नवीन लेखन...

नेली ब्लाय – धाडसी अमेरिकन पत्रकार

नेली ब्लाय ही जगप्रसिद्ध अमेरिकन पत्रकार ! बातमी मिळवून तिची ‘स्टोरी’ करण्यासाठी ती कोणतीही भूमिका करीत असे. ही भूमिका करताना ती कोणतेही धाडस करीत असे. तिच्या धाडसाला सीमा नव्हती. समाज काय म्हणले याची भीती तिने कधीच बाळगली नाही. वाचकांना सत्य जाणण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळवून देण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तिच्या मनाची तयारी असे. […]

सिनेमावेडं ‘माॅलीवुड’

शोले’ नंतर त्यांनी ‘डाॅन’, ‘करण अर्जुन’, ‘गजनी’, ‘शान’, ‘लगान’, ‘सुपरमॅन’ असे धम्माल चित्रपट काढले. ही कल्पना सुचली, नासीर शेख नावाच्या युवकाला. तो एक स्वतःचं व्हिडीओ पार्लर चालवत होता. साहजिकच त्याने व्यवसायाच्या निमित्ताने अनेक हिंदी, इंग्रजी चित्रपट पाहिले. […]

बांधणी भाषेची आणि दडलेले अंतरंग

मराठी भाषा,भाषेचे उच्चार, लहेजा, त्यामधून डोकावणारं आणि ऐकणाऱ्याला जाणवणारं वेगळेपण, भाषेचे वळसे, वेलांट्या, वळणं आणि त्यामधून बाहेर येणारं पोटातलं या सगळ्याची एक गंमत असते नाही ?
घाबरून जाऊ नका ! मी काही मराठी भाषा आणि तिच्यावर साधक बाधक चर्चा यामध्ये अजिबात शिरणार नाहीय. […]

कोकण विकासाची संधी

आज मुंबई शहर उपनगर तसेच ठाणे, रत्नागिरी, रायगड किंवा सिंधुदुर्गचा कोकणात समावेश होत असला तरी चिनी प्रवासी युआन च्यांग याच्या वर्णनावरून वनवासी, बेळगाव, धारवाड इत्यादी घाटापलीकडील प्रदेशाचा कोकणात समावेश होता असे दिसते. मध्ययुगात कोकणचे तीन भाग मानले गेले होते. तापीपासून वसईपर्यंत ‘बर्बर’ बाणकोटपर्यंत ‘विराट’, देवगडपर्यंत ‘किरात’. पूर्वी हा सारा प्रदेश अपरान्त नावाने ओळखला जाई त्याचे नाव कोकण कसे झाले याबाबत मतभिन्नता आहे. […]

कोकण : मराठा आरमाराची भूमी

छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीचा वनराईने व्यापलेला इतरांना जिंकायला अवघड असलेला हा प्रदेश स्वराज्यासाठी निवडला. वणव्याप्रमाणे पसरत चाललेल्या मोगलांच्या सत्ताप्रसारापुढे संपूर्ण देश हतबल असताना, ‘संकटं पराक्रम गाजविण्याची संधी देतात’ या तत्त्वाने स्वराज्य निर्मितीसाठी, सह्याद्रीच्या शिखरावरील किल्ले आणि पाताळाला, समुद्राला जाऊन भिडणाऱ्या कोकणदऱ्या, खाड्यांचा आधार घेतला. […]

कोकण म्हणजे स्वर्ग

पर्यटन हा तर कोकणाचा श्वास! ढगांनी गच्च भरून ओथंबून येणारं आकाश आणि सहस्रावधी जलकुंभांनी अभिषेक करावा असा अनिर्बंध कोसळणारा पाऊस कोकणातला पर्यटन हंगाम खऱ्या अर्थानं जिवंत करतो. ओसंडून वाहणारे धबधबे, धडकी भरवणारे पण डोळ्याचं पारणं फेडणारे घाटरस्ते, थंड हवेची ठिकाणं आणि स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना खुणावतात. […]

हतबल – भाग दोन

इस्पितळातून तेथील ड्यूटी कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यात फोन येतो. हवालदार मेसेज रीतसर लिहून घेऊन ड्यूटी ऑफिसरला थोडक्यात सांगतात . ” सर, xxxxxx हॉस्पिटल मधून डेथ बिफोर अँडमिशनचा मेसेज आहे .”ड्यूटी ऑफिसर मेसेज वाचतो . पोलिस स्टेशन डायरी मधे , त्याच्यासोबत जात असलेल्या हवालदारांचा बकल क्रमांक नमूद करून ” xxxx इस्पितळात रवाना ” झाल्याची नोंद करतो आणि तातडीने […]

नमामि गंगे

उत्तर प्रदेश भारतातलं सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं कृषीप्रधान राज्य.मोहोरी,ऊस आणि बटाटे इथली प्रमुख पिकं.महामार्गांच्या अगदी लगत जर्द पिवळ्या फुलांनी आच्छादलेली लांबच लांब पसरलेली मोहोरीची हिरवीगार शिवारं डोळ्यांना गारवा देत होती.त्यात हवेत अगदी दुपारच्या दोनच्या टळटळीत उन्हातसुद्धा हवेत किंचित असलेला गारवा छान आल्हाददायक वाटत होता. […]

पंढरपूरचा चहा!

३ जानेवारी ते १९ फेब्रुवारी असा कॉर्पोरेट विश्वातील दौरा केल्यावर एक आठवडा कुटुंबियांसमवेत विश्रांतीचा घालवून आता महिन्याभरासाठी शैक्षणिक जबाबदारी घेऊन परत घराबाहेर पडलोय. प […]

ये कहाँ आ गए हम !

सक्काळी दार उघडलं आणि अतिथी गृहाच्या दारातील झाड खाली झुकून म्हणालं – ” हाती येतील तेवढी फुले खुशाल खुडून घे. वृथा उड्या बिड्या मारून उंचावरची तोडायचा प्रयत्न करू नकोस. ती राहू दे माझ्या अंगावर ! थोडं फुललेलं झाड छान दिसतं मग दिवसभर ! ” […]

1 36 37 38 39 40 282
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..