नवीन लेखन...

मराठीसृष्टीवरील या विभागात आपण करणार आहोत चर्चा विविध विषयांवर. रोजच्या व्यवहारातील वेगवेगळे प्रश्न आणि त्यावरील आपली मतं रोखठोकपणे मांडण्यासाठीचं हे मुक्त व्यासपीठ. लिखाणाचे नियम अर्थातच मराठीसृष्टीचे नेहमीचे….

कुछ तो लोग कहेंगे..!

“लोकं घोड्यावर बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाहीत..” हा अनुभव सार्वजनिक आहे. तरीही ‘लोक काय म्हणतील ?’ याचाच विचार कोणताही निर्णय घेतांना केला जातो. आपल्या प्रत्येक कृतीवर, अगदी सार्वजनिक जीवनापासून ते वयक्तिक आयुष्यापर्यंत, राहणीमानापासून ते खाण्यापिण्यापर्यंत कुठलीही आवड – निवड ठरवितांना या तथाकथित ‘लोकां’चा विचार आपण करतो. […]

व्हॅलेन्टाइन डे : दिवस प्रेमाचा

‘प्रेम’ या शब्दातच प्रचंड सामर्थ्य आहे.. त्याचा हेतू हि फार उदात्तह.. प्रेमाची व्याख्या करून त्याला शब्दात सामविणे जवळजवळ अशक्यच, एव्हढी त्याची व्याप्ती आहे. प्रेम केवळ जोडीदारांमध्ये असते असे नाही तर समाजाच्या, कुटुंबाच्या प्रत्येक घटकावर आपल्याला प्रेम करता येते… ते कुठेही आणि कसही करता येत. प्रेमभावना काय असते याचे सुरेख वर्णन मंगेश पाडगावकरांनी केलं आहे. […]

‘खुलासा’ गोंधळ आणि गैरसमज वाढवणार्‍या गोष्टींचा

पुर्वीची काठी घेऊन साप मारण्याची “पोज” आणि आजची “स्टीक” घेऊन सेल्फी काढण्याची पोज, दोघही सारख्याच वाटतात… फक्त सापाची जागा आपल्या मुखचंद्राने घेतलीये… पुर्णविरामांनी संपणारी आमची वाक्य् आता प्रश्नार्थक चिन्हांनी संपायला लागलीयेत, आयुष्यात पुढे सरकताना विराम कमी होत् असावेत् अन् प्रश्न वाढत् असावेत्… […]

भ्रष्ट नगरसेवक पद पद नष्ट करा !!

मुळात ‘नगरसेवक’ व त्यांच्या ‘ निवडणुका ‘ हा एक ह्या काळातील भ्रष्टचाराचा एक मूळ उगम आहे व त्या आता रद्दबदल करूनच हा भ्रष्ट राजमार्ग कायमचा बंद करणे हीच ह्या काळाची गरज आहे. एक सांगा ह्या ऑनलाईन च्या काळात आपल्या  नगरीत  हा  नगरसेवक हवाच कशाला ? जर सगळ्या महापालिका वॉर्ड कार्यालयांनी आपल सगळा कारभार पारदर्शक ठेवून आपली सगळी टेंडर्स, प्रोजेक्ट्स माहिती […]

अफवाना वाव देऊ नका..

नुकतीच नागोठणे येथील एक पोस्ट सोशल मिडियावर फिरतेय. अजगराने मुलीला गिळले..  अशा शिर्षकाने….. सोशल मीडियाचा गैरवापर म्हणतो तो हाच. कुठलीही माहिती कुठेही जोडायची आणि वायरल करायची. रेटिक्युलेट पायथन (जाळिदार अजगर) हा अंदमान निकोबार बेटावर आढ़ळतो .त्याची लांबी 32 फुट एवढी नोंदली आहे. एवढा मोठा अजगर माणसाला इजा पोहचवु शकतो ,पण अजून तरी तशी नोंद भारतात नाही. सध्या वायरल होत असलेली पोस्ट व […]

