मराठी संस्कृती विषयक लेख

कोकणातील ‘गावपळण’ ! भाग २

कोकणातील अनेक गावांमध्‍ये शेकडो वर्षांपासून चालत आलेली ‘गावपळणा’ची किंवा ‘देवपळणा’ची परंपरा आजही श्रद्धेने व आनंदी वातावरणात पाळली जाते. त्यामागे गावाचे सौख्य टिकवणे आणि गावक-यांनी गुण्यागोविंदाने एकत्र राहावे हा हेतू असावा. […]

सिंधुदुर्गातले सुपुत्र – “बाबी कलिंगण”

दळणवळणाची अपुरी साधने आणि शेतीवर पोट असलेल्या या कलावंतांने अखेरपर्यंत कलेची कास सोडली नाही. काही वर्षांपूर्वीच पडद्याआड गेलेले बाबी नालंग आणि बाबी कलिंगण हे दोन दशावतारी कलेचे शिलेदार होते. “श्री. बाबी कलिंगण यांना राज्यस्तरीय लोककला पुरस्काराने गौरविण्यात आले होते “.सिंधुदूर्गात दशावतारी म्हणजे ” रात्री राजा आणि सकाळी कपाळावर बोजा ” अशी स्थिती एके काळी होती. त्या वेळपासून लोककलेची सेवा हाच परमधर्म असे समजून हा कलाकार राबला त्याची शासनाने दखल घेतली हे बरं झालं. […]

कोकणातील ‘गावपळण !’ भाग १

धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरांचा अमूल्य ठेवा गावांनी जपलाय. बर्‍याचदा रूढी आणि परंपरांमुळे गावांचे महत्त्व कमी झाल्याची टीका होते, पण या रूढी आणि परंपरांच्या पाठीमागे असलेल्या चांगल्या कल्पना, वागणूक, संस्कृती या महत्त्वाच्या बाबी विसरता येत नाहीत. गावाला शांतता लाभावी, सुख-समाधान लाभावे ही गावकर्‍यांची इच्छा त्यांच्या कृतीतून जेव्हा स्पष्ट होते तेव्हाच त्यांच्या परंपरांना एक वेगळा साज चढतो. अशीच एक धार्मिक परंपरा म्हणजे ‘गावपळण..!’ […]

इनामदार “श्री देवी भगवती संस्थान कोटकामते”

इतिहास काळात कोटकामते गावात सिद्धीचे राज्य होते. त्यावेळी कान्होजी आंग्रे यांनी मोठ्या शौर्याने वचक ठेवला होता. म्हणूनच सिद्धीचे राज्य असतानाही कोटकामते गावावर आंग्रेंची सत्ता होती. एका आख्यायिके नुसार कामते गावातील भगवती देवीस कान्होजी आंग्रे यांनी नवस केला होता, ‘‘जर मी लढाईत विजयी झालो तर, तुझे भव्य देऊळ बांधीन व देवस्थानाला गाव इनाम म्हणून देईन’’ त्याप्रमाणे युध्द जिंकल्यावर कांन्होजींनी भगवती देवीचे भव्य मंदिर बांधले. या घटनेची साक्ष देणारा शिलालेख आजही मंदिरात पाहता येतो. […]

‘समर्थवाणी’

॥ जय श्रीराम ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ जनी सर्व सुखी असा कोण आहे । विचारे मना तूचि शोधूनी पाहे । मना तांची रे पूर्वसंचीत केले । तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ॥ मना मानसी दु:ख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे । विवेके देहेबुद्धी सोडूनी द्यावी । विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी […]

हिन्दू : संस्कृती की धर्म?

हिन्दू संस्कृती ‘धर्म’ म्हणून ओळखली जाण्याच्या टप्प्यावर, स्वत:ला हिन्दू म्हणवणाऱ्या प्रत्येकाने या लेखात उपस्थित केलेल्या मुद्दयांचा गांभिर्याने विचार करायला हवा असं मला वाटतं. मला याबातीत आपण विचारपूर्वक दिलेली उत्तरं जाणून घेण्यात मला रुची आहे, नव्हे आपण हिन्दूंच्या सांस्कृतिक समृद्धीसाठी तसं होणं आवश्यक आहे, असंही मला वाटतं. […]

‘रूजवा आणि माजवा’ हे जाती-जातीचे सूत्र असते !

शिक्षणाने जात जाईल असं म्हटलं जात होतं, पण आजच्या २१ साव्या शतकात भारतातलं हे चित्र अतिशय निराशाजनक आहे. माणसं जस जशी शिकतायत, परदेशात जाऊन जग पाहून, अनुभवून येतायत, तस तशी माणसं अधिकाधिक जाती केंद्रीत होतायत, असं माझं निरिक्षण आहे. […]

मृत्यूनंतरचे जीवन !!

मी उत्सुकतेपोटी या विषयावरचे बरेच काही वाचले आहे. काही ज्येष्ठ माहितगारांकडून माहितीही घेतली आहे. अगदी रुपरेषेच्या स्वरूपात थोडे लिहितो आहे. हिंदू धर्मातील मृत्यूनंतरचे जीवन आणि मोक्षाची संकल्पना अन्य कुठल्याही संस्कृतीत इतकी परिपूर्णपणे मांडलेली नाही. यासाठी फक्त हिंदू धर्मामध्येच प्रचलित असलेल्या पुनर्जन्म, कर्म सिद्धांत, पंचमहाभूतांनी बनलेला मनुष्य देह, यासारख्या गोष्टी मान्य केल्याशिवाय पुढची सर्व वाटचाल ही अगम्यच […]

‘ती’ अजूनही आहे …. !!

आजकाल बाळं जेंव्हा ढुंगणाशी बांधलेल्या टोपली सकट जेंव्हा बसतात तेंव्हा त्या बिचार्‍यांना नीट बसताही येत नाही …त्या बाळाला अगदी नैसर्गीकपणे धावतांना पाहिले आणि माझे कुतूहल जागे झाले त्याची आई बाजूला कुठे दिसते का ते पाहू लागलो आणि लक्षात यायला वेळ लागला नाही .. एक साधारणपणे तिशीतील तरुणी त्या बाळाकडे लक्ष ठेऊन होती … त्या आईला मी मुलाच्या नैसर्गिक धावण्याबद्दल आणि बसण्याबद्दल कॉम्प्लिमेंट्स दिल्या … […]

सूर्यनमस्काराची  निर्मिती

माणसाने परमेश्वराला प्रथम पाहिले ते सूर्याच्या रूपात. माणसांत आणि एकंदर सजीव सृष्टीत जे चैतन्य आहे ते सूर्यापासून आले आहे असे मानले जाते. परंतु या चैतन्यातून एकापेक्षा एक असे पराक्रम साकार करायचे असतील, तर सूर्योपासनेचे विशिष्ट असे शास्त्र तयार करायला हवे असे भारतातील ऋषींना वाटले. आणि त्यांनी केलेल्या चिंतनातून सूर्यनमस्कार जन्माला आले. यामुळे सूर्योपासना आणि सूर्यनमस्काराचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व अनन्यसाधारण आहे. […]

1 2 3 30