नवीन लेखन...

रूटीन व्हेरिफिकेशनपासून सावधान

Be Alert about Routine Verification Calls

” Everybody must be alert of Fake Phone Calls”

पनवेल फ्लायओव्हरवर काम करीत असतांना २०१२ ला मी कामोठे, नवी मुंबई येथे रेडी पझेशन घर बुक केलं. त्यासाठी आयडीबीआय बँकेतुन लोन घेतलं होतं आणि त्यासाठी नेरूळच्या शाखेत खातं ऊघडलं होतं.लोनचा हप्ता मोठा होता आणि तो चुकू नये म्हणून मी माझ्या खात्यात पाच सहा हप्त्यांची तरतूद करून ठेवली होती.रक्कम मोठी होती. एप्रिलमध्ये मी ईकडे रहायला आलो.

जूनमध्ये फ्लायओव्हरचं ऊद्घाटन झालं आणि माझी बदली वडाळ्याला ईस्टर्न फ्री वे वर झाली.
सप्टेंबरमधल्या एके दिवशी आॅफिसमध्ये बसलो होतो. दुपारची वेळ असेल आणि मला एक फोन आला.
“क्या मेरी बात सारंगजीसे हो रही है?”
“हां जी बोलिये, आप कौन?”
“सर, आयडीबीआय बँकसे एक्झिकेटीव्ह रिंकु बर्मन बोल रहा हूँ|”
“बोलिये”
“सर, आपका हमारी नेरूल ब्रँचमे अकांउंट है, उस सिलसिले में रूटीन व्हेरिफिकेशन करना है|”

असं म्हणुन त्याने माझा अकांउंट नंबर ,जन्मतारीख, पत्ता, फोन नंबर, नॅामिनीचंं नांव सर्व गोष्टी सांगितल्या. त्यानंतर माझ्या अकांउंट मधला बॅलन्स, मागचे चारपाच ट्रान्झॅक्शनस् वगैरे सर्व माहिती दिली आणि हे सर्व बरोबर आहे का विचारलं,मी हो म्हणून सांगितलं. माझी खात्री झाली होती कीं हा बँकेचाच माणूस आहे. हे सर्व सांगितल्यावर तो म्हणाला “सर आपका व्हेरिफिकेशन हो गया है, अब आपके मोबाईलपर एक व्हेरिफिकेशन कोड नंबर आयेगा, मै दूबारा आपको फोन करूंगा आप मुझे वह नंबर बता देना फिर यह प्रोसेस पुरा हो जायेगा|हो सकता है आपको एेखादा डेबिट क्रेडिटका मेसेज आयेगा लकिन ऊसको ईग्नोर करना|”

त्याने सांगितल्याप्रमाणे कोड नंबरचा मेसेज आला त्यानंतर त्याचा फोन आला आणि मी तो नंबर त्याला सांगितला. कांही वेळानंतर माझ्या खात्यातून पन्नास हजार रूपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. त्याने ईग्नोर करायला सांगितलं होतं तरी मला शंका आली, मी त्याला लगेच त्याला फोन लावला पण फोन बंद होता. मी नेरूळ ब्रँचमध्ये फोन लावला पण ब्रँच बंद झालेली होती.

दुस-या दिवशी सकाळी मी नेट बँकींगने माझं अकांउंट तपासलं आणि हादरलोच खात्यातून खरोखरच पन्नास हजार रूपये गेले होते.एका दिवशी एकावेळी पन्नास हजारची लिमिट असल्यामुळे तेव्हढेच गेले होते. लगेेच परत मी रिंकू बर्मनला फोन लावला पण तो बंदच होता. मी ब्रँचमध्ये फोन लावला आणि मॅनेजरशी बोललो,मॅनेजरने ऐकुन सांगितलं की तुमचं अकांउंट हॅक झालं आहे आणि तुम्ही तात्काळ ब्रँचमध्ये या. मी जायला निघालो आणि परत पन्नास हजार रूपये गेल्याचा मेसेज आला.अश्या त-हेने माझ्या खात्यातून एक लाख रूपये गेले होते.

मी बँकेत पोहचलो, मॅनेजरच्या केबिन मध्ये गेलो, त्याला सर्व गोष्टी सांगितल्या आणि माझं नेट बँकिंग आधी बंद करायला सांगितलं.खरंतर आजची पन्नास हजारांची लिमिट संपली होती त्यामुळे अजून पैसे जाण्याची शक्यता नव्हती. मॅनेजरचे आणि माझे बरेच वाद झाले.त्याचं म्हणणं होतं कीं तो नंबर सांगुन तुम्ही चूक केली. मी त्याला म्हणालो कीं तुमची सिस्टिमच फुलप्रुफ नाही. माझं अकांउंट हॅक झालंच कसं? त्याने ईंत्यंभूत माहिती बरोबर दिली त्यामुळे तो बँकेचाच कर्मचारी असल्याची खात्री पटल्यामुळे मी तो नंबर त्याला दिला.

