नवीन लेखन...
सुभाष नाईक
About सुभाष नाईक
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

१० मे १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाची स्मृती जागवा

१० मे २०१६ ला भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य-युद्धाला १५९ वर्षें पूर्ण होतील. तें युद्ध १० मे १८५७ ला सुरूं झालें होतें. जरी इंग्रजांनी त्याची ‘गदर’ म्हणून संभावना केली असली तरी, तें स्वातंत्र्ययुद्धच होतें, हें स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९०७ मधील त्यांच्या ग्रंथाद्वारें दाखवून दिलेलें आहे. हें स्वातंत्र्ययुद्ध असफल झालें असें म्हटलें जातें. बहादुरशहा जफर याला दूर ब्रह्मदेशात कैदेत ठेवलें […]

स्मृतिकाव्य : भेटूं या एकदा पुन्हां

प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिच्या निधनाला  २०१६ च्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक वर्ष झालें.  त्यानिमित्तानें तिच्या स्मृत्यर्थ.   सहजीवन सरलें , तरि भंवती अजुन खुणा सखये, आपण भेटूं या एकदा पुन्हां   ।।   ठाउक होतें ‘सोडुन जाणें’, कां गेलिस पण नकळत ? भेट घडविली ज्या नशिबानें, तयेंच केलें आहत ! मला कळेना, मी भाग्याचा केला होता काय गुन्हा  ? […]

टिप्पणी – इच्छामरण

बातमी  :  डच गव्हर्नमेंट पासेस् अ लॉ फॉर असिस्टेड डेथ् फॉर दि हेल्दी संदर्भ  –  हल्लीहल्लीची, पाश्चिमात्य देशातील एका टी.व्ही. चॅनलवरील बातमी.   आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतात आत्महत्या हा एक गुन्हा मानला जातो. कांहीं काळापूर्वी सरकारनें Euthanasia म्हणजेच दयामरण या विषयावर मतें मागवली होती. ( याविषयी मी सरकारला पाठवलेला माझा, ‘Dayamaran and Ichchhamaran’ हा […]

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – ११ – परिशिष्टे

परिशिष्ट – (१) फुलपाखरू आणि संस्कृत (व इतर भाषा ) [ ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ या शीर्षकाच्या प्रा.शेषराव मोरे यांच्या लोकसत्तामधील लेखावरील, श्री. किशोर मांदळे यांच्या प्रतिक्रियेतील एक मुद्दा ]   ‘संस्कृतमध्ये फुलपाखराला शब्द नाहीं’ असें दुर्गा भागवत यांनी म्हटल्याचें सांगून मांदळे यांनी संस्कृतवर टीका केलेली आहे.  (पहा लेखाचा भाग -६ ). ‘संस्कृतमध्ये फुलपाखराला स्वतंत्र  शब्द […]

गोकुळ – ३ : धुंद सुरूं रास

(चाल : पारंपारिक गरबा / डांडियाची ) नृत्य गोपगोपींचें , धुंद सुरूं रास वृंदावन लोटलें शरद-उत्सवास  ।।   केशकलापीं गोपी माळती फुलें वेण्यांचा संच दाट लांबवर झुले चंपक, जुइ, मोगरा, दरवळे सुवास  ।।   वस्त्रांतुन एकएक रंग उधळती इंद्रधनू आज जणूं लक्ष उजळती मांडियली रूपयौवनाची आरास  ।।   गोलगोल नरनारीचक्र हें फिरे झुलत डुलत नृत्य लांबवक्र […]

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – १०/११

सारांश , आणि निष्कर्ष : आपण शेषराव मोरे यांच्या लेखातील मुद्यांवर, तसेच त्यावरील प्रतिक्रियांबद्दलही चर्चा केली, खंडनमंडन केलें, कांहीं माहिती दिली, कांहीं नवीन मुद्दे मांडले .  त्या सर्वाचा सारांश, आणि कांहीं निष्कर्ष,  आतां थोडक्यात पाहूं या. (पण त्यापूर्वी एक स्पष्टीकरण : माझें स्वत:चें मिडलस्कूलपासूनचें शिक्षण इंग्लिश-मीडियम-पब्लिक-स्कूलमध्ये झालेलें आहे ; व पुढील, इंजिनियरिंग, मॅनेजमेंट वगैरे सर्व शिक्षणही […]

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – ९/११

संस्कृतचें ऐक्यासाठी योगदान : शेषराव मोरे यांच्या लेखाचें हेंच शीर्षक आहे, त्याअर्थी, तसें योगदान वास्तवात आहे, असें त्यांचें मत असल्याचें स्पष्ट आहे. मी या बाबतीत मोरे यांच्याशी सहमत आहे. गेल्या कांहीं सहस्त्रकांचा भारताचा इतिहास पाहिला तर, भारताच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या काळात भिन्नभिन्न राजवटी होत्या. इ.स च्या आधीची कांहीं व इ.स.च्या सुरुवातीची कांहीं शतकें भारताच्या कांहीं भागात […]

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – ८-ब/११

‘आजच्या जगात भौतिक व्यवहारासाठी संस्कृतचा कांहींही उपयोग नाहीं’ ( इति शिरवळकर) – हा मुद्दा आपण आधीच हाताळला आहे. आंतरराष्ट्रीत कीर्तीचे ज्येष्ठ विद्वान (कै.) दिनेश माहुलकरांचा अनुभव व त्याचें कथन काय सांगतें, तें आपण पाहिलें आहे. अन्य उदाहरणेंही पाहिली आहेत. त्यामुळे, यावर अधिक लिहिण्याची जरूर नाहीं. *(ज्यांना प्रा. माहुलकरांची माहिती नसेल , त्यांनी सरोजिनी वैद्य या, महाराष्ट्र […]

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग ८-अ/११

विवेक शिरवळकर यांच्या प्रतिसादाबद्दल : शिरवळकर यांनी राजोपाध्ये यांच्या कांहीं मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे. आपण त्यांची चर्चा आधी केलेलीच आहे. पुनरावृत्तीची आवश्यकता नाहीं. ‘संस्कृतमधील बरेंच ज्ञान काळाच्या उदरात लुप्त झालें’ (इति शिरवळकर) – लुप्त झालें, हें खरें आहे. पण, संस्कृत शिकण्यास बंधनें होती, म्हणून तिच्यातील ज्ञान लुप्त झाले, असें शिरवळकर म्हणतात, तें योग्य नाहीं. एक तर, […]

माते दुर्गे चंडिके

जय दुर्गे चंडिके माते, हे दुर्गे चंडिके तुझ्या वरदहस्ताविण, माते, जग ना चालुं शके  ।।   तूं चामुंडा, काली माता अंबा,  ‘शेरोंवाली’ माता वेगवेगळें रूप तुझें भक्तांच्या मनिं झळके   ।।   रुंड चेचशी पायाखालीं मुंडमालिका कंठीं घाली शूल नि खड्गावरुन करींच्या  खलशोणित टपके  ।।   तुझ्या कृपेनें जीवन फळतें विश्व तुझ्या इच्छेनें पळतें आज्ञेनेच तुझ्या, रविशशिनें […]

1 17 18 19 20 21 30
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..