संथ वाहते कृष्णामाई 

खळाळून वाहणारी कृष्णा नदी, तिच्या तीरावरील सुंदर दगडी घाट व रेखीव देवळं त्यात चितारली होती आणि त्या पेंटिंगच्या खाली १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका मराठी चित्रपटातील गीताच्या दोन ओळी लिहिल्या होत्या…….. […]

इंग्रजांनो, शतशः सलाम ! 

एका जर्मन कंपनीच्या कृषी विभागातर्फे आठ वर्षे कोकणात भटकंती करत असताना इंग्रजांच्या काळातील असा एकही पूल शिल्लक राहिला नाही जिथे थांबून पुलावर लावलेल्या दगडावरील (प्लेक्) माहिती मी वाचली नाही. ३४ वर्षांपूर्वी कोकण रेल्वे अस्तित्वात आली नसल्यामुळे रस्त्यांवरूनच प्रवास करावा लागत असे. मोबाईल अस्तित्वात आला नव्हता व चांगल्या कॅमेऱ्यांच्या किमती आवाक्याबाहेर असल्यामुळे फोटो काढणे शक्य नव्हते. पूल […]

तुलनेचे बळी

का वागतो आम्ही असे? या जगात दोन व्यक्तींची तुलना होऊ शकते? प्रत्येक व्यक्तीत एक पूर्णपणे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व लपलेलं असतं व त्याला किंवा तिला स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याची पूर्ण मुभा असायला हवी, असं तुम्हाला नाही वाटत? जोपर्यंत या जगातील दोन व्यक्तींच्या अंगठ्यांचे ठसे तंतोतंत जुळत नाहीत, तोपर्यंत दोघांमध्ये तुलना करण्याचा या पृथ्वीवर कोणालाही अधिकार नाही. अगदी जन्मदात्यांनाही! […]

वर्‍हाडाची तर्‍हाच न्यारी….

लग्नसोहळा हा सर्वांच्या आवडीचा विषय. नवरदेव, नवरी, करवले, सोकाण्या, करवल्या, वरमाई, वरबाप , वर्हाड, मांडव, बोहला, जानवसा, देवक,अक्षता, परण्या ,आहेर, वरात हे शब्द मध्यमवर्गाच्या लग्नकार्याची साक्ष देणारे. ग्रामजीवनात लग्नपायर्या ठरलेल्या असतात. हळद लावणे, तेल चढवणे, देवाचे दर्शन, मिरवणूक , मंगलाष्टके, आशिर्वाद, सप्तपदी, सूनमुख पाहणे, भोजन,  रंगनाथ दर्शन, नवरी वाटं लावणे, येतीजाती, सोळावा वगैरे. तसेच वाजंत्री, तोफ […]

पाऊस

मंडळी , पहाटेचे ४.३० वाजलेले, सिंहगडाच्या पायथ्याशी कोंढणपूर नामक एका गावात निर्मिती फार्म्च्या खोलीत बसून खिडकीतून बाहेर अविरत बरसणारा पाऊस अाणि रातकिड्यांची किरकिर….. कधी कधी असा एकांत अापल्याला अंतर्मुख करून जातो……अख्खा जन्म पुरणार नाहि इतकं निसर्ग सौंदर्य अापल्या अाजूबाजूला असतं , पण निव्वळ ऐहिक सुखाच्या मागे लागून अापण असे क्षण जगायचंच विसरून जातो…..बघा कधीतरी असं पहाटेचं […]

पंढरीच्या वाटेवर

महाराष्ट्राला वारकरी सांप्रदाय ही खूप मोठी अध्यात्मिक देणगी लाभलेली आहे.त्यातील वारी हा अविभाज्य भाग. दर आषाढ- कार्तिक महिन्यात असंख्य दिंड्या निघतात. पताका खांद्यावर घेऊन , टाळ आणि मृदंगाच्या गजरात ह्या दिंड्या पंढरीकडे आगेकुच करतात. हरिनामाचा घोष होतो. उत्साही वातावरण असते. मजूर, शेतकरी, व्यावसायिक सर्वच स्तरातील माणसं वारीत सहभागी होतात.आनंदाचे डोही, आनंद तरंग ची अनुभुति घेत.मुलांसाठी हा […]

नवं न्यारं अन् खळ्यात उपनेरचं वारं !

जगण्याचा खरा आनंद हा बालपणीचाच. गावखेड्यातलं जगणं म्हणजे मुक्त छंदातील कविता! मोकाट भटकायचं.मनसोक्त पोहायचं. वाट्टेल तसं जगायचं.गावात जशी माळवदाची घर तशी रानात खळं-दळं, बोंदरी बारदाना आलाच. शिवळाट-जोते, चाढं-ओटी , इळे-खुर्पे, सुतळी दाभण, डांभमेखी. जगातील कोणत्याच शब्दकोशात न सापडणारी शब्दसंपदा. जवळची वाटणारी. ऊन्हाळ्यात रानं निपचित पडल्याली. दिवसभर उन्हाच्या झळायांचा आलेख खालीवर होणारा.खळं आणि जागली ठरलेल्या. आंब्याच्या कैर्या आणि […]

कुत्रा – एक वेगळा विषय

मला कुत्रा या प्राण्याची फार ओढ. मलाच कशाला, आमच्या घरातील सर्वांनाच कुत्रा प्रिय. तसे सर्वच प्राणी आम्हाला आवडतात, परंतू मुंबईसारख्या शहरात त्यातल्या त्यात कुत्रा पाळणं सोयीचं, म्हणून कुत्रा एवढंच. मांजरही तशी छान वाटते, पण तिचा आपल्या विषयी पुरेसा विश्वास पटेपर्यंत ती काही आपल्या वाऱ्याला उभी राहात नाही. आणि एकदा का ती आपली झाली, की तिचा स्वत:चा […]

1 2 3 46