हलकं फुलकं लेखन. यात विनोद वगैरे सगळं आलं

आपण

आधीच्या पिढीत जन्माला आलो आहोत.. आपल्याला विधात्याचे विशेष आशीर्वाद प्राप्त आहेत.. आपण कधी जीव खाऊन पळत शाळेतून क्लासेसना गेलो नाही. शाळा सुटल्यावर छान रमत गमत, खेळत घरी गेलो आहोत.. आपण आपल्या खर्‍या मित्रमैत्रिणींसोबत खेळलो, नेट फ्रेंड्स सोबत नाही.. तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणे आपल्यासाठी सेफ होते, आपण कधी बिसलेरी घेतली नाही.. आपण चार जणांत एकाच ग्लासातून […]

नांदत्या घराची किंमत

दोन दिवसापूर्वी मी एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात. त्या कार्यक्रमाचे फोटो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पेनड्राईव्ह मध्ये पाठवतो असे व्यवस्थापकांनी सांगितले. वाटलं ..कोणी ऑफिसबॉय येईल पेनड्राईव्ह घेऊन म्हणून मी दुसऱ्या दिवशी वाट बघत होते. 7.30 ला मोबाईल वरून फोन आला . जरा थकलेला ..पण मार्दवपूर्ण असा एका आजींचा आवाज […]

शून्य सावलीचा दिवस

पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्‍यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्‍यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्‍यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. […]

विख्यात चित्रकार राजा रवी वर्मा

राजा रवि वर्मा, (एप्रिल २९, इ.स. १८४८- ऑक्टोबर २, इ.स. १९०६) हे भारताच्या त्रावणकोरच्या राजघराण्यातील एक चित्रकार होते त्यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली. राज रविवर्म्याने काढलेल्या चित्रांनंतरच हिंदूंना आपले देव कसे दिसत असावॆत, ते समजले. भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि पुराणांतील कथा यांवर रविवर्म्यानॆ काढलेली चित्रे आजही प्रमाण मानली जातात. रवींचा जन्म […]

काही नवीन मोबाईल म्हणी—

मी अजूनही मोबाईल फोन वापरत नाही.मोबाईल या विषयावर आता उलटसुलट बोलण्यासारखे काही राहिलेले नाही. ती एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे यात वादच नाही. पण तरी मी अजूनही मोबाईल वापरीत नाही आणि त्यामुळे माझे फारसे काही अडतही नाही. पण माल याचे फायदे असे की प्रवासात एखादे पुस्तक वाचू शकतो. मित्र असला आणि त्याचा मोबाईल मध्येच नाही वाजला […]

संसारी लोणचे

संसारी लोणच्याच्या फोडी आधी करकरीत असतात, नंतर कुरकुरत का होईना हळूहळू मुरतात. हे लोणचं बाजारात मिळत नाही कुटुंबानं मिळून ते घालायचं असतं त्याशिवाय जगण्याला चव येत नाही… कडवट शब्दांची मेथी जरा जपूनच वापरावी स्वत:च्या हातांनी कशाला लोणच्याची चव घालवावी ? जीभेने तिखटपणा आवरला तर बराच फायदा होतो लोणच्याचा झणझणीतपणा त्यांन जरा कमी होतो. “मी” पणाची मोहरी […]

निर्भया…शॉर्ट फिल्म

  सीन नं – 1     वेळ – रात्रीची     ठिकाण – निर्जन रस्ता ( बॅकग्राऊंडला रातकीड्यांचा वैगरे आवाज येतोय ) एक तरुणी ( जॉब वरून आलेली ) रस्त्याने हातात मोबाईल घेऊन चालतेय. ती दोन चार पावले चालल्यानंतर तिचा मोबाईल वाचतो … ती तरुणीः- मोबाईलवर… हा ! आई बोल अगं ! आज ऑफीसमध्ये जरा जास्तच काम होत त्यात […]

झुकल्या पापण्या

नव्या घराचा पाया भरतांना, तो दिसला मला माझ्याकडे येतांना..! येताच म्हणाला, “मी वास्तुशास्त्र जाणतो..!” “कुठे बेड, कुठे हाॅल, कुठे किचन असावं सांगतो..!” “शास्त्र माझे सर्व काही सांगते, मी सांगेन तिथेच सुख नांदते..!” ऐकून त्याचा सारा कित्ता मी म्हणालो, “दोस्ता थोडं थांब अन्… मला तिथल्या सुखाचं गुपीत सांग..!” “जिथं दहा बाय दहाच्या खोलीत मोठा समूह रहातो..!” “जिथं […]

चाईल्ड सायकॉलॉजिस्ट बापानं मुलाला लिहिलेलं पत्र

हॉँगकॉँगच्या एका टीव्ही ब्रॉडकास्टर आणि चाईल्ड सायकॉलॉजिस्ट बापानं वयात येणा-या मुलाला लिहिलेलं पत्र त्याचा हा मराठी अनुवाद. नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचायला सांगा…..पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी कि ज्यावेळी जसा मूड असेल तसा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ समजून येईल. “माझ्या लाडक्या […]

पुरणपोळी आणि भैरवी

पुरणपोळी ही भैरवीसारखी आहे. किमानपक्षी सूर नीट लागले तरी भैरवी कमीअधिक रंगतेच. तसंच पुरण छान जमलं की पुरणपोळीची वैगुण्यं क्षम्य आहेत ! पुरणपोळीसाठी केलेले श्रम ही एक संपूर्ण मैफल आहे तर ती खाणे म्हणजे भैरवी आहे. रांधणे हा (जाणकारांसाठीच) आनंद आहे आणि भोजन हा परमानंदाचा कळस आहे. डाळ निवडून घेणे इ. भूप, किंवा बिलावल आहेत. जास्त […]

1 2 3 28