सर्व खातं बघिल्यावर लक्षात आलं कीं रिंकु बर्मनने लोखंडवाला कॅाम्प्लेक्समधील ओरिएंटल बँक अॅाफ कॅामर्सच्या शाखेतून हे व्यवहार केले होते.आयडीबीआय बँकेच्या मॅनेजरने तिकडे त्वरीत फोन करून त्यांना सर्व घटना सांगितली आणि रिंकु बर्मनच्या खात्यावरचे सर्व व्यवहार बंद करण्याची विनंती केली.हे खुप त्वरेने झालं पण तोपर्यंत त्या ठगाने एटीएमद्वारे ७६००० हजार रूपये काढून घेतले होते.मी पोलीस केस केली तर पुढेे सर्व सहकार्य करू अशी मॅनेजरने मला खात्री दिली आणि तेथून मी निघालो.मॅनेजरने माझ्या खात्यात गैरव्यवहार झाल्याचं मला लिहून दिलं.

तेथुन निघुन मी तडक सीबीडी बेलापूरचं नवी मुंबई पोलीस मुख्यालय गाठलं आणि सायबर सेलमध्ये जाऊन तक्रार नोंदवली एफआयआर केला. त्यांनी लवकरात लवकर तपास करायचं आश्वासन दिलं.

एकदा गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता नाहीच, ते अक्कलखाती जमा करून टाकायचे असं ठरवुन टाकलं आणि कामाला लागलो. एक लाख रक्कम कांही कमी नव्हती. मनात रूखरूख होतीच.एकदोन दिवसांनी माझे एक हितचिंतक आणि आर्थिक सल्लागार श्री. दिपक लाला यांच्या कानावर ही गोष्ट घातली, त्यांनाही ऐकून धक्काच बसला पण त्यांनी रिझर्व बँकेच्या ‘बँकिंग ओम्ब्डसमॅन’ (लोकायुक्त)कडे मला आॅनलाईन तक्रार करून ठेवण्यास सांगितलं. मी त्याप्रमाणे सर्व कागदपत्र स्कॅन करून अपलोड करून तक्रार नोंदवली.

ईस्टर्न फ्री वे चं काम जोरात चालू होतं, रोज कोणाची न कोणाची तरी व्हिजिट असायची. हळुहळु कामाच्या रामरगाड्यात मी पैश्यांचं विसरून गेलो होतो. एक दोन वेळा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली आणि तपासाचा आढावा घेतला पण हाती कांही लागलं नाही. रिंकुु बर्मनच्या अकांउंटमध्ये दिलेल्या कळव्याच्याा पत्त्यावर पोलीस जाऊून आले पण तो ही बोगस निघाला.

डिसेंबरमध्ये एके दिवशी साईटवर एमएमआरडीएचे कमिश्नर आले होते, कामाची पाहणी चालू होती आणि अचानक माझा फोन वाजला,आवाज महिलेचा होता, त्यांनी मला सांगितलं कीं मी बँकिंग ओम्ब्डसमॅन बोलतेय.तुमच्या बँक खात्यात झालेल्या गैरव्यवहाराची आम्ही चौकशी केली आहे आणि त्यात आम्हाला तथ्य आढळुन आलंय.आम्ही ओरिएंटल बँक अॅाफ कॅामर्स लोखंडवाला शाखेला तुमचे एक लाख रूपये देण्याचे निर्देश दिलेले आहेत.तुम्ही तिकडे जावून तुमचे पैसे कलेक्ट करा. ते ऐकुन मला आश्चर्याचा धक्काच बसला.मी त्यांच्याकडे फक्त आॅनलाईन तक्रार केली होती पण त्यांनी सखोल कार्यवाही करून मला माझे पैसे परत मिळण्याचे निर्देश दिले होते.

दुस-या दिवशी सकाळी मी तिकडे गेलो. तिथल्या बँक मॅनेजरने माझ्याकडून ईंडेम्निटी बाँड लिहून घेतला आणि एक लाखाचा डिमांड ड्राफ्ट मला दिला.

त्या घटनेनंतर मी सतर्क झालो आणि कोणत्याही अनोळखी कॅालला मी आता कोणताही रिस्पॅान्स देत नाही. प्रत्येकाने हे पथ्य पाळावेत हीच माझी ईच्छा आहे.
The main reason of sharing this experience is that by mistake if anything goes wrong everybody should know about “Banking Ombudsman”

– सारंग प. चपळगांवकर. मुंबई. (मुळगाव – बीड )


— संकलन : अमित कुलकर्णी
मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो..

Avatar
About अमित कुळकर्णी 14 Articles
मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..