नवीन लेखन...

मास्तर दत्ताराम – गोव्याचे भूषण

गोव्याने अनेक दिगग्ज कलाकार रंगभूमीला दिले आहेत.आपल्या कर्तृत्वाने तिथे आपले स्थान निर्माण केले असलेले एक म्हणजे मा दत्ताराम. एकदा का चेहऱ्याला रंग चढला कि ते त्या भूमिकेत शिरायचे, त्या रंगमंचाचे वातावरण जणू त्यांचा कायापालट करत. त्या नन्तर ते कधी रसिकांच्या मनावर अधिराज्य करत हे कुणालाच कळत नसे. […]

शिवीतील मातृभाषा

दिल्ली विद्यापीठातील प्रख्यात भाषा विद्वान, लेखक डॉ भोलानाथ तिवारी यांनी पीएचडी प्रबंधा करीता रशियातील कजागिस्तान व उझबेकिस्तान येथील स्थानिक हिंदी बोली वर अभ्यास करण्या साठी दौरा केला. तेथील जैन,सिख,उत्तर भारतीय लोकांच्या संपर्कामुळे विशिष्ठ हिंदी बोली प्रचलित झाली आहे. […]

मनाने कोकणवासी झालो

मी मूळ सोलापूरचा. सोलापूरजवळ नळदुर्ग म्हणून गाव आहे, उस्मानाबाद जिल्ह्यात तिथे माझा जन्म! कोकणामध्ये माझा पहिला प्रवास झाला तो गोव्यावरून परत येताना मित्रांसमवेत आणि ती पहिली ओळख माझी कोकणची! त्यानंतर हेदवीला आमचा एक प्रयोग होता नाटकाचा, त्या निमित्त कोकणात उतरून असा पहिला प्रवास झाला. हळूहळू कोकणाशी संपर्क वाढला. त्यानंतर माझे सासरेबुवा कोकण रेल्वे मध्ये होते, त्यामुळे […]

कसबा संगमेश्वर

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘अलकनंदा’ आणि ‘वरुणा’ या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ‘संगमेश्वर’ हे ‘कसबा संगमेश्वर’ म्हणून ओळखले जाते. त्या गावात दोन गोष्टी प्रमुख आहेत, त्या म्हणजे चालुक्यकालीन श्रीकर्णेश्वर मंदिर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तेथील वास्तव्य. ‘कसबा’ या फारसी शब्दाचा अर्थ ‘वस्ती’. ‘संगमेश्वर’ गावाचे खरे नाव ‘नावडी’. इसवी सनापूर्वी महाराष्ट्रामध्ये जैन आणि लिंगायत धर्मीय राज्ये होती, […]

मिले सूर मेरा तुम्हारा….

मला हा लेसन शिकवशील का? आणि धडा काढून दाखवला.नातवानं तो तर शिकवलाच आणि ते नेमके कोणते गाणे होते हे त्याला दाखवायला सांगितले आजोबांना. अभ्यासक्रमात काही धडे वेगवेगळ्या कारणांमुळे निवडलेले असतात. […]

तेथे कर माझे जुळती

सिंगापूर सरकारने अनेक उत्तम योजना राबवत ज्येष्ठ नागरिकांचे महत्व राखले आहे आणि म्हातारपण हे सुखकारक होण्यासाठी हातभार लावला आहे. हा लेख लिहिण्याच्या निमित्ताने मी सिंगापूरचे ज्येष्ठ नागरिकांसंबंधीचे कायदे आणि नियम तपासले. सिंगापुरात कायद्याने 60 वर्षाची व्यक्ती ही ज्येष्ठ नागरिक मानण्यात येते. […]

‘लॉटरीचे तिकीट’- स्वप्न आणि इच्छा पूर्ती!

….पण तो म्हणाला” हे माझं शेवटचं लॉटरीचे तिकीट आहे .आजच्या  दिवसाची सर्व तिकीट खपली असून ,एकच आता बाकी आहे. हे संपलं की मी लवकरच मालकाकडे जाऊन हिशोब देऊ शकतो “ .त्याचे हे बोलणं ऐकून ,का कोणास ठाऊक पण माझ्या मनात त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आणि कळत नकळत का होईना मी  लॉटरीचे तिकीट विकत घेतलं आणि पर्समध्ये ठेवून दिले . […]

कोणाच्यो म्हशी?

चांगदेव आणि कुटूमातली सगळीजणा म्हशीक  हाकीत हूती तरी म्हस जाग्यावरना हलत नाय हूती. चांगदेवान जावन बेडरूमातना भायर पडणारा दार उघडल्यान आणि म्हशीक हाकूक लागलो तरी म्हस जावक मागना. लय येळ प्रयत्न करून पण म्हस जागची हलना. अकेरेक चांगदेवान गाव गोळा केल्यान. संत्याकडे निरोप धाडल्यानी.संत्याची लाली म्हस मारकुटी हूती ती उभ्या गावाक म्हायती. म्हस बेडरूमात गेली कशी हेच्यावर चर्चा रंगली. […]

नातं जपताना

शेजारपाजारच्या माणसात मिसळण्याची त्यांच्या अडीअडचणीला मदत करण्याची देखील सवय लावून घेतली पाहिजे. पेराल तसं उगवतं या न्यायाने हीच माणसं पुढे जाऊन तुमच्या उपयोगी पडणार असतात. स्वत:ला कशात न कशात कायम बिझी ठेवलं पाहिजे आयुष्यातले दुःखाचे क्षण आठवण्यापेक्षा आनंदाचे क्षण आठवण्याची सवय लावून घेतली पाहिजे. थोडक्यात येईल त्या परिस्थितीचा स्वीकार करत स्ट्रेस न घेता नेहमी आनंदी राहता आलं पाहिजे. […]

1 38 39 40 41 42 282
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..