नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

पत्रांचे अल्बम

काही जीर्ण-शीर्ण पण तग धरून राहिलेली , काही बऱ्या अवस्थेत ! एकेकाळी आमच्या उभयतांच्या प्रकाशित साहित्याच्या कात्रणांचे अल्बम मी केले होते, पण नंतर संख्या वाढत गेल्याने तो नाद सोडून दिला आणि ते सरळ फाईलबद्ध करायला सुरुवात केलीय. […]

पॉझिटीव्ह एनर्जी

देशमुख साहेबांना रात्री दीड वाजता छातीत दुखू लागले. त्यांनी विराजच्या आईला उठवले आणि छातीत दुखतंय असं सांगितलं. गेल्याच आठवड्यात पारकर साहेबांच्या पण रात्री छातीत दुखू लागले होते, पण त्यांना ॲसीडीटी झाली असेल असं समजुन मुलाने अँटॅसिड पाजले आणि झोपायला सांगितले. रात्री झोपलेले पारकर साहेब सकाळी उठलेच नाहीत. त्यांचा मुलगा नंतर ऊर बडवून मीच बाबांना मारलं, त्यांना […]

तेरी मेरी ‘कहानी’ है…

गेल्या रविवारी रात्री टीव्ही वर ‘इंडियन आयडाॅल’ कार्यक्रम पाहत होतो. प्यारेलाल सपत्नीक आलेले होते. त्यांची एकाहून एक सरस गाणी नवे गायक गात होते. काही वेळाने व्हिलचेअरवरुन एका व्यक्तीला स्टेजवर आणले गेले. ते होते ज्येष्ठ गीतकार संतोष आनंद. सहस्त्र चंद्रदर्शन करण्याच्या वयामध्ये आपल्या एकमेव चांदणीसह (नातीसह) त्यांनी संवाद साधला. परिस्थितीने गलितगात्र असताना देखील स्वाभिमानाने नेहा कक्करने देऊ […]

प्रेरणादायी इंदुताई

ताई हे नाव इंदूबाई गणपती तोडकर या नावाने अख्या तोडकर भावकीत तीनशे साडेतीनशे लोकातच नव्हे तर अखंड गावात ओळखलं जात होतं. लहानापासुन थोरांपर्यंत तिला प्रत्येक माणूस ताई म्हणुनच हाक मारत असे. […]

अथांग…..

त्याची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. तो बालहट्ट पुरवत मुलांचे वेगवेगळ्या पोझेस मधले फोटो काढण्यात दंग होता. मध्येच आपल्या कॅमेऱ्यात मावळतीचा सूर्य आणि मुंबईचं देखणं रूप टिपत होता. […]

खांदा

एक नामांकित अभिनेत्री; पण काही वर्षांपूर्वीची. एकेकाळी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी. खरं तर अभिनयाची संधी तिला फार उशिरा मिळाल्यामुळे त्या वयानुसार भूमिका वाट्याला यायच्या, पण त्या सगळ्या तिने अजरामर केल्या. आता मात्र सगळंच चित्र बदललं होतं. एव्हाना लोकांना तिचा विसरच पडला होता. नव्याच्या झगमगाटापुढे जुनं झाकोळलं गेलं. मानमरातब, प्रसिद्धी, पैसा सगळं गेलं अन् शिवाय भरीला वार्धक्य आलं. दोन खोल्यांच्या छोट्याश्या घरात एकटीच राहायची. घरकाम, स्वयंपाकाला एक बाई यायच्या तेवढंच काय ते. बाकी दिवस ढकलणं सुरू होतं फक्त. […]

कालसुसंगत (Relevant)

दिवसागणिक अशा प्रयॊग करणाऱ्यांची आणि काळाशी सुसंगत राहण्यासाठी प्रयत्नशील असलेल्यांची माझी यादी वाढत आहे. हा relevance खाद्य संस्कृती,करमणूक क्षेत्र, वाहन व्यवसाय आणि अशा सगळ्या दिशांनी पसरत चाललाय. […]

धडाकेबाज इग्नेश्यस

इग्नेश्यस अगार्बी जेव्हा नायजेरियाचा वित्तमंत्री म्हणून नेमला गेला तेव्हा कुणालाही आश्चर्य वाटलं नाही. साहजिकच आहे, गेल्या सतरा वर्षातला तो सतरावा वित्तमंत्री झाला होता ना. नेमणूक झाल्यावर पार्लमेंटमधल्या पहिल्याच भाषणात त्याने ठणकावून सांगितलं की तो समाजातली लाचलुचपत, भ्रष्टाचार पूर्णपणे निपटून टाकण्यासाठी वित्तमंत्री झाला आहे, ज्या सरकारी अधिकाऱ्याचं वर्तन धुतल्या तांदळासारखं नसेल अशानं हा स्पष्ट इशारा समजून सरळ मार्गावर यावं अन्यथा त्याची गय केली जाणार नाही. भाषणाची अखेर त्यानं ‘नायजेरियाला लागलेली ही कीड मी निर्दयपणे चिरडून टाकणार आहे’ या […]

आदर्श

थोरामोठ्यांचे आदर्श तर आपल्यासमोर असतातच पण या चिमुकलीनेसुद्धा जाता जाता नकळतपणे नक्कीच एक आदर्श घालून दिला होता.(स्वानुभवावरून प्रेरित कथा) […]

अमर आभाळा एवढा – अमर शेख नावाचे वादळ

‘सुटलाय वादळी वारा’ आणि ‘माझी मैना गावाला राहिली’ या दोन शाहिरी गीतांनी भारावेला कामगार चळवळीचा तो काळ, जीवनातील दु:खे, जीवलगांची ताटातूट आणि पिळवणूकीतील मानहानी या सर्वांना झंजावाताचे रुप देण्याचे कार्य अमर, आणि अण्णा या कामगार  दलित शाहिरांनी केले. […]

1 75 76 77 78 79 488
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..