नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

सौभाग्यलेणं – हळदीकुंकू

सौभाग्यलेणं यामध्ये सर्व प्रथम पहिला मान किंवा महत्व “हळदी कुंकू” यांस आहे. कुंकुमतिलकाचा अलंकार अगदी लहानपणापासूनच लाभतो. कुंकू हे सौभाग्याचे प्रतिक तर हळद मांगल्याचे प्रतीक मानले जाते. […]

मराठी राजभाषा दिवस – संकल्प

कविवर्य  कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतात. हा दिवस होऊ लागला त्याला आता बरीच वर्षे झाली. आपण वर्षांतून एकदा मराठी भाषा दिवस साजरा करून जगाला हे सांगतो की, ‘मराठीचा आम्हाला विसर पडला आहे, भाषा दिवस साजरा करणे, केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे या प्रतीकात्मक असल्या तरी आमच्या आवाक्यातील ज्या गोष्टी आहेत. […]

श्रीराम – सामाजिक समरसता

संपूर्ण जगात सर्व गुण संपन्न,सर्व श्रेष्ठ पुरुष श्रीरामचंद्र होऊन गेलेतं. रामांनी आपल्या सद्विचार, सद्वर्तन, सदाचार, सद्- व्यवहाराने पूज्य स्थान प्राप्त केले आहे. राम उत्तम पुत्र, उत्तम बंधू, उत्तम मित्र, उत्तम राजा, उत्तम पति, मातृभक्त, पितृभक्त, कर्तव्यकठोर, सत्यप्रतिज्ञ पुरुष होते. एक बाणी, एक वाणी, एकवचनी, एक पत्नी व्रताचे रामांनी आजीवन पालन केले. आदिकवी वाल्मिकींनी राम जसा थोर, आदर्श आहे लिहिले तसाच तो एक मानवही आहे. […]

मुहूर्त आणि व्य‌वहारातील वस्तुस्थिती

काहीं नविन करायचे असलें किं मुहूर्त काढला जातो त्यात काहीं वावगें नाहीं ज्याचा त्याचा श्रध्देचा विषय आहें. अगदी लहानपणी मनात कोरली गेलेली घटना म्हणजे, आमच्या घरासमोर एका मिठाई दुकानाचा धुमधडाक्यात शुभारंभ झाला होता. पण नंतर काहीं वेळात दुकानाला काहीं कारणाने आग लागली. नशिबाचा भाग असा किं जीवीत हानी काहीं झाली नाही. योगा योगाचा भाग असा किं […]

शिवाष्टकम् स्तोत्र

भगवान शंकराच्या स्तुतीसाठी अनेक अष्टकांची रचना झाली आहे. शिवाष्टक, लिंगाष्टक, रुद्राष्टक, बिल्वाष्टक अशा नावांनी ती प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये शिवाष्टकाला विशेष महत्त्व आहे. शिवाष्टकांची संख्याही कमी नाही. श्रीमद् शंकराचार्यांनी शंकराच्या स्तुतीपर हे भावपूर्ण रसाळ स्तोत्र भुजंगप्रयात (गण- यययय) वृत्तात रचले आहे. शिवाच्या प्रिय शिवाष्टकम् स्तोत्राचे पठण आणि श्रवण केल्याने माणसाची प्रत्येक वाईट परिस्थितीतून लवकर सुटका होते. शिवाची ही स्तुती श्रावण महिन्यात केल्याने दुर्भागी व्यक्तीलाही भाग्यवान बनवते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. […]

माघी गणेश जयंती

गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस ! […]

द्रौपदीची साडी

महाभारत पाहणं हा लहानपणी हृद्य सोहळा असायचा… त्या वेळेत भूक लागली म्हणायची बिशाद नव्हती… आजी लोक सॉलिड बडवत. रस्त्यांवर शुकशुकाट सगळे tv समोर …साधारण अर्धा तास आधी प्रक्रिया सुरू व्हायची. घरावर भले मोठे अँटीना नावाचे विमानसदृश्य उपकरण असायचे….काका /दादा पैकी कुणाला तरी वर चढवून ते adjust करावे […]

आम्ही सारे खवय्ये

विदर्भ स्पेशल पुडाची वडी/सांबार वडी पुण्यात कुठे मिळेल ” अशी चौकशी कोणीतरी करत होतं आणि माझ्या लक्षात आलं अरेच्चा, आपण तर या सिझनमध्ये एकदाच करून खाल्लीये सांभार वडी..आहाहा अगदी नाव काढलं तरीसुद्धा तोंडाला पाणी सुटतंय.. वरचं खरपूस आवरण, आत हिरव्यागार कोथिंबिरीचं गच्च भरलेलं सारण..व्वा! […]

चहा पुराण……

आमच्या जवळ एक हॅाटेल झाले आहे तिथे जाहिरात केली आहे ….”आस्वाद घ्या….१०१ प्रकारचे चहा…” असे काय प्रकार असतील हो?…..मला उत्सुकता आहे […]

1 2 3 4 70
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..