नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

वाई येथील प्राज्ञपाठशाळचे संस्थापक केवलानंद सरस्वती उदयशंकर

करारी स्वभाव, उज्ज्वल चारित्र्य, अध्यात्मनिष्ठा व त्यागी जीवन हे त्यांचे व्यक्तिमत्त्वविशेष होत. वाई येथे त्यांचे स्मारकमंदिर उभारले असून तेथे धर्मकोशाचे संपादनकार्य चालते. १९७५ पर्यंत त्याचे अकरा भाग प्रकाशित झाले. मीमांसाकोश व धर्मकोश ह्या ग्रंथांना आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली. […]

भारतीय महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम

घरचा विरोध असतानाही २००० साली १७ व्या वर्षी मेरी कोमने बॉक्सिंग रिंगमध्ये पहिले पाऊल टाकले. दोन आठवड्यांत ती बॉक्सिंगचं बेसिक शिकलीसुद्धा आणि २००० सालीच मेरी कोमने राज्यस्तरीय स्पधेर्चं जेतेपद मिळवले; वर्तमानपत्रात नाव-फोटो झळकले आणि घरी मेरी कोमच्या यशाची कल्पना आली. पण बॉक्सिंगबद्दल मेरी कोमची ओढ पाहून त्यांचा विरोधही मावळला. […]

सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते वसंतदादा पाटील

सहकार क्षेत्रात दादांचा प्रत्येक शब्द अंतिम मानला जात असे. वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले होते पण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी – असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो. […]

महाशिवरात्र

माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र म्हणतात. माघ कृष्ण चतुर्दशी निशीथ कालव्यापिनी असेल तो दिवस महाशिवरात्रीचा मानला जातो. यात निशीथ काल म्हणजे काय याची अनेकांना कल्पना नसेल. रात्रीच्या एकूण वेळेचे १५ समान भाग केले म्हणजे त्यातील प्रत्येक भागाला मुहूर्त असे म्हणतात. त्यातील आठव्या मुहूर्ताला निशीथ असे म्हटले जाते. […]

माजी क्रिकेटपटू करसन घावरी

करसन घावरी हे फास्ट बॉलर असून ते लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंग ही करत असत. करसन घावरी आपल्या करीयर मध्ये ३९ कसोटी व १९ वनडे खेळले. १९७४ ते १९८१ पर्यत आपल्या क्रिकेट करियर मध्ये दोन वेळा १९७५ व १९७९ वर्ल्ड कप पण खेळले. […]

कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती

जयेंद्र सरस्वती हे कांचीपुरम पीठाचे ६९ वे शंकराचार्य होते. ते १९५४ मध्ये शंकराचार्य बनले होते. वेदांवर त्यांचं प्रभुत्व होतं. चंद्रशेखेरेन्द्रा सरस्वती यांनी त्यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं होतं. २००३ मध्ये त्यांना शंकराचार्याची उपाधी घेऊन ५० वर्ष पूर्ण झाली होती. […]

राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी कोणती तारीख निवडावी यासाठी तेव्हा खूप चर्चा झाली होती. चर्चेत डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की अरे! हा तर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी दिवस शोधायचा आहे आणि भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. […]

जनसंघाचे नेते नानाजी देशमुख

चित्रकूटमधील खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी टप्प्याटप्प्याने प्रकल्प हाती घेतला. चित्रकूटमध्ये त्यांनी गोशाळा स्थापन केली असून महिला सक्षमीकरणासाठी उद्यमकेंद्राची स्थापना केली आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्रातर्फे पिकांवर संशोधन केले जाते. पिकांचे कोणते वाण वापरावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. […]

हिंद केसरी मारुती माने

कोणत्याही क्षणैक वलयाच्या मागे न लागता माने यांनी आयुष्यभर कुस्ती हेच आपले ध्येय ठेवले आणि त्याप्रमाणेच ते वागत आले. लाल मातीमध्ये रंगून जाणाऱ्या या बलदंड माणसाच्या मनाचा एक कोपरा हळुवार होता आणि तो हळवेपणा त्यांच्या बासरीवादनातून व्यक्त होत राहिला. […]

अभिनेते अजय वढावकर

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने छोट्या पडद्याच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले अजय वढावकर यांनी मालीकाच्या बरोबर येस बॉस, फिर भी दिल है हिंदुस्थानी, इंग्लिश बाबू देसी मेम या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. दूरदर्शनवरील ‘नुक्कड’ मालिकेतील त्यांनी साकारलेला ‘गणपत हवालदार’ प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारा ठरला. मुंबईतील दादर भागात लहानाचे मोठे झालेल्या वढावकर यांचा अंतकाळ हलाखीचा होता. मधुमेहामुळे पाच वर्षांपूर्वी त्यांना […]

1 84 85 86 87 88 423
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..