बीसीसीआय आणि सर्वोच्च न्यायालय

BCCI and Supreme Court of India

भाजपाचे खासदार असणारे बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्या बुडाखालची अध्यक्षपदाची खुर्ची आज सर्वोच्च न्यायालयाने काढून घेतली आहे.
तर एनसीपीच्या शरद पवार यांचे प्यादे असणारया अजय शिर्केंची देखील हकालपट्टी न्यायालयाने केली आहे….

गमतीची बाब अशी की कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते, माजी खासदार कपिल सिब्बल हे अनुराग ठाकूर यांचा प्रामाणिकपणा अन निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात केविलवाणी धडपड करत होते…

बीसीसीआयचे अध्यक्ष असणारे अनुराग ठाकूर अजूनही भाजपचे खासदार आहेत. तर बीसीसीआयच्या राज्य सदस्यदत्वाचा पवारांनी नुकताच राजीनामा दिला आहे. तर बीसीसीआयच्या कार्यकारिणीत अर्थमंत्री अरुण जेटली आहेत, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आहेत, काँग्रेसचे राजीव शुक्ला आहेत, ज्योतिरादित्य शिंदे आहेत, एनसीचे फारूक अब्दुल्ला आहेत, बिहारच्या बीसीसीआय क्रिकेट बोर्डसदस्यत्वासाठी आरजेडीचे लालू यादव व केंद्रिय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यात साठमारी आहे, … एकूणच सर्व देशभरातील विविध राज्यातून सर्वच राजकीय पक्षाचे लोक भ्रष्टाचाराच्या व अनागोंदीच्या दलदलीत रुतलेल्या बीसीसीआयमध्ये ऐशोआरामात मख्ख बसून आहेत….

भ्रष्टाचारावर भरभरून बोलणारया भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बारमाही बिनपगारी भाटांची बीसीसीआयमध्ये सुरु असणारया अनागोंदीवरील प्रतिक्रिया काय असेल बरे ?

देशात सर्वत्र काळया पैशावर तथाकथित रान माजलेले असताना बीसीसीआयमधील माजोरडे लोक सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीची थट्टा का करत असावेत ? कारण त्यांना मोठाल्या राजकीय धेंडांचा आणि सर्वपक्षीय खाबूगिरीचा आशीर्वाद आहे…

बीसीसीआयमधला काळा पैसा वा प्रशासकीय मतलबीपणा या बद्दल किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसी बद्दलही राजकीय भाट मुग गिळून गप्प आहेत ! निषेधाची साधी जीभही त्यांना रेटता येत नाही !

आपले ठेवायचे झाकून आणि लोकाचे बघायचे वाकून ही रीतच आहे नाही का ?

— समीर गायकवाड



About समीर गायकवाड 155 लेख
समीर गायकवाड हे अनेक विषयांवर इंटरनेटवर लेखन करत असतात. त्यांचे लेखन अतिशय वास्तववादी असते. गायकवाड यांना विषयाचे कोणतेही बंधन नाही. ते जसे वैचारिक लेखन करतात तसेच चित्रपटांची परिक्षणेही लिहितात. समीर गायकवाड हे सोलापूरचे रहिवासी आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…