नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

नवरात्र स्पेशल

आजपासून देशभरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. मोठया प्रमाणात भाविक नऊ दिवस देवीचे व्रत व उपवास ठेवतात. व्रताच्या वेळी शरीराचं डिटॉक्सिफाय होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आपल्या शरीरातील सर्व विषारी द्रव्य बाहेर निघतील. पावसाळ्यात पित्त वाढतं, पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळं उपवासानं पित्त कमी होण्यास मदत होते आणि पचनक्रियाही सुधारते. जर आपण ९ दिवस व्रत/उपवास ठेवणार असाल […]

हर्निया

हर्निया हा सहज आढळणारा आजार आहे. तो सगळ्या वयोगटांमध्ये व स्त्री-पुरुष अशा दोन्हींतही दिसतो. हर्निया म्हणजे आपल्या पोटाचे स्नायू कमजोर होतात, पोटात काहीशी पोकळी निर्माण होते आणि पोटातील आतडी बाहेर येऊन फुगा निर्माण करतात. मोठे आतडे किंवा लहान आतडे हर्नियाच्या पिशवीत ओढ लागणे, फुगा दिसणे, फुगा कमी-जास्त होणे, पोट फुगणे यांसारखी लक्षणे दिसतात.ही लक्षणे हळूहळू किंवा […]

याला जीवन ऐसे नाव भाग ३१

शास्त्रकार स्पष्टपणे सांगत आहेत. अतियोगेन सलिलं तृष्यतोऽपि प्रयोजितम प्रयाति श्लेष्म पित्तत्वं ज्वरितस्य विशेषतः। वर्धति आमतृष्णानिद्रा तंद्रा ध्मानांग गौरवम कासाग्निसादह्रल्लासप्रसेक श्वास पीनसम् ।। तहान लागली असताना सुद्धा ती ओळखता यायला हवी, तहान लागल्यानंतर पाणी जरूर प्यावे, पण जर का यावेळी देखील पाणी जास्त प्यायले गेले तर कफ आणि पित्त प्रकुपित होतात, म्हणजे वाढतात. विशेषत्वाने ताप आला असताना […]

कोलेस्टेरॉलपासून सुटका

कोलेस्टेरॉलपासून सुटका करायची असेल तर जीवनशैलीत आरोग्यदायी बदल करणे आवश्यक आहेत. त्यामुळे हृदयरोगाला आमंत्रण देणारे अन्नपदार्थ ओळखता येतात आणि त्यांचे सेवन कमी करता येतं. कोलेस्टेरॉलच्या वाढलेल्या पातळीमुळे कोणत्याही शरीर प्रकारच्या व्यक्तीला हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो. कोलेस्टेरॉलला चांगलं मानलं जात नाही, कारण आपल्यापैकी बरेच जण या कोलेस्टेरॉलचे बळी ठरतात. हो, कोलेस्टेरॉलचं वाढतं प्रमाण म्हणजे आजारपणाला आमंत्रण देण्यासारखं […]

जागतिक हृदय दिन (२९ सप्टेंबर)

आजच्या दिवशी सर्वत्र जागतिक हृदय दिन साजरा करण्यात येतो. आज काल हृदयरोग होणे अथवा हृदयविकाराचा झटका येऊन अचानक मृत्यू होणे ही बाब एखादया विशिष्ट वयानंतर होऊ शकते असे राहिले नाही. विशी-तिशीतल्या उमद्या तरुणांचाही हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाल्याची उदाहरणे ऐकायला मिळतात. भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल ३२% मृत्यू हृदयरोगामुळे होतात. त्यामुळे असे दिवस साजरे करून हृदयरोगाविषयी […]

मज्जातंतूच्या शिरांचे विकार

सौम्य प्रमाणात मुंग्या येणे अथवा शरीराचा एखादा भाग बधिर होणे हा प्रकार वरचेवर घडत असेल, तर त्यामागचे कारण वेळीच शोधायला हवे. कदाचित मज्जारज्जूच्या शिरांना अपाय झाल्याने असे होऊ शकते. मज्जातंतू मज्जारज्जूतून बाहेर पडतात. थोड्याच अंतरावर त्यातील काही तंतू एकमेकांजवळ येतात व त्या गठ्ठ्याच्या शिरा बनतात. या शरीराच्या बाहेरच्या बाजूला असणाऱ्या भागात कार्य करतात, म्हणून त्यांना पेरिफरल […]

दरवर्षी करा रेटीना तपासणी

मधुमेहामुळे मोतीबिंदू, काचबिंदू हे आजार तर होऊ शकतातच; पण मुख्यत्वे मधुमेहामुळे रेटिनावरील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. डायबेटिक रेटिनोपॅथीसुद्धा एक प्रकारच्या जीनवर अवलंबून असते. डायबेटिक रेटिनोपॅथी फक्त डायबेटिस नीट कंट्रोल न झाल्याने होते असे नाही. तो किती दिवसांपासून आहे यावरही रेटिनोपॅथी अवलंबून असते. असेही पाहण्यात आले आहे की, रेटिनोपॅथीसुद्धा एक प्रकारच्या जीनवर अवलंबून असते. त्यामुळे डायबेटिक रुग्णाने दरवर्षी […]

शरीराचा आकार आणि आहार

काही लोकांच्या शरीरामध्ये कमरेच्या वरच्या भागात तर काही लोकांच्या कमरेच्या खालच्या भागात अधिक चरबी असते. तसेच काही लोकांमध्ये लवकर चरबी वाढत नाही. तज्ज्ञांच्या मते, माणसाचे शरीर एकसारखे नसते, त्यामुळे असे होते. प्रत्येकाच्या शरीराचा आकार वेगळा असतो. त्यामुळे भोजन पद्धतीही त्यानुसारच असायला पाहिजे. सर्वांच्या शरीरातील वेगवेगळ्या भागांत चरबी वाढत असते. त्यामुळे ती नियंत्रित करण्यासाठी शरीराच्या गरजाही वेगवेगळ्या […]

‘वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’

‘वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’ हे शब्द आयुर्वेदाच्या संदर्भात नेहमी ऐकलेले असतात. वात, पित्त आणि कफ हे तीन ‘दोष’ समजले जातात. दोषाधिक्यानं बनलेल्या ‘प्रकृती’ला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. जन्माला येतानाच आपण ज्या प्रकारची प्रकृती घेऊन येतो, ती आयुष्यभर बदलत नाही. माणसाची शरीरयष्टी, शारीरिक गुण, स्वभाव, आवडीनिवडी हे सगळं प्रकृतीवर अवलंबून असतं, असं आयुर्वेद मानतो. अर्थात तुमची प्रकृती […]

अल्झायमर जागरुकता दिन (२१ सप्टेंबर)

२१ सप्टेंबर रोजी जागतिक अल्झायमर जागरुकता दिन म्हणून साजरा केला जातो . अल्झायमर म्हणजे माणसाला दुर्बल करणारा वार्धक्यातील विस्मृतीचा रोग. या रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहीशी होते. तो स्वत्व हरवतो, कार्यकारणाचा अभाव होतो व स्वत:कडे लक्ष द्यायला असमर्थ होतो. १९०७ मध्ये अ‍ॅलॉइस अल्झायमर यांनी हा रोग शोधून काढला. चोर पावलांनी येणारा हा स्मृतिभ्रंश वाढत्या वयानुसार […]

1 106 107 108 109 110 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..