नवीन लेखन...
श्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

पायपुसणं

काथ्यापासून व मऊशार लोकरीपासून तयार केलेल्या, मध्यमवर्गीयांच्या अवाक्याबाहेरअसलेल्या त्या महागड्या तुकड्यांवर पाऊल ठेऊन त्यांना खराब करण्याआधी शंभरदा विचार करावा लागला असता. ही डोअरमॅट्स खरेदी करणारी मंडळी त्यांना खरंच दरवाज्यात ठेवत असतील की त्यांच्या सौंदर्याने प्रभावित होऊन त्यांचं कौतुकाने शो केसमधे प्रदर्शन मांडत असतील? दैनंदिन जीवनातील एखादी वस्तू इतकी आकर्षक असू नये की तिला वापरण्याची इच्छाच होऊ नये ! […]

सातच्या आत, घराबाहेर !

आजच्या घराघरातील आई-वडिलांना खऱ्या अर्थाने ‘पालक’ बनून आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ‘आमची मुलं बिघडली हो’ असा आक्रोश करण्याची वेळ येणार नाही आणि ‘सातच्या आत घरात’ सारखे चित्रपट निर्माण करण्याची गरजच भासणार नाही ! […]

एका रात्रीत हीरो

‘‘केवळ पैसा कमावण्यासाठी स्पर्धेत सहभागी होऊ नका. गाडी आणि बंगल्याच्या मागे धावण्यापेक्षा कलेच्या मागे धावलात तर सगळं ऐश्वर्य तुमच्या मागे आपोआपच धावत येईल’’ हा एका सुप्रसिध्द संगीतकाराने स्पर्धकांना दिलेला सल्ला अत्यंत गांभीर्याने घेण्याची वेळ आलेली आहे. थोडेही कष्ट न करता ‘एका रात्रीत हीरो’ बनण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ’या जगात यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट्‌स नसतात’ हा विचार रक्तात भिनवून व ’डिग्निटी ऑफ लेबर’ची खिल्ली न उडवता ऐन उमेदीच्या वयात रात्रंदिवस कष्ट करून अफाट यश प्राप्त करण्यासाठी जर आपल्या देशातील तरुणाईने प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर भारताला अवघ्या विश्वावर राज्य गाजविण्यासाठी वेळ लागणार नाही! […]

तत्त्वांशी बांधिलकी 

१९७५ च्या अखेरीस त्याने शिक्षणाला रामराम ठोकला व तो त्या संघटनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता झाला. आमच्या करिअरच्या वाटा वेगळ्या झाल्यामुळे त्यानंतर अनेक वर्षे आमची भेट झाली नाही, पण आज त्यानेच तो योग जुळवून आणला होता. […]

संथ वाहते कृष्णामाई 

खळाळून वाहणारी कृष्णा नदी, तिच्या तीरावरील सुंदर दगडी घाट व रेखीव देवळं त्यात चितारली होती आणि त्या पेंटिंगच्या खाली १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका मराठी चित्रपटातील गीताच्या दोन ओळी लिहिल्या होत्या…….. […]

मी, एक दहशतवादी ! 

संसद भवनाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आराखडा तयार करत असताना मला आलेल्या अनुभवांवर आधारित हा लेख.  […]

इंग्रजांनो, शतशः सलाम ! 

एका जर्मन कंपनीच्या कृषी विभागातर्फे आठ वर्षे कोकणात भटकंती करत असताना इंग्रजांच्या काळातील असा एकही पूल शिल्लक राहिला नाही जिथे थांबून पुलावर लावलेल्या दगडावरील (प्लेक्) माहिती मी वाचली नाही. ३४ वर्षांपूर्वी कोकण रेल्वे अस्तित्वात आली नसल्यामुळे रस्त्यांवरूनच प्रवास करावा लागत असे. मोबाईल अस्तित्वात आला नव्हता व चांगल्या कॅमेऱ्यांच्या किमती आवाक्याबाहेर असल्यामुळे फोटो काढणे शक्य नव्हते. पूल […]

तुलनेचे बळी

का वागतो आम्ही असे? या जगात दोन व्यक्तींची तुलना होऊ शकते? प्रत्येक व्यक्तीत एक पूर्णपणे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व लपलेलं असतं व त्याला किंवा तिला स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याची पूर्ण मुभा असायला हवी, असं तुम्हाला नाही वाटत? जोपर्यंत या जगातील दोन व्यक्तींच्या अंगठ्यांचे ठसे तंतोतंत जुळत नाहीत, तोपर्यंत दोघांमध्ये तुलना करण्याचा या पृथ्वीवर कोणालाही अधिकार नाही. अगदी जन्मदात्यांनाही! […]

बोलघेवडे काका

पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीने पद्माकरकाकांचं पार्थिव आपल्या कवेत घेतलं आणि तिच्या दरवाज्यासमोर डोळे मिटून हात जोडताच माझ्या मनाच्या पाखराने नागपुरातील धरमपेठेत झेप घेतली. खूप वर्षांपूर्वी आमची पहिली भेट झाली तेव्हा त्यांच्या नॉनस्टॉप बोलण्याच्या सवयीमुळे मला प्रश्न पडला ‘हा शब्दांचा नायगारा फॉल्स, की तोटी चोरीला गेल्यामुळे पाण्याचा अखंड वर्षाव करणारा नगरपालिकेचा सार्वजनिक नळ?’ त्या भेटीत काकांच्या संवादाच्या […]

वटसावित्री नावाचे विज्ञान !

मानवाने जंगलं साफ करून शेती करण्यास सुरवात केली तेव्हा या पृथ्वीवर इतकी घनदाट जंगलं होती की थोड्याशा जंगलतोडीमुळे विशेष फरक पडला नाही. हळूहळू इंधन व इतर अनेक कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊ लागली व परिस्थिती गंभीर वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली. आता जर त्वरित कृती केली नाही तर ही सुंदर वसुंधरा उजाड होण्यास वेळ लागणार नाही […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..