(बालदिनानिमित्त) : जराशी मजा

उंदीरमामा दिसताच मनीमाऊनं घातली झडप उंदीरमामा झटकन् बिळात झाला गडप. कुत्रा गुरगुरला बोक्यावर बोका त्याला फिसकारला दोघांनी नाकं फेंदारली दोघांची गुरगुर वाढली दोघांची शेपटी झाली ताठ कुत्र्यानं वासले दात अन् पाय उगारला बोक्यानं नख्यांचा पंजाच मारला. गाईचं वासरू गोठ्यात रुळतंय् आईचं वासरू मांडीवर खेळतंय् गाय वासराला चाटतेय् प्रेमानं, हळू हळू आई बाळाला थोपटतेय् प्रेमानं, हळू हळू […]

कायम मनीं वसावा विठ्ठल

ध्यावा गानिं दिसावा विठ्ठल कायम मनीं वसावा विठ्ठल  ।। नच जाणत मी निर्गुण ब्रह्मा मजला केवळ ठावा विठ्ठल  ।। जगतीं ऊन नि खड्डे काटे वाटेवरी विसावा विठ्ठल  ।। अंध पुरा मी, मार्ग दिसेना तडफड ही – कवळावा विठ्ठल  ।। थांबायाचें जेव्हां हृदया तेव्हां मुखीं असावा विठ्ठल  ।। सुभाष स. नाईक Subhash S. Naik

वाट पंढरिची पावन ही

पुण्यनगर पंढरीला घेउनिया जाई वाट पंढरिची पावन ही  ।। चालतात पाय रस्ता, नेत्र पंढरीकडे दूर जरी देह, पोचें हृदय विठ्ठलापुढे भक्त-देव यांच्यांमध्ये अंतरची नाहीं  ।। सोडुन आलो मागुती  घर, कुटुंबां जरी चिंता निज-संसाराची नसे अम्हांला परी ठावें, विठुराया आमुचा भार सदा वाही ।। प्रिय अति ही वाट, प्रिय अन् पंढरिचा-ध्यास पंढरिचा नाथ व्यापी अस्तित्व नि श्वास […]

ये जवळ बस

‘ये, जवळ बस’ म्हणालीस तूं, मी बसलोही क्षीण तुझा कर करीं घेउनी सुखावलोही . नव्हतें माहित, ‘उद्या’ परंतू काय व्हायचें होतें ‘उद्या’च येथुन कायमचें तुज दूर ज़ायचें होतें. – सुभाष स. नाईक

१७ – दीनदयाळू अतिव कृपाळू

दिनदयाळू अतिव कृपाळू हे श्रीगणराया होउन कनवाळू, बालावर ठेव छत्रछाया ।।   आत्मतुष्ट मी, नीतिभ्रष्ट मी, अति मी गर्विष्ठ स्वार्थपूर्ति मोहिनी चेटकिण, करते आकृष्ट यत्न न केले परमार्थाच्या मर्मा जाणाया ।।   कळत-नकळतां पळत राहिलो मृगजळ पाहुन मी हात रिक्त, विषयासक्ती झाली ना परी कमी उशीर झाल्यावर उमगे –  जीवन गेले वाया ।।   पश्चात्तापीं दग्ध […]

१६ – जीवनपथ सुकर करा

जीवनपथ सुकर करा गणदेवा हो सूखशिखरीं दु:खदरीपासुन न्या हो ।।   गडबडतो धडपडतो मी, पडतो मी बडबडतो कुढतो चिडतो रडतो मी अजुन घडा कच्चा, परिपक्व हवा हो ।।   अंध तरी, वा लोचन बंद करी मी मंदबुद्धि आहे, मदमत्त परी मी अक्षय प्रज्वलित करा ज्ञानदिवा हो ।।   नि:पाता माझ्या मनिंची चंचलता निश्चल मन होइ, नाम […]

१४ – मुखीं शुभनाम गणेशाचें

करते वाणी गुणवर्णन शिवगौरीतनयाचें सुखात वा दु:खात मुखीं शुभनाम गणेशाचें ।।   चाचपडत ठेचाळत हें जीवन गेलें वाया आतुर झालो व्याकुळलो मी तुजला भेटाया काया-वाचा-मनें सुरूं आवर्तन नामांचें ।।   सिद्धी-प्रसिद्धीआस नको, कटिबद्ध तुला ध्याया सिद्धीविनायका ये मज अध्यात्मबुद्धि द्याया वृद्धिंगत होतील जीवनीं क्षण आनंदाचे  ।।   शोध संपु दे, गणपतिराया, मजपुढती येई अंत:चक्षू उघडुन आत्मज्ञानबोध […]

१२ – गणराया, आनंदाचें धाम

हे गणराया, गौरीतनया, आनंदाचें धाम हे लंबोदर, करुणाकर, माझा स्वीकरी प्रणाम  ।।   संपते न वाट, होई न पहाट ; मज जाणें पैलथडी आलोक तूंच, तम रोख तूंच, मम ज्ञानचक्षु उघडी मिळतात सुखें, मिटती दु:खें, घेतांच तुझें शुभनाम ।।   आदि ना अंत तुज, एकदंत, तूं विश्वाची शक्ती नाशतोस खल, तूं सुजनां देतोस सकल,  मुक्ती स्वानंऽद […]

११ – तूं नियतीचा अधिपती

तूं सुखकारी, तूं विघ्नारी,  तूं नियतीचा अधिपती हे गुणदाता, पार्वतीसुता, आधार तूंच जगतीं  ।।   जे खलबुद्धी, सरळ ना कधी, तूं ताडसि त्यां दुष्टां पिडतात जनां अन् संतमनां, तूं गाडसि त्या कष्टां तूं प्रेमरूप, करुनास्वरूप, तुजमुळेच सुखदीप्ती  ।।   जोडुन हातां, टेकुन माथा, जनगण तुजला नमती फुंकून शंख, गर्जून मंत्र, जग करी तुझी आरती वाजे डंका, […]

१३ – गजाननाचे मोदक (मुक्तक)

गजाननाचे मोदक (मुक्तक)   गंधार करी अंधार गहन जगिं दूर तव अकार, अद्वैताचा साक्षात्कार सांगतो चंद्र हें, तूं अवकाशाधार तव अनुस्वार, ब्रह्मास देइ आकार । ‘गँ’ मंत्र तुझा, तेजसी-शक्ति-भांडार हें ओंकारा, प्राणांत तुझा हुंकार  ।। – ब)       ‘गंधारा’पुढती तुझ्या, ठेंगणें गगन तव ‘निषादा’पुढे नतमस्तक रवि-उडुगण तव ‘षड्ज’ हाच एकमात्र मेरू अविचल हे ‘गणेश’, देसी तूंच सप्तलोकां […]

1 2 3 17