नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

तेथे कर माझे जुळती…….

वळवाचे पाऊस सुरू झाले,पहिल्या पेरण्या झाल्या की वारक-यांना वेध लागतात पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीचे. मनामनात गजर सुरू होतो “ विठ्ठल विठ्ठल , जय जय पांडुरंग हरी…” वेध लागतात पंढरपूरच्या वारीचे. मी अगदी लहानपणापासून ज्ञानोबांच्या पालखीचे दर्शन, वारीला जाण्याची गडबड बघत व अनुभवत आलेली आहे. पण ते सर्व पुण्यासारख्या शहरी वातावरणात आलेल्या वारीची. प्रत्यक्ष वारक-यांशी बोलणे किंवा त्यांची […]

महालय (पितृपक्ष) संकल्पना – परिचय

(श्राद्ध हा हिंदू धर्मशास्त्रातील एक जटील आणि गहन असा विषय आहे. या विधीचा साकल्याने विचार एका छोट्या लेखात करणे शक्य नाही. त्यामुळे प्रातिनिधीक रूपात विषयाचा परिचय करून देण्याचा हा अल्प प्रयत्न.) हिंदू धर्म संस्कृतीमधील एक महत्वाची संकल्पना म्हणजे धार्मिक आचार. नामकरण, मुंज, विवाह अशा विधींच्या जोडीनेच हिंदू जीवनप्रणालीत श्राद्धविधीचे महत्व विशेषत्वाने आहे. श्रद्धेने केले जाते ते […]

हर मर्ज की दवा…. ज़िंदा तिलिस्मा… 

जिंदा तिलिस्मात … खरं तर बोली भाषेत जिंदा तलिस्मा… living magic …. जादुई औषध .. एकही कृत्रिम रसायन न वापरता केलेलं … सगळ्या गोष्टी नैसर्गिक … वनौषधी वापरून केलेल्या … म्हणूनच बहुतेक इथल्या उर्दू-हिंदी बोली भाषेत … हर मर्ज की दवा … इतका हैदराबादच्या जनमनाचा त्यावर विश्वास आहे (जसा आपल्याकडे अमृतांजन … कैलास जीवन यावर असतो तसा). पुढच्या वर्षी बरोबर १०० वर्ष होतील, या युनानी औषधाला. हकिम मोहम्मद मोईझुद्दीन फारुकी यांनी हे जादुई औषध १९२० साली निर्माण केलं आणि त्याचा प्रभाव … करिष्मा थोडा थोडका नाही तर शंभर वर्ष लोकमनावर आहे. […]

वास्तुकलेचा जनक ग्रीस

जुन्या काळच्या पौर्वात्य आशियाई आणि पाश्चिमात्य युरोपीय जगाच्या मध्यावर ग्रीस हा देश येतो. या भौगोलिक स्थानामुळेत्याला अनन्यसाधारण व्यापारी महत्त्व होते. ग्रीसने जगात अनेक अनमोल देणग्या दिल्या त्यापैकी एक म्हणजे वास्तुकला. प्राचीन ग्रीक संस्कृतीचा रसायनात रुजून आजची पाश्चिमात्य संस्कृती घडली. […]

राष्ट्रीय कॅलेंडरचा वापर

राष्ट्रीय कॅलेंडरची तारीख दररोज आकाशवाणी व दूरदर्शनवर प्रसारण सुरु होताना सांगितली जाते. प्रमुख वर्तमानपत्रांमध्येही आतल्या पानावर रोजचे पंचांग दिलेले असते. तिथेही भारतीय राष्ट्रीय सौर तारीख दिलेली असते. रिझर्व्ह बॅंकेच्या कॅलेंडरमध्येही या तारखांचा उल्लेख असतो. राष्ट्रीय सौर कॅलेंडरही काही संस्था प्रकाशित करु लागल्या आहेत. आपणही सौर कॅलेंडरचा वापर करु या. सुरुवात स्वतःपासून करु. […]

मानसोल्लास ग्रंथातील पाकशास्र

भूलोकमल्ल आणि सत्याश्रयकुलतिलक  अशी बिरूदे असणारा राजा सोमेश्वर याचा ‘मानसोल्लास’ अर्थात ‘अभिलषितार्थचिन्तामणि’ हा ग्रंथ. (शतक १२ वे). हा ग्रंथ म्हणजे एक ज्ञानकोशच आहे. राजा सोमेश्वर हा चालुक्य कुलातील राजा असून त्याने स्वत: या ग्रंथाला ‘जगदाचार्यपुस्तक’ असे नाव दिली आहे. राजाचा आहार असा या मांडणीचा विषय असला तरी तत्कालीन पाककृतींचा परिचय त्याद्वारे करून देणे असा या लेखाचा प्रमुख उद्देश आहे. आधुनिक काळात पाकशास्त्र विषयाचे प्रशिक्षण महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थाना उपलब्ध आहे. परंतु १२ व्या शतकात सोमेश्वर राजाने सांगितलेले अन्नाविषयीचे तपशील आजच्या काळातही उपयुक्त आहेत. […]

आकाश कंदील तेजाचा दूत

दिवाळी या शब्दातच दिव्याचे महत्व अधोरेखित होते. ज्यावेळी विद्युत पुरवठा उपलब्ध झालेला नव्हता अशा काळात आकाशकंदीलाचे महत्व विशेष होतेच. […]

पंप रामायण

उत्तर भारतातील घराघरात तुलसी रामायणाचे वाचन होते, ते सार्वजनीन आहे. परंतु पंप रामायणाचा परिचय समाजाला न झाल्याने ते लोकाभिमुख न होता केवळ साहित्य वर्तुळातच  प्रसिद्ध पावले. या रामायणाचा कर्ता नागचंद्र  याचा काळ इ.स. १०७५ ते ११०० असावा असे मानले जाते. चालुक्य व होयसळ राजांनी नागचंद्राचा सन्मान केला असे मानले जाते. नागचंद्र जैन परंपरेचे उपासक  व गुरुभक्त असून जैन परंपरेविषयी निष्ठा व भक्ती त्यांच्या साहित्यातून दिसून येते. […]

संकासुर.. प्रवास एका असुराचा… देवत्वाकडे

एका असुराने ज्ञानाचं भांडार सामान्य जनांसाठी खुलं केलं म्हणून त्याचा वध झाला. वध होण्यापूर्वी तो हे ज्ञानाचं संचित घेऊन समुद्रातील एका शंखात लपला. देवांच्या विनंतीवरून विष्णूने माशाचा अवतार घेतला आणि समुद्रात जाऊन शंखात लपलेल्या या असुराचा वध केला….. शंखात लपलेला म्हणून शंखासुर…. संकासूर. डोक्यावर शंकूच्या आकाराची टोपी घालतो म्हणूनही शंकासूर. […]

1 25 26 27 28 29 70
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..