नवीन लेखन...

विडा घ्या हो नारायणा – भाग ७

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग ८८ ; आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ४५

पानामधले महत्त्वाचे घटक झाले. पान, चुना, कात आणि सुपारी. हे सर्व पदार्थ एकमेकांना पूरक आहेत. यातील प्रत्येक पदार्थाचे काही विशिष्ट वेगवेगळे गुणधर्म आहेत. पण हे पदार्थ जेव्हा चावले जातात, एकमेकात मिसळले जातात, आणि सर्वात महत्त्वाचे, चघळले जात असताना, त्यात लाळ मिसळली जाते, तेव्हा या सर्वांचे मुलभूत गुणधर्म थोडे बदलून सौम्य होतात. जसे, पान हे चवीला तिखट आहे, उष्ण स्वभावाचे आहे. पण लाळेमधील शीत गुणधर्माने उष्ण गुण कमी होतो. सुपारी खाल्ली आणि चघळली तर गुणधर्म वेगळे आणि पानातून खाणे वेगळे. सुपारीमधला एखादा घटक वेगळा करून तपासला तर तो कॅन्सर सुद्धा करू शकतो. तसं कोणत्याही पदार्थाचे रासायनिक विघटन केले असता कमी जास्ती प्रमाणात विषजन्य तत्वे मिळतातच. जसे, रिसर्पीन नावाचे द्रव्य जेव्हा एका वनस्पतीच्या मुळाच्या सालीतून वेगळे केले गेले, तेव्हा त्याचे साईड इफेक्ट दिसू लागले. पण हेच द्रव्य जेव्हा सालीसकट तपासले गेले तेव्हा त्याचे पचन घडवण्यासाठी आवश्यक असलेली द्रव्ये, त्या सालीमधेच आढळली. याचा अर्थ असा होतो, की द्रव्य वेगळे न करता, जसे आहे तसे घेतले गेले तर किंवा त्यावर विशिष्ट प्रक्रिया न करता घेतले तर साईड इफेक्ट होत नाहीत. तसेच सुपारीतील विशिष्ट अल्कलाॅईड वेगळे केले तर कॅन्सर वाढवणारे गुणधर्म सुद्धा त्यात दिसतील. म्हणून घाबरून जायचे काही कारण नाही. आणि कॅन्सर होण्यासाठी सुपारीच कशाला हवी ? नेहमीच्या जेवणातील काही पदार्थाचे घटक वेगळे करत गेले तर काही घटकांमधे पण कर्करोग वाढवणारे गुणधर्म आढळतात.

तंबाखूसारखे पदार्थ जेव्हा न चघळता, नुसतेच दाढेच्या आत, किंवा हिरडीच्या बेचक्यात दाबून ठेवले जातात, तेव्हा हिरड्यांना सतत होणारा तीक्ष्ण स्पर्श कर्करोगाला निमंत्रण देतो. असा तोंडात गालात एका जागी शांत बसलेला तंबाखू निश्चित धोकादायक आहे. तंबाखू चघळणे, असा वाक्प्रचार जरी असला तरी तो चघळला जात नाही. हे लक्षात घ्यावे.
मिरची जरी तोंडात एका जागी कायमची धरून ठेवली, तरी तिने होणारी जखम कर्करोगामधे रूपांतरीत होऊ शकते, की नाही, या प्रश्नाचे उत्तर “हो” असेच द्यावे लागेल. म्हणजे मिरची कॅन्सर करणारी आहे का ? नाही. अशीच भीती सुपारीबद्दल निर्माण करून घेण्याची आवश्यकता नाही. सुपारी थोडा मद निर्माण करते हे सत्य आहे. पण विषारी मुळीच नाही.

सध्या कोणत्याही रोगाबद्दल अवेअरनेसच्या नावाखाली निव्वळ भीती उत्पन्न करणे सुरू झाले आहे. यात फायदा कुणाचा आहे माहिती नाही पण रुग्णांचा तोटा आहे हे नक्की.विषाणुजन्य साथीचे रोग असूदेत, नाहीतर मधुमेह, रक्तदाब असो वा कर्करोग. रोगाची भीतीच रोगाला जन्माला घालत असते, असे आयुर्वेदाचे मत आहे. रोग वाढण्यामधे रोगजंतुपेक्षा, औषधांचाच हातभार जास्ती असतो. असे मत सुप्रसिद्ध संशोधक आणि पद्मभूषण विजेते डाॅ. बी एम हेगडे यांनी व्यक्त केलेले आपणाला माहिती असेलच.

पान सुपारी चुना कात हे मिश्रण तोंडात चघळण्यामुळे जी लाळ तयार होते ती पचनाला आणखी मदत करते. अर्थात अति सर्वत्र वर्ज्ययेत हे वचन देखील विसरू नये.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021

02362-223423.
08.07.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..