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने

ख्रिस्ती वर्चस्व वाढण्याच्या काळात हीदन आणि पेगन (मूर्तिपूजक आणि निसर्गपूजक) लोकांना हालहाल करून ठार करण्यात आले वा बाटविण्यात आले. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात रोमन साम्राज्यात ख्रिस्ती वर्चस्व वाढू लागले. त्या काळात क्लॉडियस दुसरा हा राजा होता. रोमन साम्राज्यात गृहयुद्धे व बाहेरील आक्रमणे चालू होती. नित्य युद्धमान असलेल्या त्या देशाला तरुणांची सैन्यात भरती होण्याची आवश्यकता वाटू लागली. […]

हरलाय महाराष्ट्र… आणि हरलाय मराठी माणूस…

कोणी म्हणतोय भाजप जिंकला, कोणी म्हणतोय शिवसेना हरली, कोणी म्हणतोय राष्ट्रवादी पुढे तर, कोणी म्हणतोय कॉंग्रस मागे, कोणी म्हणतोय मनसेची वाट लावली… पण लक्षात ठेवा इथे फक्त  “जिंकलाय” आणि पुढे गेलाय तो… गुजराथी, मारवाडी, भैया, मद्रासी, सिंधी, पंजाबी, आणि हरलाय आणि तो फक्त माझा “महाराष्ट्र”… आणि माझ्या महाराष्ट्रातील “मराठी माणूस”… आपण कोणत्याही पक्षाचे असाल आपल्याला हे मान्य करावंच लागेल … महाराष्ट्रात राहून जर […]

नवीन घर घेणार्‍यांनो.. सावधान

नवीन घर घेणाऱ्यांनो सावधान !!! सर्व मराठी मध्यमवर्गीयांसाठी  महत्त्वाचा सल्ला इलेक्शनच्या तोंडावर अनेक  राजकीय नेत्यांनी या बिल्डर-डेव्हलपरकडे ठेवलेले पैसे परत मागायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक बिल्डर-डेव्हलपर्सच्या पायाखालची माती सरकली आहे. कारण त्यांनी विकसित केलेल्या अनेक गृहसंकुलांमध्ये गिऱ्हाईकच नाही. कोटींच्या घरातले फ्लॅट इथेकुणाला परवडणार आहेत? पण राजकारण्यांना इलेक्शनसाठी त्यांचं काळं धन  परत करण्याशिवाय गत्यंतर नाही, त्यामुळे बिल्डर-डेव्हलपरला जागांचे भाव खाली […]

सध्याच्या मालिका आणि वास्तव

सध्या टेलिव्हिजनवर वेगवेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून ज्या मालिका दाखविल्या जातात त्या पाहून खरोखरंच प्रेक्षकांनी त्यातून काही बोध घ्यावां अशा असतात का ? हा प्रश्नांच उत्तर काय द्याव ? हा प्रश्न या मालिका पाहणार्याअ सर्वांनाच व्यतीत करतो कारण आज बहूसंख्य प्रेक्षक फक्त टाईमपास म्ह्णून या मालिका पाहत असतात. पूर्वीचे प्रेक्षक जेवढ्या आवडीने उत्सूकतेने रामायण महाभारत पाहत होते तितक्या […]

टी व्ही बंद

आजच एक बातमी वाचली नांदेड जिल्हा परिषदेने उपक्रम सुरु केला आहे रात्री ७ ते ९ या वेळात टी व्ही बंद ठेवायचा. त्या साठी झेड पी च्या शाळेत शिकणारी मुले प्रत्येक घरी जाऊन हात जोडणार आहेत. या सिरियल्सनी मुलांच्या आभ्यासावर परिणाम होत आहे म्हणून हि शक्क्ल लढवण्यात आले आहे. सिरियल्सची दुखणी उपचाराच्या बाहेर गेल्यावर हा डोस झेड […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..