नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

जुन्या गोष्टींमधले नवे आणि नव्यातले काही जुने

चाळीस पन्नास वर्षांपूर्वी कोकणातल्या आमच्या गावाकडच्या खेड्यात असलेली जीवन -पद्धती आरोग्याच्या हितासाठी किती योग्य होती ही दृष्टी थोडी उशिरा म्हणजे आज मोठे झाल्यावर, जग पाहिल्यावर, शिकले सावरल्यावर मिळाली. सगळंच जुनं वाईट नसतं आणि टाकून देण्यासारखे नसते ही जाणीव जुन्या आठवणी कुरतडत राहाते आणि काहीतरी हरवल्याच्या भावनेने जीव कासावीस होत राहातो. […]

जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ५

माते, तुला किती जण शरण येतात याला मर्यादाच नाही, याचे उघड कारण म्हणजे (प्रत्येकाला तू त्याचे) वांछित देतेस. उलटपक्षी, मी (तुला) शपथपूर्वक सांगतो की, माझ्या मनात मात्र तुझ्याबद्दल स्वभावतःच निस्सीम प्रेम साठलेले आहे. […]

त्रिमोतींची ओटी

एक विनंती आहे सखी, पूर्वजांची पुण्याई स्मरून, सुवासिनींची ओटी भरताना आठवणीने त्या मध्ये संस्कारांचे डोरले विणायला, मातृत्वाचा मळवट भरायला आणि मर्यादांचे पैंजण घालायला विसरू नको.स्त्रीनेच स्त्रित्वाची ओळख जपली पहिजे हाच शृंगार शोभेल हो तिजवर. […]

लग्नांचं ‘seasoning’

लग्नांचा season सुरू आहे. त्यामुळे साहजिकच डोक्यात लग्नाळू विषय सुरू राहातात. कुणा कुणाची लग्नं attend करता करता आसपासची next in-que मुलं-मुली आणि त्यांच्यावर focussed सर्वांच्या वधू-वर-सूचक नजरा पाहाताना हसूही येतं, आणि धास्तीही वाटू लागते. उपवर माणूस दिसलं, की करा match the pair, आणि चढवा बोहल्यावर! काय तर ही घाई! आणि ती सुद्धा त्यांचीच जास्त, ज्यांचा ह्यांच्याशी मुळ्ळी संबंध नसतो! […]

मराठी भाषेचा अभिमान बाळगायलाच हवा !

कधीकाळी प्रथम क्रमांकावर असलेली आपली मायभाषा मराठी आपल्याच काही मूर्ख लोकांमुळे किंवा त्यांच्या मुर्खपणामुळे मागे पडली. ज्या भाषेत सर्वात जास्त साहित्यप्रकार आहेत, ज्या भाषेला सर्वात जुना इतिहास आहे, ज्या भाषेत १३० पेक्षा अधिक कलाप्रकार आहेत आणि ज्या भाषेला संतांचे बोल आहेत अशा आपल्या मराठी भाषेचा आपण अभिमान हा बाळगायलाच हवा . […]

जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ४

लाळघोटेपणाचे पालन (किंवा हलकीसलकी कामे करण्याची रीत), सततचा खोटारडेपणा, सदैव वितंडवादाची सवय, इतरांबद्दल नित्य वाईट विचार, अशा माझ्या गुणसमुच्चयाची ख्याती ऐकून ऐकून तू सोडून दुसरे कोणी क्षणभर तरी माझे तोंड पाहील काय? […]

जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ३

हे माते, तुझा उगम रमापति श्रीविष्णूच्या चरणकमलाच्या शुभ्र नखापासून (झाला आहे), तर तुझी वस्ती मदनाचा विरोधक असलेल्या (शंकराच्या मस्तकावरील) जटांच्या बंधनात आहे. मग (असे असूनही) ही तुझी दीन पातकी लोकांची मुक्तता करण्याच्या कार्याची तळमळ जगात सदैव का जागृत रहाणार नाही? […]

हंपी : एक आकलन !

फितुरीने घात केला विजयनगर चा , आणि आपल्या संस्कृतीचा सुद्धा ! तो कदाचित सहज म्हणून बोलून गेला असावा , पण भारताची शेकडो वर्षांची दुर्दशा व्यक्त झाली होती. मित्रानो , केव्हा तरी जा हंपी पहायला . पर्यटन म्हणून नव्हे , तर फितुरीचे परिणाम काय होतात ते पहायला जा आणि पुढच्या पिढीला सावध करा . […]

जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग २

भाग २ – गंगेची स्तुती व माहात्म्य अनेक कवी, विचारवंत, लेखक यांच्या कलाकृतीचा केंद्रबिंदू राहिलेले आहेत. या सर्व रचनांमध्ये जगन्नाथ पंडिताने रचलेले गंगालहरी हे आधुनिक संस्कृत काव्यांमधील  मुकुटमणीच म्हटले पाहिजे. गंगेच्या स्तवनपर हे काव्य अत्यंत रसाळ, पदलालित्यपूर्ण व भावपूर्ण आहे. […]

रूढी, परंपरा आणि तिचं सौभाग्य

एक विधुर म्हणून पुरुष कोणती ओळख घेऊन फिरतो सांगा तुम्हीच? त्याची बायको अल्पकाळी जाते म्हणून आपण त्याला अशुभ ठरवतो का? पण स्त्रियांच्याच बाबतीत हे सगळं का? इतर वेळी आपण बोलतो जन्माला येतानाच मृत्यूही घेऊन आलेला असतो माणूस मग अश्याच वेळी ते सगळं कुठे जात, का स्त्रीला कारणीभूत ठरवलं जात कोणाच्या मृत्यूसाठीपण? […]

1 18 19 20 21 22 70
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..