विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

सीकेपी आणि सोडे – एक अतूट नातं

अहो हे सोडे म्हणजे काय नुसता खायचा पदार्थ वाटला काय तुम्हाला? की टाकली जाळी, काढला समुद्रातून, वाळवला, शिजवला, खाल्ला आणि झालं. अहो सोडे म्हणजे आमचा जीव की प्राण, आमची अस्मिता – आमची शान, आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक वगैरे वगैरे. या सोड्यांच्या गप्पांवरपण आम्ही तास दोन तास घालवू शकतो. दिवाळीत भेट म्हणून आलेल्या प्रशांत कॉर्नर च्या चमकदार मिठाईच्या बॉक्सकडे जसं प्रेमाने बघतो ना त्या पेक्षा जास्त प्रेमाने टेबलावर आणून ठेवलेल्या सोड्याच्या पिशवीकडे पाहतो आम्ही. […]

प्राजक्त

मातीकडून घेतलेल्या जीवनरसाचं देणं, सुगंधाच्या रूपात निसर्गाला परत करायचंय. उपकारांची परतफेड करायची आहे याची जाणीव आहे त्याला. कृतघ्न व्हायला…तो काही माणूस नाही नं. […]

संथ वाहते कृष्णामाई 

खळाळून वाहणारी कृष्णा नदी, तिच्या तीरावरील सुंदर दगडी घाट व रेखीव देवळं त्यात चितारली होती आणि त्या पेंटिंगच्या खाली १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका मराठी चित्रपटातील गीताच्या दोन ओळी लिहिल्या होत्या…….. […]

इंग्रजांनो, शतशः सलाम ! 

एका जर्मन कंपनीच्या कृषी विभागातर्फे आठ वर्षे कोकणात भटकंती करत असताना इंग्रजांच्या काळातील असा एकही पूल शिल्लक राहिला नाही जिथे थांबून पुलावर लावलेल्या दगडावरील (प्लेक्) माहिती मी वाचली नाही. ३४ वर्षांपूर्वी कोकण रेल्वे अस्तित्वात आली नसल्यामुळे रस्त्यांवरूनच प्रवास करावा लागत असे. मोबाईल अस्तित्वात आला नव्हता व चांगल्या कॅमेऱ्यांच्या किमती आवाक्याबाहेर असल्यामुळे फोटो काढणे शक्य नव्हते. पूल […]

तुलनेचे बळी

का वागतो आम्ही असे? या जगात दोन व्यक्तींची तुलना होऊ शकते? प्रत्येक व्यक्तीत एक पूर्णपणे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व लपलेलं असतं व त्याला किंवा तिला स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याची पूर्ण मुभा असायला हवी, असं तुम्हाला नाही वाटत? जोपर्यंत या जगातील दोन व्यक्तींच्या अंगठ्यांचे ठसे तंतोतंत जुळत नाहीत, तोपर्यंत दोघांमध्ये तुलना करण्याचा या पृथ्वीवर कोणालाही अधिकार नाही. अगदी जन्मदात्यांनाही! […]

वर्‍हाडाची तर्‍हाच न्यारी….

लग्नसोहळा हा सर्वांच्या आवडीचा विषय. नवरदेव, नवरी, करवले, सोकाण्या, करवल्या, वरमाई, वरबाप , वर्हाड, मांडव, बोहला, जानवसा, देवक,अक्षता, परण्या ,आहेर, वरात हे शब्द मध्यमवर्गाच्या लग्नकार्याची साक्ष देणारे. ग्रामजीवनात लग्नपायर्या ठरलेल्या असतात. हळद लावणे, तेल चढवणे, देवाचे दर्शन, मिरवणूक , मंगलाष्टके, आशिर्वाद, सप्तपदी, सूनमुख पाहणे, भोजन,  रंगनाथ दर्शन, नवरी वाटं लावणे, येतीजाती, सोळावा वगैरे. तसेच वाजंत्री, तोफ […]

1 2 3 99