर सर्वांचे कल्याण. आणि नंतर पण निगुतीने पीठ एकत्रित करून भरावे लागते. सर्वांना बांधून ठेवले तरच. वेग. स्पर्धा. गरजेपेक्षा जास्त. योग्य वेळी योग्य निर्णय असे शिकवतात दळण. त्यामुळे कस दळाव हे कळायला हवे.नाही तर काय होईल ते तुम्ही ठरवा पीठा ऐवजी सगळेच अर्धवट. श्रम करताना दमणे आलेच अशा वेळी चिडचिड. त्रागा. दुसर्‍यांना दोषी ठरवणे हे मात्र होऊ नये म्हणून दळिता कांडिता तुज गायीन अनंता यासाठी ओवी.चांगले विचार. अजून बऱ्याच गोष्टी आहेत शिकण्यासाठी.. […]

५ सप्टेंबर ! शिक्षक दिन !!

जेंव्हा शिक्षक नव्हतो तेंव्हा ” प्रशिक्षक (ट्रेनर ) झालो. प्रक्रिया थोडीफार तीच ,पण आवडली. शिक्षक बनून- learning तर प्रशिक्षक बनून unlearning followed बाय relearning ! फरक काय तो एवढाच ! […]

गुरू एक जगी त्राता

आमच्या गोपुजकर बाईंना या जगातून जाऊन साडेतीन महिने उलटले. कोरोना येण्याच्या आधी एक वर्षापूर्वी झालेली त्यांची पुनर्भेट अगदी आजही विसरली जात नाही. शाळा सुटली त्यानंतर, म्हणजे जवळजवळ चार दशकं उलटून गेल्यावर झालेली ही पुनर्भेट मनाला खूप आनंद देऊन गेली होती. आज गुरुपौर्णिमेच्या दिनी त्यांची अधिकच आठवण येतेय. जो लघु नाही तो गुरू, अशी गुरूची व्याख्या विदुषी […]

बृहन्मुंबई महानगरपालिका (आरोग्य विभाग)

एक सुखकारक अनुभव मुंबई महानगरपालिका , त्यांची कार्यपद्धती , गोंधळाचं वातावरण , हलगर्जीपणा आणि त्यातूनही महानगरपालिकेची इस्पितळं तर फारच भयानक , केविलवाणी परिस्थिती , तिथे येणारे रुग्ण , डॉक्टरांचा निष्काळजीपणा यावर आपण नेहमीच बोलत असतो , बोटं मोडत असतो. या संपूर्ण कोरोना काळात तर मुंबई महानगरपालिकेच्या इस्पितळांबद्दल सतत उलटसुलट प्रतिक्रिया येत होत्या. या सगळ्या नकारात्मक पार्श्वभूमीवर […]

मुखवटा नाटीका क्रमांक २ (आठवणींची मिसळ २२)

नाटकांतलं खरं खोटं ठरवणं मोठं मुष्किल. समजा नाटकामधे रंगमंचावर प्रणय प्रसंग चालू आहे. नायक-नायिका रंगात आली आहेत. प्रेक्षकांना त्या प्रणयाच्या दृष्याने भारून टाकलंय. ते मनाशी म्हणतायत, “किती छान अभिनय !” त्याचवेळी पहिल्याच रांगेत बसलेल्या नायकाच्या पत्नीला मात्र तो अभिनय “अभिनयच” आहे की खरेच रंगलेत? ह्या शंकेचं काहूर छळत असतं आणि नंतर नाटक संपल्यावर तोच नायक तिच्याशी लडिवाळपणे बोलून प्रेम व्यक्त करतो, तेव्हां तिच्या मनांत येतं “आता हा अभिनय तर नाही ना?” अभिनय तर आपण सर्वच करत असतो. […]

1 89 90 91 92 93 488
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..